शाहिद कपूरसोबत नातं संपवणार होती मीरा राजपूत, दोघांमध्ये नक्की काय झालं होतं?

Mira Rajput - Shahid Kapoor : लग्नानंतर लगेत मीरा राजपूत पती शाहिद कपूरला जाणार होती सोडून? दोघांमध्ये नक्की काय झालं होतं?, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शाहिद - मीरा यांच्या नात्याची चर्चा... चाहत्यांना देतात कपल गोल्स...

शाहिद कपूरसोबत नातं संपवणार होती मीरा राजपूत, दोघांमध्ये नक्की काय झालं होतं?
| Updated on: May 25, 2024 | 1:48 PM

अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि पत्नी मीरा राजपूत (Mira rajput) कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. दोघांची जोडी बॉलिवूडच्या बेस्ट कपलपैकी एक आहे. एवढंच नाही तर, दोघे एकमेकांवर प्रेम व्यक्त करताना देखील दिसतात. शाहिद आणि मीरा यांच्या लग्नाला जवळपास 8 वर्ष पूर्ण झाली आहेत. पण एक काळ असा आला होता, जेव्हा मीरा हिने शाहिद याला सोडून जाण्याचा निर्णय घेतला होता. सांगायचं झालं तर, जेव्हा शाहिद आणि मीरा यांचं लग्न झालं होतं, तेव्हा अभिनेत्याचा ‘उडता पंजाब’ सिनेमा प्रदर्शित झाला होता. अभिनेत्याने पत्नीला एडिटिंग रूममध्ये सिनेमा दाखवला होता. एका मुलाखतीत अभिनेत्याने तेव्हा नक्की काय घडलं होतं सांगितलं…

‘उडता पंजाब’ सिनेमा पाहिल्यानंतर अभिनेत्रीने शाहिदसोबत लग्न तोडण्याचा निर्णय घेतला होता. सिनेमा पाहत असताना मीरा शाहिद याला म्हणाली, ‘तू या मुलासारखा आहेस? मला तुझ्यासोबत नाही राहायचं… मीरा आणि माझं लग्न पूर्णपणे अरेंज मॅरेज आहे. त्यामुळे सुरुवातीच्या दिवसांमध्ये आम्ही एकमेकांना जास्त ओळखत नव्हतो.’ पण आता शाहिद आणि मीरा चाहत्यांना कपल गोल्स देतात.

 

 

 

शाहिद बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. शाहिद त्याच्या व्यस्त वेळापत्रकात कितीही व्यस्त असला तरी कुटुंबाला वेळ देतो. शाहिद आणि मीराचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात.

शाहिदची पत्नी एक प्रसिद्ध अभिनेत्री नसली तरी, मीरा राजपूतने इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मीरा कायम तिच्या वैवाहिक आयुष्य आणि फिटनेसमुळे चर्चेत असते. मीरा सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.

सोशल मीडियावर मीरा हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.