
Usha Nadkarni : मराठी सिनेविश्वातीस प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत उषा नाडकर्णी यांनी चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमुळे तर उषा नाडकर्णी यांच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. उषा नाडकर्णी कायम त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतात. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत उषा नाडकर्णी यांनी स्वतःच्या मृत्यूबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
काम करताना मृत्यू आला पाहिजे. आपल्यामुळे उगाचच कोणाला त्रास कशाला? असं म्हणत उषा नाडकर्णी भावूक देखील झाल्या. मुलाखतीत उषा नाडकर्णी म्हणाल्या, ‘माझं असं म्हणणं आहे की, काम करताना मरण आलं पाहिजे. मज्जा येईल मला… आपल्यासाठी कोणी त्रास घ्यायला नको. म्हणजे आपल्याला बघून लोकांना वाईट वाटायला नको आणि लोक आपल्यासाठी करतात हे पाहून मला वाईट वाटायला नको.
उषा नाडकर्णी पुढे म्हणाल्या, ‘मी आजारी पडली तर, माझ्या मुलाला त्रास होणार. तो त्याच्या बायको, मुलील बघणार की मला बघणार…? माझ्या बाजूच्या आहेत बंगाली त्यांनी मला सांगितलं आहे. आंटी कभी भी कुछ हो गया शरमानेका नही… बीच रात को भी फोन करो…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त उषा नाडकर्णी यांनी व्यक्त केलेल्या भावनांची चर्चा रंगली आहे.
उषा नाडकर्णी एकट्याच राहतात. ‘मी एकटी राहते आणि एकटं राहण्याची मला आता सवय झाली आहे. सुरुवातीला कठीण वाटलं पण आता एकटं राहायला पण आवडत आहे…’ असं देखील उषा नाडकर्णी म्हणाल्या. उषा नाडकर्णी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.
सांगायचं झालं तर, उषा नाडकर्णी कायम त्यांच्या आयुष्यातील खास आठवणी चाहत्यांसोबत शेअर करतात. पण अभिनय विश्वातील त्यांचा प्रवास फार काही सोपा नव्हता. करीयरच्या सुरुवाती त्यांना अनेक प्रसंगांचा सामना करावा लागला. वडिलांनी अभिनेत्रीला मारहाण केली तर, आईने घराबाहेर काढलं. पण उषा नाडकर्णी स्वतःचं स्वप्न पूर्ण केलं आणि अभिनय विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलं.