
Bollywood Actor Birthday Special: झगमत्या विश्वात कायम सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगलेली असते. सेलिब्रिटी त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. आता देखील एका प्रसिद्ध अभिनेता, मॉडेलच्या खासगी आयुष्याच्या चर्चा रंगल्या आहेत. न्यूड फोटो, अश्लीलता पसरवण्याचे आरोप अभिनेत्यावर करण्यात आली… ज्यामुळे अनेकांनी अभिनेत्यावर निशाणा साधला… त्यानंतर अभिनेत्या वयाच्या 52 व्या वर्षी 26 वर्षीय तरुणीसोबत लग्न केलं… यामुळे देखील अभिनेत्यावर निशाणा साधण्यात आला.
सध्या ज्या अभिनेत्याची चर्चा रंगली आहे, तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता मिलिंद सोमण (Milind Soman) आहे. मिलिंद आता 60 वर्षांचा झाला आहे. वयाच्या 60 व्या वर्षी देखील मिलिंद त्याच्या फिटनेसने तरुणांना टक्कर देतो. पण मिलिंद अनेकदा वादाच्या भोवऱ्यात देखील अडकला.
1995 मध्ये मिलिंद सोमणच्या न्यूड फोटोशूटभोवतीचा वाद अजूनही चर्चेत आहे, ज्यामुळे अभिनेत्याला तब्बल 14 वर्षे कायदेशीर लढाई लढाली लागली. मिलिंदवर जाहिरातीद्वारे अश्लीलता पसरवल्याचा आरोप तर होताच, शिवाय वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत न्यायालयात खटलाही दाखल करण्यात आला होता. 2020 मध्ये मिलिंद गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर नग्न अवस्थेत धावतानाही दिसला होता.
फोटोंवर अभिनेत्याने स्पष्टीकरण देखील केलं होतं. ‘एक न्यूड व्यक्ती काय आहे. आपल्याला देवाने असंच बनवलं आहे. इन्स्टाग्रामवर अनेक न्यूड फोटो आहेत. प्रत्येकाचे वेगळे स्वप्न असतात…’ असं मिलिंद म्हणाला होता.
मिलिंद सोमण याने वयाच्या 52 व्या वर्षी 26 वर्ष लहान तरुणीसोबत लग्न केलं. मिलिंद सोमण याच्या बायकोचं नाव अंकिता कोंवर (Ankita Konwar) असं आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे अंकिता हिची आई देखील मिलिंद सोमण याच्यापेक्षा लहान आहे. दोघांच्चा लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.
याच कारणामुळे मिलिंद याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. एवढंच नाही तर, मिलिंद कायम बायकोसोबत रोमँटिक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. ज्यामुळे त्याला कायम ट्रोल केलं जातं.