लॉकडाऊनच्या वेळेचा सदुपयोग, शेतीत रमलीय चित्रपट-मालिका विश्वातली ‘ही’ प्रसिद्ध जोडी!

| Updated on: Dec 07, 2020 | 1:19 PM

रश्मी-अमित या दोघांनाही बागकामाची प्रचंड आवड आहे. यातूनच त्यांनी हा उपयोगी छंद जोपासला आहे. लॉकडाऊनच्या काळात त्यांनी छान असा मळा फुलवला आहे.

लॉकडाऊनच्या वेळेचा सदुपयोग, शेतीत रमलीय चित्रपट-मालिका विश्वातली ‘ही’ प्रसिद्ध जोडी!
Follow us on

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात फावल्या वेळेत सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनीच अनेक छंद जोपासले. अनेकांनी या मोकळ्या वेळेचा सदुपयोग करत नवीन नवीन गोष्टी केल्या. पण काहींनी हाच छंद व्यवसायातही रुपांतरीत केला आहे आणि यामुळेच त्यांना नवी दिशासुध्दा मिळालीय. मराठी चित्रपट-टेलिव्हिजनची प्रसिध्द अभिनेत्री रश्मी अनपट (Marathi Actress Rashmi Anpat) आणि तिचा पती अभिनेता अमित खेडेकर या सेलिब्रिटी जोडीने लॉकडाऊनच्या काळात अशीच एक अनोखी वाट चोखंदळली आहे (Marathi Film Actress Rashmi Anpat and husband ameet khedekar share’s a photo of their farm).

रश्मी-अमित या दोघांनाही बागकामाची प्रचंड आवड आहे. यातूनच त्यांनी हा उपयोगी छंद जोपासला आहे. लॉकडाऊनच्या काळात त्यांनी छान असा मळा फुलवला आहे. त्याची मशागत करणं, खतपाणी करणं याकडे दोघंही जातीने लक्ष देऊन काम करतायत आणि त्याची शब्दश: फळंसुध्दा त्यांना लवकरच मिळणार आहेत.

मेहनतीचे फळ

आपल्या घरच्या शेतीचे सुंदर असे हे फोटो शेअर करत रश्मी म्हणते, “माणसाने नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न कायम केला पाहिजे … लॉकडाऊनच्या काळात नवीन गोष्टी शिकण्यासाठी केलेल्या मेहनतीच फळ आता दिसतंय … Stay tuned..”­­­ रश्मी प्रमाणेच अमित खेडेकरने देखील त्यांच्या या बागेचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अभिनय क्षेत्रात सक्रिय जोडी..

अभिनेत्री रश्मी अनपट आणि अभिनेता अमित खेडेकर यांनी 26 डिसेंबर 2016मध्ये लग्नगाठ बांधली होती.  हे दोघेही पती-पत्नी मनोरंजन विश्वात सक्रिय आहेत. रश्मी अनपट आणि तिचा नवरा अमित खेडेकर ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या ऐतिहासिक नाटकात एकत्र काम करत होते. या नाटकाच्या सेटवर त्यांचे सूत जुळले. पुण्यात जन्मलेल्या रश्मीने अभिनयाच्या आवडीने मुंबई गाठली होती. ‘मन उधाण वाऱ्याचे’ या मालिकेत तिने साकारलेली ‘ईश्वरी’ आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे (Marathi Film Actress Rashmi Anpat and husband ameet khedekar share’s a photo of their farm).

यानंतर तिने ‘सुवासिनी’ आणि ‘पुढचं पाऊल’ या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारली होती. 2016मध्ये तिने ‘फ्रेशर्स’ या मालिकेत ‘मनवा’ही व्यक्तिरेखा साकारली होती. या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. तिने ‘अवताराची गोष्ट’ या चित्रपटातही काम केले होते.

मनोरंजन विश्वातून ब्रेक

‘फ्रेशर्स’ या मालिकेनंतर रश्मीने आई होण्याचा निर्णय घेत मनोरंजन विश्वातून ब्रेक घेतला होता. रश्मी आणि अमितला यांना एक मुलगा आहे. मुलाच्या जन्मानंतर रश्मीने ‘अग्निहोत्र 2’ या प्रसिद्ध मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन केले होते.

(Marathi Film Actress Rashmi Anpat and husband ameet khedekar share’s a photo of their farm)