Miss Universe: आता लग्नानंतरही मिळणार ‘मिस युनिव्हर्स’ होण्याची संधी; 2023 पासून लागू होणार नवा नियम

आतापर्यंत केवळ 18 ते 28 वयोगटातील अविवाहित महिला मिस युनिव्हर्स स्पर्धेत भाग घेऊ शकत होत्या. ज्यामध्ये आता बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Miss Universe: आता लग्नानंतरही मिळणार 'मिस युनिव्हर्स' होण्याची संधी; 2023 पासून लागू होणार नवा नियम
Miss Universe: आता लग्नानंतरही मिळणार 'मिस युनिव्हर्स' होण्याची संधीImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Aug 22, 2022 | 10:11 AM

मिस युनिव्हर्सचा (Miss Universe) मुकुट डोक्यावर घालणं हे अनेक स्त्रियांचं स्वप्न असतं. अनेकदा मेहनत करूनही काहींना अपयश येतं तर काहींना या स्पर्धेत भाग घेण्यापासून त्यांचं वय त्यांना मागे खेचतं. ज्या महिला लग्नानंतर मिस युनिव्हर्स सौंदर्य स्पर्धेत (Beauty pageant) सहभागी होऊ शकल्या नाहीत त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. नवीन नियमानुसार आता महिलांना लग्नानंतरही (Married Women) या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. आता महिलांना सौंदर्य स्पर्धेत भाग घेण्यासाठी वयाचा अधिक विचार करण्याची गरज भासणार नाही. मिस युनिव्हर्स 2023 मध्ये गेल्या 70 वर्षांपासून सुरू असलेला नियम रद्द करण्यात येत आहे. ज्या अंतर्गत आता विवाहित महिलाही या स्पर्धेत भाग घेऊ शकणार आहेत. पुढील वर्षी म्हणजेच 2023 मध्ये या स्पर्धेच्या 72व्या सिझनपासून हे नियम लागू होतील.

आतापर्यंत केवळ 18 ते 28 वयोगटातील अविवाहित महिला मिस युनिव्हर्स स्पर्धेत भाग घेऊ शकत होत्या. ज्यामध्ये आता बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मिस युनिव्हर्स 2021 चा किताब भारताच्या हरनाज संधूने जिंकला होता. मिस युनिव्हर्स स्पर्धेत होत असलेल्या या बदलामुळे अनेकजण आनंदी आहेत. 2020 मध्ये मिस युनिव्हर्सचा किताब जिंकणाऱ्या मेक्सिकोच्या अँड्रिया मेझानेही आपला आनंद व्यक्त करताना या बदलाचं कौतुक केलं आहे. या निर्णयाचं समर्थन करताना अँड्रिया म्हणाली की, “वैयक्तिकरित्या मी आनंदी आहे. या पदांवर पूर्वी फक्त पुरुषांचाच अधिकार होता, पण आता बदलाची वेळ आली आहे.”

हे सुद्धा वाचा

विशेष म्हणजे, 2020 मध्ये मिस युनिव्हर्स ट्रॉफी जिंकणाऱ्या अँड्रियावर विवाहित असल्याचा आरोप करण्यात आला होता, जो स्पर्धेच्या नियमांच्या विरोधात होता. त्याचवेळी, याआधी भारताकडून हरनाज संधूने मिस युनिव्हर्सचं विजेतेपद पटकावलं होतं. याआधी 1994 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन आणि 2000 मध्ये लारा दत्ता हिच्या डोक्यावर हा मुकुट घालण्यात आला आहे.

Non Stop LIVE Update
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.