This Week OTT Releases |  ‘बेल बॉटम’ ते ‘अनकही कहानिया’, या आठवड्यात ओटीटीवर होणाऱ्या सीरीज आणि चित्रपटांची यादी

गेल्या आठवड्यात प्रेक्षकांनी ओटीटीवर 'थलायवी' ते 'हेल्मेट' सारखे चित्रपट, तसेच 'लुसिफर सीझन 6' सारख्या सीरीज पाहिल्या असतील. आज आम्ही तुम्हाला या आठवड्यात रिलीज होणाऱ्या चित्रपट आणि वेब सीरीज बद्दल सांगणार आहोत, तसेच ते कधी, कुठे रिलीज होतील, हे जाणून घेणार आहोत.

This Week OTT Releases |  ‘बेल बॉटम’ ते ‘अनकही कहानिया’, या आठवड्यात ओटीटीवर होणाऱ्या सीरीज आणि चित्रपटांची यादी
OTT release

मुंबई : गेल्या आठवड्यात प्रेक्षकांनी ओटीटीवर ‘थलायवी’ ते ‘हेल्मेट’ सारखे चित्रपट, तसेच ‘लुसिफर सीझन 6’ सारख्या सीरीज पाहिल्या असतील. आज आम्ही तुम्हाला या आठवड्यात रिलीज होणाऱ्या चित्रपट आणि वेब सीरीज बद्दल सांगणार आहोत, तसेच ते कधी, कुठे रिलीज होतील, हे जाणून घेणार आहोत. ओटीटीवर वेब सीरीज आणि चित्रपटांच्या रिलीजमुळे प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी बरीच व्यवस्था झाली आहे. कोरोनाच्या काळात चित्रपटगृहे बंद असताना सिनेमा प्रेमींच्या मनात प्रश्न निर्माण झाला होता की, ते आता नवीन चित्रपट कसे पाहतील? मात्र, आता सिनेमा जग आपल्या जुन्या रूपात परतत आहे.

अशा परिस्थितीत नेटफ्लिक्स, Amazon प्राइम, हॉटस्टार यासारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आता आणखी काही चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यासोबतच गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या विषयांवर बनवलेल्या वेब सीरीजही ओटीटीवर प्रदर्शित होत आहेत. चला तर, या आठवड्यात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची आणि वेब सीरीजची यादी पाहूया…

सेक्स एज्युकेशन सीझन 3

वेब सीररीज सेक्स एज्युकेशनचा तिसरा सीझन, ज्याने संवेदनशील विषय प्रेक्षकांसमोर मजेशीरपणे मांडला आहे, तो सप्टेंबरमध्ये रिलीज होणार आहे. आतापर्यंत आलेल्या या वेब सीरीजचे दोन सीझन प्रेक्षकांना चांगलेच आवडले आहेत. आता तिसरा सीझन 17 सप्टेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.

अनकही कहानिया

‘अनकही कहानिया’ ही सीरीज 17 सप्टेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे. ही तीन वेगवेगळ्या कथांची सीरीज आहे, ज्यात कुणाल कपूर, अभिषेक बॅनर्जी, रिंकू राजगुरू, झोया हुसेन, निखिल द्विवेदी मुख्य भूमिका साकारणार आहेत.

नकाब

नकाब ही एक क्राईम थ्रिलर सीरीज आहे, ज्यामध्ये मल्लिकाने ग्लॅमरस भूमिका साकारली आहे. त्याचबरोबर ईशा गुप्ता एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. नकाब 15 सप्टेंबरला एमएक्स प्लेअरवर रिलीज होणार आहे. नकाबमध्ये गौतम रोडेचे पात्र एका हायप्रोफाईल खून प्रकरणाचे गूढ सोडवताना दिसेल, ज्यामध्ये प्रेक्षकांना खूप सस्पेन्स पाहायला मिळणार आहे.

बेल बॉटम

अभिनेता अक्षय कुमारचा चित्रपट ‘बेल बॉटम’ चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाल्यानंतर काही आठवड्यांनी, म्हणजेच 16 सप्टेंबरपासून ऑनलाईन प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. रणजीत एम तिवारी दिग्दर्शित या चित्रपटात लारा दत्ता, हुमा कुरेशी आणि वाणी कपूर यांच्याही भूमिका आहेत. अभिनेत्याने रविवारी या बद्दल माहिती देताना लिहिले की, ‘तुम्हाला तारीख आठवते, आम्ही तुम्हाला मिशनची आठवण करून देऊ. ‘बेल बॉटम’ अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर 16 सप्टेंबर रोजी रिलीज होत आहे.’

हेही वाचा :

‘लाल सिंह चड्ढा’च्या चित्रीकरणाला मुंबईत सुरुवात, दाढी-पगडीमध्ये स्पॉट झाला आमिर खान! पाहा खास लूक…

TMKOC | ‘बबिता जी’ फेम मुनमुन दत्तासोबत रिलेशनशिपची चर्चा, पाहा काय म्हणाला ‘टप्पू’?

Video | पॅरानॉर्मल तज्ज्ञ स्टीव्ह हफचा सिद्धार्थ शुक्लाशी संवाद, पाहा काय म्हणाला अभिनेत्याचा आत्मा?

Little Kiara : ‘ही’ लहान मुलगी अभिनयात कियारा आडवाणी पेक्षाही वरचढ, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI