गौतमी देशपांडेची बहिण मृण्मयीबाबत गोड तक्रार; म्हणाली, ताई कधीच…
Actress Gautami Deshpande Post About Sister Mrunmayee Deshpande : अभिनेत्री गौतमी देशपांडे हिने एक स्टोरी शेअर केलीय. या स्टोरीतून तिने एक गोड तक्रार केली आहे. बहिणी मृण्मयी देशपांडेबद्दल तिने ही स्टोरी शेअर केली. गौतमीने या स्टोरीमध्ये काय म्हटलंय? वाचा सविस्तर...

मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध बहिणींची जोडी म्हणजे अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि गौतमी देशपांडे… कामासोबतच या दोघींच्या मिश्किल नात्याचीही चर्चा होत असते. या दोघी एकमेकांसोबतचे मजेशीर व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर करतात. त्यांच्या या पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते. आता गौतमीच्या एका इन्स्टाग्राम स्टोरीची जोरदार चर्चा होतेय. या स्टोरीमध्ये गौतमी तिची बहिण मृण्मयीबाबत गोड तक्रार करताना दिसते आहे. आलिया भट तिच्या बहिणीबाबत बोलतानाचा व्हीडिओ गौतमीने शेअर केलाय. हा व्हीडिओ शेअर करत तिने गौतमीची एक गोड तक्रार सोशल मीडियावर केली आहे.
व्हीडिओत नेमकं काय?
कॉफी विथ करण या कार्यक्रमातील एक व्हीडिओ गौतमीने तिच्या स्टोरीवर शेअर केलाय. यात आलिया एक किस्सा सांगते आहे. सैफ मला विचारतो की, आलिया तू तुझ्या बहिणीसोबत दिवसभर बोलतेस का? त्यावर मी म्हणते होत आम्ही बोलत असतो. पण करिना म्हणते की बघ या दोघी पण बोलत असतात. मलाही माझी बहिण करिश्माचा सारखा फोन येत असतो. मी आणि माझी बहिण पण सारखं फोनवर बोलत असतो. कोणतंही कारण नसताना आम्ही बोलतो, असं आलिया या व्हीडिओमध्ये म्हणते आहे.
View this post on Instagram
गौतमी काय म्हणाली?
आलियाचा हा व्हीडिओ गौतमीने शेअर केलाय. त्यावर ती म्हणते, माझ्यासोबत असं कधीच होत नाही. कारण माझी बहिण कायम म्हणते की, अर्जंट नाहीये ना? जरा वेळात फोन करते. पण ती कॉल बॅक करतच नाही, असं गौतमीने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
गौतमी आणि मृण्मयीचा मजेशीर व्हीडिओ…
गौतमी आणि मृण्मयीचं नातं प्रचंड फ्रेंडली आहे. दोघीही एकमेकींसोबतचे व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. आय लायनर लावतानाचा मृण्मयी आणि गौतमीचा हा व्हीडिओ…
View this post on Instagram
गौतमी आणि मृण्मयी यांचं नातं प्रचंड खेळकर आहे. नुकतंच गौतमीचा वाढदिवस झाला. वाढदिवशी गौतमीला शुभेच्छा देतानाचा हा खास व्हीडिओ…
View this post on Instagram
गौतमी आणि स्वानंद तेंडुलकर यांनी काहीच दिवसांआधी लग्न केलं. गौतमीच्या लग्नातील मृण्मयीचा हा व्हीडिओ…
View this post on Instagram