‘मोहब्बतें’ फेम प्रसिद्ध अभिनेत्रीच्या नवऱ्याचा अपघात, नवरा थेट ICU मध्ये, प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर

Preeti Jhangiani Husband Parvin Dabas Accident: 'मोहब्बतें' फेम प्रसिद्ध अभिनेत्रीच्या नवऱ्याचा अपघात, अभिनेत्रीच्या नवऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरु, प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर...

मोहब्बतें फेम प्रसिद्ध अभिनेत्रीच्या नवऱ्याचा अपघात, नवरा थेट ICU मध्ये, प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर
| Updated on: Sep 21, 2024 | 1:38 PM

‘मोहब्बतें’ फेम अभिनेत्री फेम प्रिती झंगियानीच्या नवऱ्याचा अपघात झाला आहे. शनिवारी सकाळी ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली. रिपोर्टनुसार प्रिती झंगियानीचे पती परवीन डबास यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. तेव्हा प्रिती देखील पतीसोबत होती… अशी माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परवीन डबास स्वत: कार चालवत होते. अपघाताबद्दल अद्यार अधिक माहिती समोर आलेली नाही.

परवीन यांच्या अपघातानंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबातील एका व्यक्तीन या आव्हानात्मक काळात गोपनीयतेची विनंती करणारं अधिकृत विधान केलं आहे. ‘प्रो पंजा लीगचे सह-संस्थापक परवीन डबास यांना शनिवारी सकाळी एका दुर्दैवी कार अपघातानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे आणि ते वांद्रे येथील होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये आहेत.’

 

 

सध्या परवीन डबास यांची डॉक्टरांकडून काळजी घेतली जात असल्याची माहिती समोर आली आहे. परवीन डबास यांच्या अपघातानंतर अभिनेत्रीच्या चाहत्यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. यावर प्रिती हिने अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार, परवीन गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

 

परबीन डबास यांचे सिनेमे…

‘खोसला का घोसला’ सिनेमामुळे परबीन डबास प्रसिद्धी झोतात आले. त्यांनी ‘रागिनी एमएमएस 2’, ‘इंदु सरकार’ आणि ‘माय नेम इज खान’ यांसारख्या सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे.