ब्लॉकबस्टर ‘पावनखिंड’ आता OTTवर पाहता येणार; ‘या’ तारखेला ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवर होणार स्ट्रीम

| Updated on: Mar 17, 2022 | 6:35 PM

झुंजार बांदल सेनेच्या आणि नरवीर बाजीप्रभूंच्या पराक्रमाचा अभूतपूर्व अध्याय उलगडून दाखविणाऱ्या दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) लिखित-दिग्दर्शित ‘पावनखिंड’ (Pawankhind) या चित्रपटाला सिनेमागृहांमध्ये जबरदस्त प्रतिसाद मिळाला.

ब्लॉकबस्टर पावनखिंड आता OTTवर पाहता येणार; या तारखेला ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवर होणार स्ट्रीम
Pawankhind
Image Credit source: Facebook
Follow us on

पावनखिंडीचा रणसंग्राम घडून आज 361 वर्षांचा काळ उलटला असला तरी हा अतुलनीय लढा आणि बाजीप्रभूंच्या अजोड स्वामीनिष्ठेची कथा मराठी जनमानसावर आजही अधिराज्य गाजवित आहे. झुंजार बांदल सेनेच्या आणि नरवीर बाजीप्रभूंच्या पराक्रमाचा अभूतपूर्व अध्याय उलगडून दाखविणाऱ्या दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) लिखित-दिग्दर्शित ‘पावनखिंड’ (Pawankhind) या चित्रपटाला सिनेमागृहांमध्ये जबरदस्त प्रतिसाद मिळाला. घोडखिंडीत बाजीप्रभूंनी आपल्या प्राणांची आहुती देत गनिमांची वाट रोखून धरत पराक्रमाची शर्थ केली होती. बाजीप्रभूंच्या पवित्र रक्तानं पावन झाल्यानं या खिंडीला पुढं ‘पावनखिंड’ नाव पडलं. शिवचरित्रातील सुवर्णपान असलेल्या पावनखिंडीची गाथा दिग्पाल यांनी ‘पावनखिंड’ चित्रपटात अतिशय प्रभावीपणे मांडली आहे. फर्जंद आणि फत्तेशिक्तनंतर शिवराज अष्टकातील हा तिसरा चित्रपट आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांना ओटीटीवर पाहता येणार आहे. येत्या 20 मार्त रोजी ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवर (Amazon Prime Video) हा चित्रपट स्ट्रीम होणार आहे.

शिवजयंतीच्या मुहूर्तावर हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. गेल्या दोन वर्षांपासून हा चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत होता. कोरोना महामारी आणि लॉकडाउनची परिस्थिती पाहता अनेक निर्मात्यांनी ओटीटीवर (OTT) चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. मात्र ‘पावनखिंड’ हा थिएटरमध्येच प्रदर्शित व्हावा, अशी दिग्दर्शक आणि कलाकारांची होती. त्यामुळे आधी थिएटरमध्ये प्रदर्शित केल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटात मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, अंकित मोहन, अक्षय वाघमारे, रुची सवर्ण, उज्ज्वला जोग, सुरभी भावे, माधवी निमकर, दिप्ती केतकर, प्राजक्ता माळी, वैभव मांगले, हरीश दुधाडे, विक्रम गायकवाड, बिपीन सुर्वे, सचिन भिलारे, अजिंक्य ननावरे, सुनील जाधव, क्षिती जोग, समीर धर्माधिकारी, आस्ताद काळे, ऋषी सक्सेना, शिवराज वायचळ, राजन भिसे, सुश्रुत मंकणी या कलाकारांसोबतच संतोष जुवेकरनं पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे.

हेही वाचा:

The Kashmir Files बॉक्स ऑफिसवर सुसाट; 100 कोटींपासून काही पावलं दूर

“तिच्याशी ब्रेकअपनंतर मी बर्बाद झालो”; प्रतीक बब्बरने सांगितला Amy Jacksonसोबतचा कटू अनुभव