Ek Hota Malin: एका रात्रीत संपूर्ण गाव नाहीसं झालं; माळीण दुर्घटनेची कथा सांगणारा ‘एक होतं माळीण’ चित्रपट

| Updated on: Apr 11, 2022 | 3:08 PM

जुन्नर तालुक्यातील माळीण (Malin) गावात 2014 मध्ये दरड कोसळल्याची दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेवर आधारित एक होतं माळीण (Ek Hota Malin) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या 29 जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Ek Hota Malin: एका रात्रीत संपूर्ण गाव नाहीसं झालं; माळीण दुर्घटनेची कथा सांगणारा एक होतं माळीण चित्रपट
Ek Hota Malin
Image Credit source: Instagram
Follow us on

जुन्नर तालुक्यातील माळीण (Malin) गावात 2014 मध्ये दरड कोसळल्याची दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेवर आधारित एक होतं माळीण (Ek Hota Malin) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या 29 जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि दमदार संहिता हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं. ड्रीम डॉट क्रिएशनच्या संतोष जगन्नाथ म्हात्रे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे, तर रुपेश राणे, अरूण अरुण कोंजे हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची संकल्पना, कथा, पटकथा राजू राणे यांची असून दत्तात्रय गायकर आणि राजू राणे यांनी चित्रपटाचे संवाद लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. प्रशांत मोहिते, अश्विनी कासार, अभिजित श्वेतचंद्र, सिद्धी पाटणे, अनिल नगरकर, प्रशांत तपस्वी, रामचंद्र धुमाळ, दीपज्योती नाईक अशा उत्तम कलावंतांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. (Marathi Movie)

राजा फडतरे यांनी छायांकन, युवराज गोंगले यांनी गीतलेखन आणि संगीत दिग्दर्शन केलं आहे. व्हीएफएक्स दिवाकर घोडके यांचे असून महेश भारंबे हे कार्यकारी निर्माते आहेत. मुसळधार पावसामुळे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे जीवित आणि मालमत्तेची हानी झाली होती. एक संपूर्ण गावच एका रात्रीत नाहीसं झालं होतं. या भीषण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर एक हळूवार आणि हृदयस्पर्शी कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे.

चित्रपटाचा पोस्टर-

उत्तम संहिता, दमदार कलाकार आणि उत्कृष्ट व्हीएफएक्स ही या चित्रपटाची बलस्थानं आहेत. मराठी चित्रपटात उत्तमोत्तम कथा असलेले चित्रपट येत असतात. त्यात आता ‘एक होतं माळीण’ या चित्रपटाचीही भर पडणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी माळीणमधील ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधून, त्यांच्याकडून माहिती घेऊन नव्यानं कथानक लिहिलं गेलं आहे.

हेही वाचा:

Phule: प्रतीक गांधी व पत्रलेखा साकारणार फुले दाम्पत्याची भूमिका; बायोपिकवर जितेंद्र जोशीची खास प्रतिक्रिया

Aai Kuthe Kay Karte: ‘त्यानंतर अनिरुद्ध आणखीनच फेमस झाला’; सेटवरील खास व्यक्तीसाठी मिलिंद गवळी यांची पोस्ट