‘लाडाची मी लेक गं’ फेम अभिनेत्री स्मिता तांबेने शेअर केला लेकीचा पहिला फोटो, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव!

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘लाडाची मी लेक गं’मधील ‘मम्मी’ फेम अभिनेत्री स्मिता तांबे (Smita Tambe) हिने प्रेक्षकांना आणि चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. अभिनेत्री स्मिता तांबेच्या घरी चिमुकल्या पाहुणीचे आगमन झाले आहे. स्मिताने आपल्या लेकीची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे.

‘लाडाची मी लेक गं’ फेम अभिनेत्री स्मिता तांबेने शेअर केला लेकीचा पहिला फोटो, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव!
Smita Tambe
| Edited By: | Updated on: Sep 14, 2021 | 12:24 PM

मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘लाडाची मी लेक गं’मधील ‘मम्मी’ फेम अभिनेत्री स्मिता तांबे (Smita Tambe) हिने प्रेक्षकांना आणि चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. अभिनेत्री स्मिता तांबेच्या घरी चिमुकल्या पाहुणीचे आगमन झाले आहे. स्मिताने आपल्या लेकीची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे.

या पोस्टमध्ये स्मिता आणि तिचा पती त्यांच्या चिमुकल्या लेकीसोबत भविष्याची स्पप्न पाहताना दिसत आहेत. या गोड फोटोवर चाहते आणि कलाकार शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

पाहा पोस्ट :

स्मिताची मैत्रीण-कोरिओग्राफर फुलवा खामकर हिने एक खास व्हिडीओ शेअर करत ही स्मिताची गोड बातमी सगळ्या चाहत्यांना सांगितली होती.

मैत्रिणींनी आयोजित केला होता डोहाळेजेवण सोहळा

फुलवा खामकरने शेअर केलेल्या या खास व्हिडीओत अभिनेत्री स्मिता तांबे हीचं डोहाळेजेवणाचा कायर्क्रम दिसला होता. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिशय सध्या आणि सोप्या पद्धतीने हा डोहाळजेवणाचा कार्यक्रम पार पडला होता. या कार्यक्रमात स्मिताच्या खास जवळच्या मैत्रिणी अर्थात अभिनेत्री अदिती सारंगधर, अमृता संत आणि रेषां टिपणीस सहभागी झाल्या होत्या.

पाहा व्हिडीओ :

या खास प्रसंगी मैत्रिणींनी मिळून स्मिताला फुलांच्या दागिन्यांनी सजवलं होतं. गाणी म्हणत या मैत्रिणींनी स्मिता भोवती फेर धरला होता. ‘कुणीतरी येणार येणार गं’ या गाण्यावर सगळ्या जणींनी ठेका धरला होता. शिवाय स्मिताचे पति धिरेंद्र यांनीही या सोहळ्यात डान्स केला. स्मिताच्या डोहाळे जेवणाचा हा गोड व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला होता.

अभिनेत्रीची कारकीर्द

अभिनेत्री स्मिता तांबेचा जन्म महाराष्ट्रात साताऱ्यामध्ये झाले. तर तिचं बालपण पुण्यात गेलं. मनोरंजन विश्वात करिअर करण्यासाठी म्हणून स्मिता मुंबईत आली. मराठी सोबतच स्मिताने हिंदी मनोरंजन विश्वातही आपल्या अभिनायचा ठसा उमटवला आहे. ‘अनुबंध’, ‘लाडाची लेक गं’ या मालिका, ‘तुकाराम’, ‘जोगवा’, ‘७२ मैल एक प्रवास’, ‘परतु’, ‘गणवेश’ हे चित्रपट आणि ‘हमिदाबाईची कोठी’ या नाटकातून तिने आपल्या अभिनयची चुणूक दाखवली. याच बरोबर ती ‘सिंघम रिर्टन्स’, ‘रुख’, ‘नूर’, ‘डबल गेम’ या हिंदी चित्रपटांमध्येही ती झळकली होती.

स्मिता तांबेने अभिनेता विरेंद्र द्विवेदीसोबत 18 जानेवारी 2019 रोजी लग्न लग्नगाठ बांधली होती. विरेंद्र द्विवेदी हा नाट्य कलाकार असून, त्यांचे लग्न महाराष्ट्रीयन आणि उत्तर भारतीय अशा दोन्ही पारंपरिक पद्धतीने पार पडले होते.

हेही वाचा :

‘आमच्या गुटखा किंगसमोर फिका पडतोय हा मार्वल हिरो’, शांग-चीला पाहून प्रेक्षकांना आली अजय देवगणची आठवण!

Met Gala 2021 : रेड कार्पेटवर दिसली सेलेब्सची जबरदस्त फॅशन, नेहमीप्रमाणेच किम कार्दशियनची अनोख्या स्टाईलमध्ये हजेरी