AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘बाबू’चा टिझर आऊट, ‘बाबू’ शेठचा जलवा लवकरच अनुभवायला मिळणार

'बाबू' हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून नुकतंच या चित्रपटाचे टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

'बाबू'चा टिझर आऊट, 'बाबू' शेठचा जलवा लवकरच अनुभवायला मिळणार
बाबू- चित्रपट
| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Feb 22, 2022 | 2:35 PM
Share

आयेशा सय्यद, मुंबई : सध्या विविध मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असतानाच आता त्यात आणखी एका चित्रपटाची भर पडली आहे. श्री कृपा प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘बाबू‘ (Babu) हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून नुकतेच या चित्रपटाचे टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सुरुवातीपासूनच या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होती. त्यात आता टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आल्याने ‘बाबू’विषयीची उत्सुकता अधिकच शिगेला पोहोचली आहे. हा एक ॲक्शनपट असून यात ‘बाबू’ची भूमिका अंकित मोहन (Ankit Mohan) साकारत आहे. याव्यतिरिक्त या चित्रपटात रुचिरा जाधव (Ruchira Jadhav), नेहा महाजन (Neha Mahajan) यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. बाबू कृष्णा भोईर निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन मयूर मधुकर शिंदे (Mayur Shinde) यांनी केले आहे.

‘बाबू’चा टिझर आऊट

‘बाबू’ हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून नुकतंच या चित्रपटाचे टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.हा एक ॲक्शनपट असून यात ‘बाबू’ची भूमिका अंकित मोहन साकारत आहे. याव्यतिरिक्त या चित्रपटात रुचिरा जाधव, नेहा महाजन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

चित्रपटाची कथा

आगरी -कोळी भागात घडणारी ही कथा आहे.गावात होणाऱ्या अन्यायाविरोधात, राजकारणाविरोधात ‘बाबू’ त्याच्या आक्रमक पद्धतीने कशी उत्तरे देतो, हे पाहायला मिळत आहे. गावात नक्की कोणत्या कारणाने आपापसात ही लढाई सुरु आहे, हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल. मात्र यासाठी प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागेल.

अंकित मोहन याआधीही ऐतिहासिक चित्रपटांमधून प्रेक्षकांसमोर आला आहे, या चित्रपटात मात्र अंकित एका वेगळ्याच भूमिकेत दिसत आहे. त्याच्या पिळदार शरीरयष्टीवरून त्याने घेतलेल्या मेहनतीचा चांगलाच अंदाज येतोय. यात रुचिरा आणि नेहाची नेमकी काय भूमिका आहे, हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे. या चित्रपटाची कथा बाबू कृष्णा भोईर यांची असून संवाद आणि पटकथा मयूर मधुकर शिंदे यांची आहे. ॲक्शनचा जबरदस्त धमाका ‘बाबू’च्या निमित्ताने पाहायला मिळणार आहे.

संबंधित बातम्या

उर्फी जावेदकडून दिग्दर्शकावर लैंगिक सुखाची मागणी केल्याचा आरोप, स्किनशॉट शेअर करत म्हणाली…

ऋतिक रोशन आणि सबा आझादची पहिली भेट कुठे झाली? तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित!

Bheemla Nayak Trailer : ‘भीमला नायक’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, दबंग पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणारा अभिनेता पवन कल्याण!

Follow Us
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...