AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमृताची आई-बाबांसोबत लंडन ट्रीप; म्हणाली, माझा सुपरहिरो आणि त्याची सुपर पॉवर…

Actress Amruta Khanvilkar on Fathers Day : अभिनेत्री अमृता खानविलकर हिने तिच्या बाबांबाबतच्या आठवणी शेअर केल्यात. माझा सुपरहिरो आणि त्याची ही सुपर पॉवर मला आत्मसात करायची, असं अमृता खानविलकर म्हणाली आहे. अमृता खानविलकर काय म्हणाली? वाचा सविस्तर......

अमृताची आई-बाबांसोबत लंडन ट्रीप; म्हणाली, माझा सुपरहिरो आणि त्याची सुपर पॉवर...
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 16, 2024 | 4:03 PM
Share

जन्म देण्यापासून ते अगदी पुढे जाऊन आपल्या आयुष्यातल्या महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यापर्यंत जो बॅक सपोर्ट वर असतो तो म्हणजे आपला बाबा…! आजच्या फादर्स डे निमित्ताने अभिनेत्री अमृता खानविलकर हिने हिच्या बाबा साठी खास भावना व्यक्त केल्या आहेत. अमृताने हिंदी आणि मराठीत तिच्या ग्लॅमरस अंदाजाने आणि अभिनयाने कायम प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. ती नुकतीच तिच्या आई-बाबासोबत एका खास लंडन ट्रीपला सुद्धा गेली होती. आज फादर्स डे निमित्त तिने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. माझा सुपरहिरो आणि त्याची ही सुपर पॉवर मला आत्मसात करायची, असं अमृताने सांगितलं.

मी खूप नशीबवान… – अमृता

माझे वडील एक स्व-शिक्षित सकारात्मक व्यक्ती आहेत ज्यांनी एकट राहून आनंदी राहण्याची कला साध्य केली आहे. त्यांना प्रवासाची आवड आहे आणि एकटे राहूनही आनंद कसा मिळवायचा हे मी त्यांचा कडून शिकले आहे. या गोष्टीचं त्यांची एक मुलगी म्हणून मला फार कौतुक आहे. बाबाकडून मी एक खूप खास गोष्ट शिकले ती म्हणजे की आनंद हा आतून येतो आणि एकटे राहण्याचा अर्थ एकटे असणे नाही. जेव्हा मी बाबांच्या वयात येईन तेव्हा त्यांच्यासारखा फक्त दोन टक्के आनंद मिळवू शकले तरी मी स्वतःला खूप नशीबवान समजेन, असं अमृता खानविलकर म्हणाली.

बाबांकडून कोणत्या गोष्टी अमृता शिकली?

आपण सगळेच आपल्या आई-बाबाकडून अनेक गोष्टी शिकत असतो आणि बाबाकडून शिकताना मला समजलं की आनंद ही एक निवड आहे. एकांत स्वीकारल्यामुळे सखोल आत्म-शोध आणि वैयक्तिक वाढ होऊ शकते. एकटे असूनही आपण समाधानी आणि उत्साही कसे राहू शकतो हा धडा माझ्यासाठी अमूल्य आहे आणि मी तो माझ्या स्वतःच्या जीवनात समाविष्ट करते. त्यांचा सारखं समाधानी आणि आनंदाच्या फक्त एका अंशाला जरी पोहचले तरी मी स्वतःला खूप नशीबवान समजेन, असंही अमृताने म्हटलं आहे.

अमृता कितीही शूटमध्ये व्यस्त असली तरी ती तिचा फॅमिली टाईम कायम वेगवेगळ्या गोष्टीतून स्पेंड करताना दिसते. मग ती ट्रीप असू दे किंवा आई बाबा सोबतचा खास वेळ असो. ती कुटुंबासोबत नेहमीच सोबत राहते. यातून तिचं तिच्या बाबा सोबतच खास नात देखील पहायला मिळतं.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.