Love Story | लग्नानंतरही एकमेकांपासून राहिले दूर, अतिशय फिल्मी आहे आयुष्मान-ताहिरा कश्यपची प्रेमकथा!

असे म्हटले जाते की, प्रेमात आकंठ बुडालेली व्यक्ती काहीही करू शकते. बॉलिवूडमध्येही असे अनेक कलाकार आहेत, ज्यांची प्रेमकथा खूप रंजक आहे. त्यापैकी एक म्हणजे आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) आणि ताहिरा कश्यप (Tahira Kashyap)

Love Story | लग्नानंतरही एकमेकांपासून राहिले दूर, अतिशय फिल्मी आहे आयुष्मान-ताहिरा कश्यपची प्रेमकथा!
Ayushmann-Tahira

मुंबई : असे म्हटले जाते की, प्रेमात आकंठ बुडालेली व्यक्ती काहीही करू शकते. बॉलिवूडमध्येही असे अनेक कलाकार आहेत, ज्यांची प्रेमकथा खूप रंजक आहे. त्यापैकी एक म्हणजे आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) आणि ताहिरा कश्यप (Tahira Kashyap). आपल्या कारकिर्दीत खूप संघर्ष करणाऱ्या आयुष्मानची प्रेमकथा बरीच रोचक आहे. आज, अभिनेत्याच्या वाढदिवशी, आम्ही तुम्हाला त्याच्या प्रेमकथेविषयी सांगणार आहोत.

आयुष्मानने स्वतःहून सिनेसृष्टीत स्वतःचे एक विशेष स्थान निर्माण केले आहे. आज जिथे आयुष्मान आहे बऱ्याचदा तिथे अनेक मोठे कलाकार तिथे पोहोचू शकत नाहीत. अभिनेत्याची पत्नी ताहिरासोबतची प्रेमकथा देखील खूप फिल्मी आहे…

कशी सुरू झाली प्रेमकथा?

आयुष्मान खुराना आणि ताहिरा यांच्या प्रेमकथेची सुरुवात फिजिक्स कोचिंग क्लासमुळे झाली. त्यावेळी दोघेही अकरावी-बारावीत शिकत होते. त्यांची एकमेकांजवळ येण्याची कथाही खूप मजेदार आहे. एकदा अभिनेत्याचा भाऊ अपारशक्तीने स्वतः एका मुलाखतीत सांगितले होते की, माझ्या वडिलांचा ज्योतिषीचा कॉलम वर्तमानपत्रात प्रसिद्ध व्हायचे, याच पेपरमध्ये ताहिराचे वडील राजन कश्यप काम करत होते. बाबा आणि काका एकमेकांना ओळखत होते. त्याच वेळी, ताहिरा आणि आयुष्मान कोचिंगवर भेटत असत.

डिनर दरम्यान झाली भेट

एके दिवशी आयुष्मान आणि ताहिराच्या वडिलांनी ठरवले की, दोन्ही कुटुंबांनी एकत्र घरी जेवण करावे. मात्र, हे आयुष्मान-ताहिरा यांना माहित नव्हते. संध्याकाळी दोन्ही कुटुंब जेवणासाठी एकत्र जमली, तेव्हा आयुष्मान आणि ताहिरा एकमेकांना पाहून स्तब्ध झाले. कोचिंग क्लास वरून दोघेही एकत्र आले होते. त्या वेळी दोघांनाही माहित नव्हते की, आता ते एकमेकांच्या कुटुंबातील सदस्यांसमोरही भेटणार आहेत.

प्रत्येकाला शाळेपासून सुरू झालेली दोघांची प्रेमकथा आवडते. दोघांनी चंदीगडमध्ये एकत्र थिएटर केले. असे म्हटले जाते की, या दोघांचे पहिल्याच नजरेत एकमेकांवर प्रेम बसले होते. आयुष्मानने प्रथम त्याचा भाऊ अपारशक्तीला ताहिराबद्दल सांगितले होते.

लग्नानंतरही एकमेकांपासून राहिले दूर

लग्नानंतरही दोघेही चार वर्षांपासून लाँग डीस्टंस रिलेशनशिपमध्ये होते. त्यावेळी आयुष्मान खुराना मुंबईत आणि ताहिरा चंदीगडमध्ये राहत होते. तोपर्यंत त्यांचा पहिला मुलगा विराज याचा जन्म झाला होता. जेव्हा दोघांनाही एक मुलगी झाली, तेव्हा ताहिरा मुंबईला शिफ्ट झाली. या अंतरामुळे त्यांचे नाते अधिक मजबूत झाले आहे. हेच कारण आहे की, जेव्हा ताहिराला कर्करोगाचे निदान झाले, तेव्हा आयुष्मानने तिला प्रत्येक पावलावर साथ दिली. आज हे सुंदर जोडपे आनंदाने एकत्र आयुष्य जगत आहे. दोघांना बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट जोडपे मानले जाते.

हेही वाचा :

Happy Birthday Ayushmann Khurrana | अभिनेता होण्यापूर्वी रेडिओ जॉकी म्हणूनही प्रसिद्ध होता आयुष्मान खुराना, जाणून घ्या काही खास गोष्टी!

Lookalike : मर्लिन मुनरोच्या ‘या’ कार्बन कॉपी पाहून तुम्ही देखील व्हाल अवाक्, पाहा फोटो…

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI