AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Meenakshi Seshadri: 30 वर्षांनी मीनाक्षी शेषाद्री येणार प्रेक्षकंच्या भेटीला, या सिनेमात साकारणार महत्त्वाची भूमिका

Meenakshi Seshadri: ३० वर्षांनंतर मुंबईत परतलेली अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री आता चित्रपट आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर पुनरागमन करण्यास सज्ज झाली आहे. 'हिरो' आणि 'दामिनी' या चित्रपटांमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली मीनाक्षी लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झाली होती. आता ती पुन्हा एका सिनेमात दिसणार आहे.

Meenakshi Seshadri: 30 वर्षांनी मीनाक्षी शेषाद्री येणार प्रेक्षकंच्या भेटीला, या सिनेमात साकारणार महत्त्वाची भूमिका
Meenakshi SeshadriImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 17, 2026 | 9:47 AM
Share

अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री यांनी ८० आणि ९० च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या सौंदर्य, अभिनय आणि अप्रतिम नृत्याने एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांनी ‘हिरो’, ‘दामिनी’, ‘घायल’, ‘मेरी जंग’ आणि ‘घातक’ यांसारख्या चित्रपटांत अशा भूमिका साकारल्या, ज्या आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. एकेकाळी हिंदी चित्रपटसृष्टीतील यशस्वी अभिनेत्रींमध्ये गणल्या जाणाऱ्या मीनाक्षी यांनी अचानक चित्रपटसृष्टीला रामराम ठोकसा आणि अमेरिकेत आपल्या कुटुंबासोबत राहू लागल्या. आता सुमारे ३० वर्षे पडद्यापासून दूर राहिल्यानंतर त्यांनी पुन्हा मुंबईकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी त्यांचे प्राधान्य केवळ चित्रपटांत पुनरागमन करणे नाही, तर अशा भूमिका साकारणे आहे, ज्या एक कलाकार म्हणून त्यांना आव्हान देतील.

मीनाक्षी शेषाद्री यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९६३ रोजी झाला. १९८१ साली त्यांनी ‘ईव्ह्ज वीकली मिस इंडिया’चा किताब जिंकला. त्यानंतर त्यांच्यासाठी चित्रपटांचे दरवाजे उघडले. १९८३ साली त्यांनी ‘पेंटर बाबू’ या चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही, परंतु याच वर्षी आलेल्या सुभाष घई यांच्या ‘हिरो’ चित्रपटाने त्यांचे नशीब बदलले. जॅकी श्रॉफसोबतची त्यांची जोडी प्रेक्षकांना आवडली आणि मीनाक्षी रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आल्या. ‘हिरो’च्या यशानंतर त्यांच्याकडे चित्रपटांची रांग लागली. त्यांनी ‘आंधी-तूफान’, ‘मेरी जंग’, ‘स्वाती’, ‘डकैत’, ‘इनाम दस हजार’, ‘शहेनशहा’, ‘जुर्म’, ‘आवारगी’, ‘घायल’, ‘घर हो तो ऐसा’ आणि ‘दामिनी’ यांसारख्या चित्रपटांत काम केले.

१९९३ साली प्रदर्शित झालेला ‘दामिनी’ हा चित्रपट त्यांच्या करिअरमधील एक महत्त्वाचे वळण ठरला. राजकुमार संतोषी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटात त्यांनी अशा एका महिलेची भूमिका साकारली, जी घरकाम करणाऱ्या एका मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराविरोधात आवाज उठवते. स्वतःचे कुटुंब आणि समाजाचा दबाव असूनही ती न्यायासाठी लढा देते. या चित्रपटात ऋषी कपूर आणि सनी देओल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या.

