“तिच्याशी ब्रेकअपनंतर मी बर्बाद झालो”; प्रतीक बब्बरने सांगितला Amy Jacksonसोबतचा कटू अनुभव

प्रतीक फक्त त्याच्या अभिनयासाठीच नाही तर खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत आला. अभिनेत्री ॲमी जॅक्सनसोबतचं (Amy Jackson) त्याचं नातं सर्वाधिक चर्चेत होतं. 'एक दिवाना था' (Ekk Deewana Tha) या चित्रपटात या दोघांनी एकत्र काम केलं होतं.

तिच्याशी ब्रेकअपनंतर मी बर्बाद झालो; प्रतीक बब्बरने सांगितला Amy Jacksonसोबतचा कटू अनुभव
Prateik Babbar and Amy JacksonImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Mar 17, 2022 | 1:39 PM

अभिनेते राज बब्बर यांचा मुलगा आणि अभिनेता प्रतीक बब्बर (Prateik Babbar) याने 2007 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटात त्याने सहाय्यक भूमिका साकारली होती. प्रतीक फक्त त्याच्या अभिनयासाठीच नाही तर खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत आला. अभिनेत्री ॲमी जॅक्सनसोबतचं (Amy Jackson) त्याचं नातं सर्वाधिक चर्चेत होतं. ‘एक दिवाना था’ (Ekk Deewana Tha) या चित्रपटात या दोघांनी एकत्र काम केलं होतं. 2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान प्रतीक आणि ॲमी एकमेकांच्या प्रेमात पडले. हे दोघं त्यावेळी प्रेमात आकंठ बुडाले होते. मात्र त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. ब्रेकअपनंतरचा काळ प्रतीकसाठी फार अवघड होता. त्याला नैराश्याचाही सामना करावा लागला होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रतीक ॲमीसोबतच्या नात्याबद्दल आणि ब्रेकअपबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला.

‘मॅशेबल’ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, “एक दिवाना था हा खूप चांगला चित्रपट आहे. पण त्यावेळी मी त्या महिलेच्या (ॲमी) प्रेमात पडलो आणि गोंधळ सुरू झाला. ती गोष्ट सोप्या शब्दांत सांगायचं म्हणजे, ब्रेकअप झाल्यानंतर माझा वाईट काळ सुरू झाला होता. 25 व्या वर्षी मी तो अनुभवला होता. त्या घटनेनंतर मी फार कुठे समोर आलोच नाही.” प्रतीकने 2019 मध्ये सान्या सागरशी लग्न केलं. तर ॲमी ही जॉर्ज पनय्योतोला डेट करतेय. हे दोघं लिव्ह इनमध्ये राहत असून त्यांनी लग्न केलं नाही. ॲमी आणि जॉर्जला एक मुलगा आहे.

View this post on Instagram

A post shared by prateik babbar (@_prat)

प्रतीकच्या चित्रपटांविषयी बोलायचे झाल्यास, तो लवकरच ‘बच्चन पांडे’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये तो अक्षय कुमार, क्रिती सनॉन, जॅकलिन फर्नांडिस आणि अर्शद वारसी यांच्यासोबत काम करणार आहे. हा मल्टी-स्टारर कॉमेडी चित्रपट येत्या 18 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय तो मधुर भांडारकर दिग्दर्शित ‘इंडिया लॉकडाऊन’मध्येही महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटात पंकज त्रिपाठी, सई ताम्हणकर, श्वेता प्रसाद, संजय मिश्रा आणि अभिमन्यू सिंह यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

हेही वाचा:

The Kashmir Files बॉक्स ऑफिसवर सुसाट; 100 कोटींपासून काही पावलं दूर

बोल्ड अ‍ॅन्ड ब्युटी; अ‍ॅमी जॅक्सनचा टॉपलेस अवतार

TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद
TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद.
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?.
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका.
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?.
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल.
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?.
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?.
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '.
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे.
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड.