Bigg Boss 20 : कमीत कमी खरं तरी बोला… मेरी कोमवर का भडकली माजी स्पर्धक ?
Bigg Boss 20 : गौहर खान बिग बॉसची मोठी फॅन आहे, ती दरवर्षी हा शो फॉलो करते आणि त्यावर मत मांडत असते. नुकत्याच एका व्हिडीओमध्ये तिने मेरी कोमला चांगलंच सुनावलं. असं काय घडलं ?

Bigg Boss 20 : टीव्हीवरील बहुचर्चित आणि वादग्रस्त रिॲलिटी शो म्हणजे बिग बॉस (Bigg Boss 20 ). सध्या या शोचा 20 वा सीझन सुरू असून दिवसेंदिवस हा खेळ आणखीनच रंजक होत चालला आहे. सध्या घरात 2 ग्रुप्स बनले आहेत, ज्यांच्यात प्रत्येक मुद्यावर वाद होत असतात. विख्यात बॉक्सर मेरी कोमनेही या शो मध्ये सहभाग घेतला असून आत्तापर्यंत तिने फार कमी मुद्यांवर आपलं मत मांडलं आहे. मात्र गेल्या एपिलसोडमध्ये मेरी कोमने असं काही केलं , जे पाहून बिग बॉसची माजी स्पर्धक आणि या शोची माजी विजेती गौहर खान ही तिच्यावर चांगलीच भडकली. त्यानंतर गौहर खानने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत मेरी कोमला चांगलंच सुनावलं, तिला फटकारलं. अनेक चाहत्यांनी देखील गौहर खानला यावर पाठिंबा दिला.
नेमकं घडलं तरी काय ?
खरं तर, मेरी कॉम हिने ‘एंग डीएस ए’च्या ग्रुपमध्ये जाऊन माही विजविरोधात खोट्या गोष्टी सांगितल्या. त्यानंतर यंगला हे ऐकून खूप वाईट वाटलं आणि तो भावूक झाला. मेरी कॉमने सांगितलं की, माही ही यंगला शिवीगाळ करत होती. हे ऐकल्यानंतर आम्रपालीनेही यंगला मिठी मारली आणि स्काउटही भडकला. मात्र, मेरी कॉमने दिलेल्या याच चुकीच्या माहितीवरून गौहर खानने तिच्यावर टीका केली आहे.
गौहर खान भडकली
हा एपिसोड पाहिल्यावर गौहर खानने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये तिने तिला चांगलंच सुनावलं. ती म्हणाली, “ मेरी कॉम जी, तुम्ही लेजेंड आहात. संपूर्ण देश आणि जग तुमच्यावर प्रेम करतं. तुम्ही खेळाच्या क्षेत्रातील एवढ्या मोठ्या व्यक्ती आहात. त्यामुळे कृपया थोडं तरी खरं बोला. जर तुम्ही इथली काही माहिती घेऊन दुसरीकडे जात असाल, तर कृपया सत्यच बोला.” असं तिने सुनावलं.
एवढंच नव्हे तर, या व्हिडिओमध्ये गौहरने माहीने नेमकं काय म्हटलं होतं, हेही स्पष्ट केलं. “यार, मला वाईट वाटतंय की मी काहीतरी सिद्ध करण्यासाठी माझ्या मुलीची शपथ घेतली, जी खूप मोठी गोष्ट आहे.” असं अ माहीने कालच्या एपिसोडमध्ये म्हटल्याचं गौहरने सांगितलं. गौहरने पुढे सांगितलं की, माहीने जी शिवी दिली होती, ती त्या परिस्थितीला आणि स्वतःलाच उद्देशून होती, यंग डीएसला नाही. माहीने म्हटलं होतं, “यार ****, मी माझ्या मुलीची शपथ घेतली” असं पुढे उदाहरण देताना गौहरने सांगितलं.
चुकीच्या पद्धतीने मांडली गोष्ट
गौहरने पुढे सांगितलं की, मेरी कॉमने ही गोष्ट यंग डीएससमोर चुकीच्या पद्धतीने मांडली. तिने सांगितलं की, माही यंगला शिवी देत होती आणि म्हणत होती की, “ मी त्याला माझा मुलगा बनवलं.” यंग अजून खूप लहान आहे, त्यामुळे तो मेरी कॉमच्या बोलण्यावर विश्वास ठेवून प्रभावित झाला. माहीने आपल्याला शिवी दिली, असं वाटून तो निराश झाला, असं गौहरने पुढे नमूद केलं.
वीकेंडच्या वार मध्ये हा मुद्दा घेतला जावा आणि माहीने कोणालाही शिवी दिली नाही, हे क्लिअर केलं जाव, असंही गौहरने म्हटलं.