करिअर यशाच्या शिखरावर असताना सोडली इंडस्ट्री

फिल्मी करिअर यशाच्या शिखरावर असताना मीनाक्षी यांनी वैयक्तिक आयुष्याला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला. १९९५ साली त्यांनी गुंतवणूक बँकर हरीश मैसूर यांच्याशी विवाह केला आणि त्या अमेरिकेला गेल्या. त्यानंतर त्यांनी कुटुंब आणि मुलांच्या संगोपनावर लक्ष केंद्रित केले. १९९६ साली आलेला ‘घातक’ हा त्यांचा शेवटच्या मोठ्या चर्चित हिंदी चित्रपटांपैकी एक होता. त्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीपासून दूर राहणे पसंत केले. अमेरिकेत वास्तव्यास असताना त्यांनी स्वतःची नृत्यशाळादेखील सुरू केली, जिथे त्या नृत्याचे शिक्षण देत होत्या.

पुन्हा दिसणार सिनेमात

सुमारे ३० वर्षांनंतर मीनाक्षी यांनी पुन्हा एकदा अभिनयाच्या जगात काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. २५ मे २०२६ रोजी त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून सांगितले की, अमेरिकेत ३० वर्षे घालवल्यानंतर त्या मुंबईत परतल्या आहेत. चित्रपट आणि ओटीटी (OTT) प्रोजेक्ट्समध्ये काम करण्यासाठी आपण खूप उत्सुक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांची इच्छा केवळ मुख्य भूमिका साकारण्यापुरती मर्यादित नाही. भूमिका प्रभावशाली असेल, तर त्या सहाय्यक भूमिका किंवा एखाद्या छोट्या शोचा भाग होण्यासही तयार आहेत.

Follow Us
मुंबईत प्रदूषणाचा विळखा! हवेची गुणवत्ता खालावल्याने नागरिकांच्या...
मुंबईत प्रदूषणाचा विळखा! हवेची गुणवत्ता खालावल्याने नागरिकांच्या आरोग्याची चिंता
SRA आरोपांवर प्रताप सरनाईक आक्रमक; संजय राऊतांना सुनावले...
SRA आरोपांवर प्रताप सरनाईक आक्रमक; संजय राऊतांना सुनावले, अपना घर घोटाळ्यावरही मोठा इशारा!
शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आज सुनावणीची शक्यता...
Shivsena Hearing Update : शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आज सुनावणीची शक्यता
बाळासाहेब ठाकरेंचा आज स्मृतिदिन; ठाकरे बंधू एकत्र दिसणार?
Balasaheb Thackeray Smrutidin : बाळासाहेब ठाकरेंचा आज स्मृतिदिन; ठाकरे बंधू एकत्र दिसणार?
इंदुरीकर महाराज याचं पुन्हा मुली आणि नात्यांबाबत वादग्रस्त विधान!
इंदुरीकर महाराज याचं पुन्हा मुली आणि नात्यांबाबत वादग्रस्त विधान! म्हणाले, 'मुली कधीच प्रेम नाही...
ऊस उत्पादकांच्या आंदोलनाला तात्पुरती स्थगिती! अगामी बैठकीत ऊस दराचा...
ऊस उत्पादकांच्या आंदोलनाला तात्पुरती स्थगिती! अगामी बैठकीत ऊस दराचा फैसला
एक बिहारी, सब पे भारी! शिंदे गटातील नेत्याच्या विधानाची राज्यभर चर्चा
एक बिहारी, सब पे भारी!' शिंदे गटातील नेत्याच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी; राजकीय, सामाजिक आणि महत्त्वाच्या अपडेट्
News Headline : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी; राजकीय, सामाजिक आणि महत्त्वाच्या अपडेट्स...
'ते' मफलरमॅन फडणवीस? रोहित पवारांचा आरोप; थेट व्हिडीओच दाखवला
Rohit Pawar : 'ते' मफलरमॅन फडणवीस? रोहित पवारांचा आरोप; थेट व्हिडीओच दाखवला
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; अमित शाहांकडे केली मागणी...
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; चौकशी अहवालाबाबत अमित शाहांकडे केली मोठी मागणी!