जेव्हा तो नसतो…; रिंकू राजगुरूची ‘त्याच्या’वरची पहिली कविता वाचलीत का?
Actress Rinku Rajguru Poem : अभिनेत्री रिंकू राजगुरु हिला वाचनाची आवड आहे. याशिवाय ती स्वत; देखील काही लिखाण करते. रिंकू कविता देखील लिहिते. नुकतंच एका कार्यक्रमात तिने तिची पहिली कविता सादर केली. तिची पहिली कविता तुम्ही ऐकलीत का? नसेल तर वाचा आता...

अभिनेत्री रिंकू राजगुरु तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते. तिचा अभिनय प्रेक्षकांना भावतो. ‘सैराट’ हा तिचा पहिला सिनेमा तर सुपरडुपर डिट ठरला होता. या सिनेमात रिंकूने साकारलेली ‘आर्ची’ आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. पण अभिनया व्यतिरिक्त तिला आणखीही काही गोष्टींची आवड आहे. रिंकूला वाचनाची आवड आहे. याशिवाय ती स्वत: लिहिते देखील… एका मुलाखतीदरम्यान रिंकूने तिने लिहिलेली कविता ऐकवली. रिंकूने ‘कमरा’ नावाची कविता लिहिली आहे. यात तिने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
रिंकूची ‘कमरा’ नावाची कविता
जब वो नहीं होता है…
तो वो खाली कमरा बहुत कुछ कहता है…
शायद उसके ना होने की एक वजह होगी की,
उसे मै महसूस करू
अपने अंदर झाककर देखूँ…
तो वो वहीं होता है मेरे भीतर,
सिर्फ किसी और के साथ
उसने शायद खो दिला है मुझे अब,
लेकीन मै खुद को पाती हूँ उसके साथ उसकी झुठी दुनिया में…
उसकी झुटी दुनिया मे खुदको पाना क्या सच्चाई है मेरी?
आज भी उस खाली कमरे को देखकर उसे महसूस करना अच्छाई है मेरी?
रिंकूची वाचनाची आवड…
रिंकू राजगुरुला वाचनाची आवड आहे. ती वेगवेगळी पुस्तकं वाचत असते. एका मुलाखतीदरम्यान रिंकूने तिच्या वाचनाच्या सवयीबद्दल सांगितलं. सकाळी उठलं की चहा वगैरे घेतला की मी वाचनाला सुरुवात करते. एखादं पुस्तक मी कितीही वेळ सलग वाचू शकते. पुस्तकं आता ऑडिओ स्वरूपातही मिळतात. पण मला तसं आवडत नाही. पुस्तक वाचण्याची एक वेगळी मजा आहे. मी पुस्तक माझ्या पद्धतीने वाचते. ते वाचताना मी माझ्या पद्धतीने ते इमॅजिन करते, असं रिंकू राजगुरु हिने सांगितलं.
View this post on Instagram
एखादं पुस्तक आवडलं तर ते मी सलग रात्रभर देखील वाचू शकते. माझ्या बाबांनी मला ही सवय लावली आहे. तसंच नागराजदादा देखील काही पुस्तकं सुचवतो. ती मी वाचत असते. सध्या मुंबईत राहायला आल्यापासून मला वाचनासाठी भरपूर वेळ मिळतो, असं रिंकू म्हणाली.
