AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिनेमासाठी मिळालेला नॅशनल अवॉर्ड चोरीला गेला तेव्हा…; नागराज मंजुळेंचे विचार तुम्हाला प्रेरणा देतील

Sairat Movie Director Nagraj Manjule on His Life Experience : वारंवार येणारं अपयश अन् नॅशनल अवॉर्डची चोरी...; नागराज मंजुळे नेमकं काय म्हणाले? पुरस्कार चोरीला गेला तो प्रसंग नेमका काय होता? या प्रसंगनंतर नागराज मंजुळे यांच्या मनात कोणता विचार आला? वाचा सविस्तर...

सिनेमासाठी मिळालेला नॅशनल अवॉर्ड चोरीला गेला तेव्हा...; नागराज मंजुळेंचे विचार तुम्हाला प्रेरणा देतील
| Updated on: Mar 30, 2024 | 3:07 PM
Share

मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी हालाखीच्या परिस्थितीतून स्वत:ला उभं केलं. अनेकदा अपयश आल्यानंतर नागराज मंजुळे यांनी प्रचंड यशही अनुभवलं आहे. एका मुलाखती दरम्यान नागराज मंजुळे त्यांच्या जीवनातील यश-अपयशावर बोलते झाले. अनेकदा अपयश पचवल्यानंतर नागराज मंजुळे यांनी ‘पिस्तुल्या’ सिनेमा केला. या सिनेमासाठी त्यांना नॅशनल अवॉर्ड मिळाला. मात्र हा अवॉर्ड चोरीला गेला. यानंतर नागराज मंजुळे अतिशय शांतपणे व्यक्त झाले. त्यांची जी प्रतिक्रिया होती. त्यामुळे तुम्हाला प्रेरणा मिळेल.

अन् नॅशनल अवॉर्ड चोरीला गेला…

फॅन्ड्री सिनेमाचं शुटिंग होतं. शुटिंगचा शेवटचा दिवस होता. म्हणून मी आईला शुटिंगला बोलावलं होतं. पण त्याच दिवशी आमच्या घरात चोरी झाली. तेव्हा ‘पिस्तुल्या’ सिनेमासाठी मिळालेला नॅशनल अवॉर्ड चोरीला गेला. माझ्या भावाने मला या चोरीबद्दल सांगितलं. ही चोरी झाली तेव्हा माझी आई घरी होती. म्हणून मग मी आधी विचारलं ती कशी आहे. तिला काही झालं तर नाही ना… याची मी आधी चौकशी केली, असं नागराज यांनी सांगितलं.

नागराज काय म्हणाले?

मग मी विचार केला की चोराला कधी नॅशनल अवॉर्ड मिळणार? म्हणून मग म्हटलं झालं ते झालं… चोरांना कदाचित माहितही नसेन की तो नॅशनल अवॉर्ड आहे म्हणून… त्यांना वाटलं असेल की काही तरी चांदीचं आहे. म्हणून त्यांनी ते नेलं असेल… पण त्याचं पुढे काय झालं असेल ते त्यांनाच माहिती… ते कुणाला विकलं असेल की ते कुठे पडून असेन माहिती नाही, असं नागराज मंजुळे म्हणाले.

अनेकांना वाटलं की मला याचं वाईट वाटलं असेल. कवी किशोर कदम मला म्हणाले की तुला वाईट वाटलं असेल. पण पुढच्या फॅन्ड्री सिनेमाला तुला अवॉर्ड मिळेल. पण मला हे अवॉर्ड मिळावं म्हणून मी काम नाही करत. पण पिस्तुल्याला नॅशनल अवॉर्ड मिळेल, असं मला अजिबात वाटलं नव्हतं. मी विसरून गेलो होतो. तेव्हा तो नॅशनल अवॉर्ड मिळाला. माझ्या भावाला पण खूप वाईट वाटलं. पण मी त्यालाही म्हटलं की, चोराला कुठं नॅशनल अवॉर्ड मिळतं? जाऊ दे तू कशाला टेन्शन घेतो. असं मी माझ्या भावाला समजावलं, असं नागराज मंजुळे म्हणाले.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.