Miss Universe 2021 | एक प्रश्न ज्याच्या उत्तरानं हरनाज बनली ‘मिस युनिव्हर्स’, सुष्मिता, लाराला कोणते प्रश्न विचारले गेले होते?

Miss Universe 2021 | एक प्रश्न ज्याच्या उत्तरानं हरनाज बनली 'मिस युनिव्हर्स', सुष्मिता, लाराला कोणते प्रश्न विचारले गेले होते?
Harnaaz

हरनाज संधूने (Harnaaz Sandhu) ‘मिस युनिव्हर्स 2021’चा (Miss Universe 2021) ताज जिंकला आहे. 70वी ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धा यावर्षी 12 डिसेंबर रोजी इस्रायलमध्ये पार पडली. तब्बल 21 वर्षांनंतर भारताने ‘मिस युनिव्हर्स’चा किताब पटकावला आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Dec 13, 2021 | 11:19 AM

मुंबई : हरनाज संधूने (Harnaaz Sandhu) ‘मिस युनिव्हर्स 2021’चा (Miss Universe 2021) ताज जिंकला आहे. 70वी ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धा यावर्षी 12 डिसेंबर रोजी इस्रायलमध्ये पार पडली. तब्बल 21 वर्षांनंतर भारताने ‘मिस युनिव्हर्स’चा किताब पटकावला आहे. हरनाजच्या आधी लारा दत्ताने 2000 मध्ये हा मुकुट जिंकला होता. तर, सुष्मिता सेनही हा कितन पटकावणारी पहिली भारतीय महिला ठरली होती.

‘टॉप 3’मध्ये आपले स्थान निर्माण करणाऱ्या हरनाजला विचारण्यात आले होते की, ताणावाचा सामना करणाऱ्या तरुणींना ती काय सल्ला देईल? या प्रश्नाचे उत्तर देत हरनाजने ‘मिस युनिव्हर्स’चा किताब पटकावला आहे. हरनाजच्या या उत्तराचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हरनाजचे उत्तर ऐकलेत?

या प्रश्नाच्या उत्तरात हरनाज म्हणाली की, ‘आजच्या तरुणाईवर सर्वात मोठं दडपण म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे. ही गोष्ट तुम्हाला अधिक चांगले होण्यास मदत करते. स्वतःची इतरांशी तुलना करणे थांबवा आणि जगभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. स्वतःसाठी बोला, कारण तुम्ही तुमच्या जीवनाचे नेते आहात. तुम्हीच तुमचा आवाज आहात. माझा स्वतःवर विश्वास होता आणि म्हणूनच मी आज इथे उभी आहे.’

भारताची पहिली ‘मिस युनिव्हर्स’ सुष्मिता सेन!

हैदराबादमध्ये जन्मलेल्या सुष्मिता सेनने 1994मध्ये पहिल्यांदा ‘मिस युनिव्हर्स’चा ताज जिंकला होता. त्यावेळी सुष्मिताचे वय अवघे 19 ​​वर्षे होते. इतक्या लहान वयात सुष्मिता सेन मिस युनिव्हर्सचा किताब जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली होती. ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेदरम्यान सुष्मिताला कोणता प्रश्न विचारण्यात आला होता की, जर तुम्ही कोणतीही ऐतिहासिक घटना बदलू शकत असाल, तर ती काय असेल? त्यावर सुष्मिताने ‘इंदिरा गांधींचे निधन’ असे म्हटले होते. सुष्मिताच्या या उत्तरामुळे तिला ‘मिस युनिव्हर्स’चा किताब मिळवला होता.

लारा दत्ता ठरली भारताची दुसरी ‘मिस युनिव्हर्स’!

लाराने 2000 साली ‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिंकला होता. सुष्मिता सेननंतर ‘मिस युनिव्हर्स’ बनणारी लारा दत्ता दुसरी भारतीय महिला ठरली. त्यावेळी लारा 22 वर्षांची होती. लाराची मुलाखत ही कोणत्याही श्रेणीतील सर्वात लांब रेकॉर्ड केलेली मुलाखत ठरली होती. तिला या फेरीत 9.99 गुण मिळाले होते.

लारा दत्ताला प्रश्न विचारण्यात आला होता की, सौंदर्य स्पर्धा ही महिलांसाठी आदरणीय नाही? हे वक्तव्य चुकीचे आहे हे कसे सिद्ध करायचे? लाराने उत्तर दिले की, मला वाटते की ‘मिस युनिव्हर्स’सारख्या स्पर्धा तरुणींसाठी एक उत्तम व्यासपीठ आहे. यातून आपण पुढे जाऊ शकतो आणि आपल्याला ज्या क्षेत्रात जायचे आहे, त्यात जाऊ शकतो. आपण व्यवसाय, राजकारण यासह इतर क्षेत्रात देखील काम करू शकतो. आपण आपले मत, आपले विचार ठामपणे मांडू शकतो.

हेही वाचा :

Miss Universe 2021 | कमी वजनाचा देखील ‘भार’ झाला! ‘मिस युनिव्हर्स’ हरनाज संधूलाही करावा लागला ‘बॉडी शेमिंग’चा सामना!

Miss Universe 2021 | Harnaaz Sandhu ला मिस युनिव्हर्सचा किताब, 21 वर्षांनी भारताची उंचावली मान


Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें