‘आमच्या गुटखा किंगसमोर फिका पडतोय हा मार्वल हिरो’, शांग-चीला पाहून प्रेक्षकांना आली अजय देवगणची आठवण!

जर तुम्ही इंटरनेटच्या जगात सक्रिय असाल, तर तुम्हाला चांगले माहित असणे आवश्यक आहे की, मीम्सशिवाय सोशल मीडियाचे जग पूर्णपणे अपूर्ण आहे. तुम्ही याचा अंदाज लावू शकता की, लोक प्रत्येक मोठ्या मुद्द्यावर मीम्सचा जोरदार पाऊस पाडत असतात, यातील काही मीम्स इतके धमाल असतात की, त्यांना पाहिल्यावर प्रत्येकजण पोट धरून हसतो.

‘आमच्या गुटखा किंगसमोर फिका पडतोय हा मार्वल हिरो’, शांग-चीला पाहून प्रेक्षकांना आली अजय देवगणची आठवण!
अजय देवगणशी संबंधित अनेक मजेदार मीम्स सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.
Follow us
| Updated on: Sep 14, 2021 | 11:35 AM

मुंबई : जर तुम्ही इंटरनेटच्या जगात सक्रिय असाल, तर तुम्हाला चांगले माहित असणे आवश्यक आहे की, मीम्सशिवाय सोशल मीडियाचे जग पूर्णपणे अपूर्ण आहे. तुम्ही याचा अंदाज लावू शकता की, लोक प्रत्येक मोठ्या मुद्द्यावर मीम्सचा जोरदार पाऊस पाडत असतात, यातील काही मीम्स इतके धमाल असतात की, त्यांना पाहिल्यावर प्रत्येकजण पोट धरून हसतो. आजकाल अजय देवगणच्या (Ajay Devgn) ‘जिगर’ (Jigar) या चित्रपटाचे मीम एका खास कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत आले आहे.

यावेळी अजय देवगण इंटरनेट विश्वात चर्चेचा विषय बनला आहे, कारण हॉलिवूड चित्रपट शांग ची पाहिल्यानंतर लोकांनी असे काहीतरी शोधले, ज्याचा आनंद अवघ्या सोशल मीडियाला झाला आहे. वास्तविक असे घडले की, अजय 1992च्या ‘जिगर’ या चित्रपटात मार्शल आर्ट करताना दिसला होता. या दृश्यात, अजयच्या हातात काही रिंग्स आहेत, आता या रिंग्सची तुलना शांग चीच्या जादुई रिंगांशी केली जात आहे.

पाहा व्हिडीओ :

View this post on Instagram

A post shared by FilterCopy (@filtercopy)

अशा प्रसंगी या सीन्सवर लोक मीम्स बनवणार नाहीत, असे कसे होईल? या नंतर  काही लोकांनी काही मजेदार मॅशअप व्हिडीओ ऑनलाईन पोस्ट केले. फिल्टर कॉपीने “लवकरच तुमच्या जवळच्या पानवाल्याच्या दुकानात, 3डीमध्ये” नावाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यातील एका दृश्यात अजय देवगणला रिंग्स घालताना दाखवले आहे, ज्यात त्याच्या हातातून लाल द्रव बाहेर येत आहे. कमेंट सेक्शनमध्ये, एक वापरकर्ता त्याच्या पान मसाला जाहिरातीसाठी अभिनेत्याला बोल लगावत आहे. त्याचवेळी, दुसऱ्या वापरकर्त्याने सांगितले की, अजय देवगणसमोर शांग चीचा मार्शल आर्ट पूर्णपणे फिका पडला आहे.

सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

या व्यतिरिक्त, इतर अनेक लोकांनी गमतीने सांगितले की, मार्वलला आता सापडलेली शांग चीची रिंग आमच्यासाठी मात्र, खूप जुनीच आहे. सोशल मीडियावर फिरत असलेले मीम्स खरोखरच मजेदार आहेत. जे पाहून सगळ्यानांच हसू आवरत नाहीये. ‘शांग-ची अँड द लिजेंड ऑफ द टेन रिंग्ज’ या चित्रपटाचे दिग्दर्शन डेस्टिन डॅनियल क्रेटन यांनी केले आहे आणि यात सिमू लियू, अक्वाफिना, मिशेल येओह आणि टोनी लिउंग यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट 3 सप्टेंबर रोजी भारतात प्रदर्शित झाला आणि आता तो जगभर पसंत केला जात आहे.

हेही वाचा :

Love Story | लग्नानंतरही एकमेकांपासून राहिले दूर, अतिशय फिल्मी आहे आयुष्मान-ताहिरा कश्यपची प्रेमकथा!

Happy Birthday Ayushmann Khurrana | अभिनेता होण्यापूर्वी रेडिओ जॉकी म्हणूनही प्रसिद्ध होता आयुष्मान खुराना, जाणून घ्या काही खास गोष्टी!

This Week OTT Releases |  ‘बेल बॉटम’ ते ‘अनकही कहानिया’, या आठवड्यात ओटीटीवर होणाऱ्या सीरीज आणि चित्रपटांची यादी

Non Stop LIVE Update
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.