या गाण्यात प्रचंड शिव्या असून देखील ठरलं प्रचंड सुपरहिट, ऐकताच गुणगुणतात लोक
कुणाल गांजावाला आणि सुनिधि चौहान यांचं प्रचंड सुपरहिट गाणं, ज्यामध्ये मोठ्या प्रमामात वापरण्यात आलेल्या शिव्या. तरी देखील गाणं प्रेक्षकांमध्ये ठरलं लोकप्रिय.

बॉलिवूडमध्ये काही गाणी त्यांच्या हटके शब्दांमुळे आणि वेगळ्या अंदाजामुळे कायम लक्षात राहतात. असंच एक भन्नाट गाणं म्हणजे ‘आर. राजकुमार’ चित्रपटातील ‘मत मारी’. या गाण्याची खासियत म्हणजे त्याची सुरुवातच एका शिवीगाळीच्या शब्दाने होते. एवढंच नाही, तर संपूर्ण गाण्यात नायक-नायिकेची मस्ती, नोकझोंक आणि एकमेकांना मारलेले टोमणे पाहायला मिळतात.
‘आर. राजकुमार’ हा चित्रपट 2013 मध्ये प्रदर्शित झाला होता. प्रभुदेवा यांनी या मसाला चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. चित्रपटात शाहिद कपूर आणि सोनाक्षी सिन्हा यांची जोडी पाहायला मिळाली होती. चित्रपटासोबतच त्यातील गाणीही चांगलीच गाजली होती.
‘मत मारी’ हे गाणं ठरलं खास
चित्रपटातील इतर गाण्यांच्या तुलनेत ‘मत मारी’ हे गाणं काहीसं वेगळं होतं. गाण्यात शाहिद कपूर आणि सोनाक्षी सिन्हा यांच्यातील मजेशीर भांडण, नोकझोंक आणि खोडकर अंदाज दाखवण्यात आला आहे. गाण्याची सुरुवातच ‘कुत्ता’ या शब्दाने होते. त्यानंतर ‘इडियट’, ‘चोर’, ‘लुक्खा’, ‘लुच्चा’, ‘गंदा’, ‘टुच्चा’, ‘गुंडा’, ‘मवाली’ अशा अनेक शब्दांचा वापर गाण्यात करण्यात आला आहे.
हे गाणं म्हणजे त्याकाळात करण्यात आलेल्या एका हटके प्रयोगासारखं होतं. आशीष पंडित यांनी या गाण्याचे बोल लिहिले असून प्रीतम यांनी संगीत दिलं होतं. तर कुणाल गांजावाला आणि सुनिधी चौहान यांनी हे गाणं आपल्या आवाजात सादर केलं. गाणं शाहिद कपूर आणि सोनाक्षी सिन्हा यांच्यावर चित्रित करण्यात आलं होतं.
‘आर. राजकुमार’च्या अल्बममध्ये अनेक गाजलेली गाणी
‘आर. राजकुमार’च्या अल्बममध्ये जवळपास आठ गाणी होती. ‘गंदी बात’, ‘साड़ी के फॉल सा’, ‘मत मारी’, ‘कद्दू कटेगा’ यांसारखी गाणी त्यात होती. यापैकी काही गाणी मूळ होती, तर काही गाणी जुन्या गाण्यांवर आधारित रिमेक होती. या चित्रपटासाठी सुनिधी चौहान, कुणाल गांजावाला यांच्यासोबत अरिजीत सिंह, मीका सिंह, पलक मुच्छल यांसारख्या गायकांनीही आवाज दिला होता.
शाहिद कपूर आणि सोनाक्षी सिन्हा यांच्यासोबतच सोनू सूद, आशीष विद्यार्थी, मुकुल देव आणि असरानी यांसारखे कलाकारही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. मात्र, चित्रपटातील इतर गाण्यांपेक्षा आपल्या भन्नाट आणि टोमणेबाज बोलांमुळे ‘मत मारी’ हे गाणं आजही वेगळं ठरतं.