AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसिद्ध अभिनेत्रीला तुरुंगातील कैद्याकडून ‘लव्ह लेटर’; म्हणाला, ‘बेबी तू खरंच सुंदर…’

Bollywood Actress: 'बेबी तू खरंच सुंदर...', बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीला तुरुंगातील कैद्याकडून 'लव्ह लेटर', सतत पाठवत राहतो महागडे गिफ्ट... जाणून व्हाल थक्क, सध्या सर्वत्र कैद्याने लिहिलेल्या पत्राची चर्चा...

प्रसिद्ध अभिनेत्रीला तुरुंगातील कैद्याकडून 'लव्ह लेटर'; म्हणाला, 'बेबी तू खरंच सुंदर...'
| Updated on: Sep 21, 2024 | 12:02 PM
Share

तुरुंगातील एक कैद्याने बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रीला लव्ह लेटर पाठवलं आहे. अभिनेत्रीला लव्ह लेटर पाठवणारा आरोपी दुसरा तिसरा कोणी नसून सुकेश चंद्रशेखर आहे. सुकेश कायम अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस हिला लव्ह लेटर पाठवत असतो. आता देखील सुकेश याने जॅकलीन हिला लव्ह लेटर पाठवलं आहे. सुकेश याने पत्रात लिहिलं आहे की, ‘माझी प्रिय जॅकलीन… मी तुझा नवीन फोटो पाहिला. कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं. बेबी तू खूप सुंदर आहेस. पत्रासोबत तुला देण्यासाठी माझ्याकडे दोनच गोष्टी आहेत.’

‘आज मला तुझ्यासाठी एक गाणं समर्पित करायचं आहे, ‘लापता लेडीज’ सिनेमातील ‘सजनी‘ गाणं मला तुला समर्पित करायचं आहे. गाण्याची प्रत्येक ओळ तुझ्यासाठी आहे. खरंतर नाही सांगू शकत तुझ्याशिवाय आणि तुझ्यासोबत बोलल्या शिवाय मी कसं जगत आहे… मला तुझ्या वाढदिवसानिमित्त तुझ्या फोटोची एक अप्रतिम कला सादर करायची आहे. तुला माहीत आहे का या कलाकृतीत विशेष काय आहे, हे माझ्या स्वप्नातून थेट साकारलेलं, प्रत्यक्षात आणलेलं चित्र आहे…

सुकेश पुढे म्हणाला, आपल्याला प्रत्येक परिस्थितीचा सामना करावा लागतो. हा आपल्या आयुष्यातील एक भाग आहे. मी जेवढं तुझ्यावर प्रेम करतो, तेवढंच प्रेम तू माझ्यावर करते… काहीही झालं तरी एकमेकांपासून विभक्त व्हायचं नाही… असं देखील सुकेश पत्रात म्हणाला आहे.

IANS च्या रिपोर्टनुसार, सुकेशला 29 मे 2015 रोजी एका फसवणुकीच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. 2022 मध्ये दाखल केलेल्या ईडीच्या आरोपपत्रानुसार, त्याने जॅकलीनसाठी महागड्या भेटवस्तू खरेदी करण्यासाठी बेकायदेशीरपणे पैसे वापरले.

जॅकलीन हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, श्रीलंकन ​​अभिनेत्री आणि मॉडेल जॅकलीनने 2009 मध्ये सुजॉय घोष दिग्दर्शित ‘अलादीन’ या कॉमेडी सिनेमामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिलं नाही. आता जॅकलिन लवकरच ‘फतेह’ आणि ‘वेलकम टू द जंगल’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?.
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल.
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा.
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?.
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड.
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.