Bam Bam Bhole : ‘शिवप्रताप गरुडझेप’मधील ‘बम बम भोले’ गाणं प्रदर्शित, प्रेक्षकांची पसंती

'शिवप्रताप गरुडझेप'मधील 'बम बम भोले' गाणं प्रदर्शित

Bam Bam Bhole : 'शिवप्रताप गरुडझेप'मधील 'बम बम भोले' गाणं प्रदर्शित, प्रेक्षकांची पसंती
Follow us
| Updated on: Jul 27, 2022 | 8:29 AM

मुंबई : शिवचरित्रातील महत्त्वाचा अध्याय असलेल्या ‘आग्र्याहून सुटकेचा’ थरार लवकरच ‘शिवप्रताप गरुडझेप’ (Shivpratap Garudzep) चित्रपटातून आपल्यासमोर येणार आहे. त्याअगोदर या चित्रपटातील ‘बम बम भोले’ (Bam Bam Bhole Song) हे शिवशंकर आराधनेचे गीत प्रेक्षकांसमोर आले आहे. अंगाला भस्मविभूती फासलेल्या, जटाधारी साधूंच्या जबरदस्त नृत्यविष्काराने हे गीत आकर्षणाचा विषय ठरत आहे. अल्पावधीतच हे गीत सर्वत्र व्हायरल झालेले दिसते आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांची आग्रा येथे झालेली भेट, महाराजांची नाट्यमय सुटका यातून छत्रपती शिवाजी महाराजांनी अख्ख्या हिंदुस्थानाला दाखवून दिलेल्या आपल्या बुद्धीचातुर्याची आणि मुत्सदेगिरीची कथा आपल्याला ‘शिवप्रताप गरुडझेप’ चित्रपटातून पहायला मिळणार आहे. ‘जगदंब क्रिएशन’ प्रस्तुत करीत असलेल्या डॉ. अमोल रामसिंग कोल्हे (Amol Kolhe) निर्मित ‘शिवप्रताप गरुडझेप’ चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक राजाराम केंढे यांनी केले आहे. येत्या सप्टेंबरमध्ये ‘शिवप्रताप गरुडझेप’ प्रेक्षक दरबारी दाखल होणार आहे.

महाविरागी सदा अभोगी करीत त्रिलोक विहार सबसुख त्यागी स्मशान योगी भोले विश्वाधार ‘बम बम भोले, बभूतवाले बम बम भोले’

अशी अतिशय आशयघन शब्दरचना गीतकार ऋषीकेश परांजपे यांची असून संगीत शशांक पोवार यांचे आहे. दीपाली विचारे यांचे नृत्यदिग्दर्शन आहे तर छायांकन संजय जाधव यांचे आहे. या गाण्यातला जोश प्रत्येकाला मंत्रमुग्ध करणारा आहे. या नृत्याविष्काराच्या पार्श्वभूमीवर औरंगजेबाच्या भेटीसाठी आलेले छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या लालकिल्ल्यात आत्मविश्वासाने प्रवेश करताना दिसत आहेत. ‘जगदंब क्रिएशन’ प्रस्तुत करीत असलेल्या डॉ. अमोल रामसिंग कोल्हे निर्मित ‘शिवप्रताप गरुडझेप’ चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक राजाराम केंढे यांनी केले आहे. येत्या सप्टेंबरमध्ये ‘शिवप्रताप गरुडझेप’ प्रेक्षक दरबारी दाखल होणार आहे.

हे सुद्धा वाचा

छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांची आग्रा येथे झालेली भेट, महाराजांची नाट्यमय सुटका यातून छत्रपती शिवाजी महाराजांनी अख्ख्या हिंदुस्थानाला दाखवून दिलेल्या आपल्या बुद्धीचातुर्याची आणि मुत्सदेगिरीची कथा आपल्याला ‘शिवप्रताप गरुडझेप’ चित्रपटातून पहायला मिळणार आहे. ‘महाराजांनी प्रत्येकामध्ये आत्मविश्वास आणि चेतना जागवली. हे गाणंही तसंच असून प्रत्येकाला या गाण्यातून प्रेरणा मिळेल, असा विश्वास चित्रपटाचे निर्माते, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला. ‘जगदंब क्रिएशन’ प्रस्तुत करीत असलेल्या डॉ. अमोल रामसिंग कोल्हे निर्मित ‘शिवप्रताप गरुडझेप’ चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक राजाराम केंढे यांनी केले आहे. येत्या सप्टेंबरमध्ये ‘शिवप्रताप गरुडझेप’ प्रेक्षक दरबारी दाखल होणार आहे.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.