Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाइव्ह परफॉर्मन्सदरम्यान गायिका मोनाली ठाकूरची तब्येत बिघडली; अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लगाला अन्

लाइव्ह परफॉर्मन्सदरम्यान अनेक गायकांना अचान त्रास होऊ लागल्याच्या घटना बऱ्याचदा पाहायला मिळतात. अशीच घटना एका गायिका मोनाली ठाकूरसोबतही घडली आहे. तिलाही लाइव्ह परफॉर्मन्सदरम्यान अचानक श्वास घ्यायला त्रास होऊ लागला आणि तिची तब्येत खालावली.

लाइव्ह परफॉर्मन्सदरम्यान गायिका मोनाली ठाकूरची तब्येत बिघडली; अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लगाला अन्
Follow us
| Updated on: Jan 23, 2025 | 2:25 PM

लाइव्ह परफॉर्मन्सदरम्यान अनेक गायकांना अचान त्रास होऊ लागल्याच्या घटना बऱ्याचदा पाहायला मिळतात. असाच काहीसा किस्सा हा गायक के. के. सोबत सुद्धा घडला होता. अचानक लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर समजलं की त्याचा हार्टअटॅकनं मृत्यू झाला. अशीच घटना एका गायिकेसोबतही घडली आहे. तिलाही लाइव्ह परफॉर्मन्सदरम्यान अचानक श्वास घ्यायला त्रास होऊ लागला आणि तिची तब्येत खालावली.

मोनाली ठाकूरची लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान तब्येत बिघडली

ही प्रसिद्ध गायिक म्हणजे मोनाली ठाकूर. लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान गायिका मोनाली ठाकूरची प्रकृती अचानक खालावली. तिला अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले. सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत. मॅनेजर्सने मोनाली गंभीर अवस्थेमध्ये असलेली दिसून आली. त्यामुळे लगेचच तिने परफॉर्मन्स थांबवण्याचा निर्णय घेतला

‘सावर लून’ आणि ‘मोह मोह के धागे’ सारख्या हिट गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेली ही गायिका दिनहाटा महोत्सवात गात असताना अचानक तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. इव्हेंट मॅनेजर्सने सांगितले तिची अवस्था पाहाता लगेचच परफॉर्मन्स थांबवायला सांगितला. अचानक तब्येत बिघडल्यामुळे मोनालीला दिनहाटा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले गेले आहे.

 कूचबिहारच्या एका खासगी रुग्णालयात भरती 

यावेळी तिच्या टीमने लगेचच कार्यवाही करत तिच्यावर उपचार करण्याची मागणी केली. काही मिनिटांतच एक रुग्णवाहिका तिथे आली आणि मोनालीला लगेचच उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. सध्या तिला कूचबिहारच्या एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्या ठिकाणी तिच्यावर उपचार सुरु आहेत.

कॉन्सर्टच्या व्यवस्थापनाबद्दल मोनालीची नाराजी  

मात्र मोनालीने अद्याप सोशल मीडियावर तब्येतीबद्दलचे काहीही अपडेट शेअर केले नाहीत. काही दिवसांपूर्वी तिने वाराणसी येथील खराब व्यवस्थापनामुळे कार्यक्रम रद्द केला होता. परफॉर्मन्स सुरु असताना कोणालाही इजा होऊ शकते असे ती म्हणाली होती. याचबरोबर तिने कॉन्सर्ट रद्द करत चाहत्यांची माफीदेखील मागितली होती. यावेळी कॉन्सर्टचा एक व्हिडीओदेखील व्हायरल झाला होता. त्यावेळी ती म्हणाली की, “मी नाराज आहे. मी व माझी टीम परफॉर्म करण्यासाठी खूप खुश होतो. मात्र इथे असलेल्या सुविधांबद्दल मला काहीही बोलायचं नाही. ही इथल्या व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. मला हे सांगता पण नाही येणार की त्यांनी पैसे चोरण्यासाठी मंचावर काय करत आहेत ते”.

नाराजी व्यक्त करत कॉन्सर्ट मध्येच थांबवण्याची घोषणा

पुढे ती म्हणाली होती की, “मंच खराब असल्याने माझ्या पायाला जखम होऊ शकते. मला इतर डान्सर्स शांत राहण्यासाठी सांगत होते. पण इथे सगळंच बेकार आहे. तरीही आम्ही परफॉर्म करण्याचा प्रयत्न करत आहोत कारण तुम्ही लोक माझ्यासाठी आला आहात आणि सगळ्यांना मी उत्तर देण्यासाठी बांधील आहे. पण मी माझा कॉन्सर्ट इथेच थांबवत आहे. मी पुन्हा इथे येईन. पण सगळी व्यवस्था मी स्वतः करेन”. असं म्हणत तिने तेथील व्यवस्थापनाबदद्लची नाराजी व्यक्त केली होती.दरम्यान तिच्या तब्येतीबद्दल कोणतीही अपडेट समोर आली नसून चाहते ती बरी व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.

हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट
हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट.
मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा
मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा.
'तो करंटेपणा आमच्याकडून नाही',राज यांच्या भूमिकेचं राऊतांकडून स्वागत
'तो करंटेपणा आमच्याकडून नाही',राज यांच्या भूमिकेचं राऊतांकडून स्वागत.
....म्हणून माझं सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंनी सारंकाही सांगितलं अन्
....म्हणून माझं सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंनी सारंकाही सांगितलं अन्.
तो जय महाराष्ट्र बोलना होगा, सुपारी घेणारं सरकार म्हणत ठाकरेंची टीका
तो जय महाराष्ट्र बोलना होगा, सुपारी घेणारं सरकार म्हणत ठाकरेंची टीका.
उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना एकच अट; म्हणाले, 'मी सुद्धा तयार, पण...'
उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना एकच अट; म्हणाले, 'मी सुद्धा तयार, पण...'.
युती, शिवसेनेच्या फुटीवर राज ठाकरे म्हणाले, मी आयत्या पिठावर रेघोट्या.
युती, शिवसेनेच्या फुटीवर राज ठाकरे म्हणाले, मी आयत्या पिठावर रेघोट्या..
मुंबईकरांनो... 'ते' 18 दिवस चिंतेचे... हवामान खात्याकडून मोठी माहिती
मुंबईकरांनो... 'ते' 18 दिवस चिंतेचे... हवामान खात्याकडून मोठी माहिती.
लाडकी बहीण फक्त मतांसाठीच? महायुतीच्या बड्या मंत्र्याला म्हणायचंय काय?
लाडकी बहीण फक्त मतांसाठीच? महायुतीच्या बड्या मंत्र्याला म्हणायचंय काय?.
संग्राम थोपटेंची काँग्रेसला सोडचिठ्ठी? FB प्रोफाईलचा फोटो बदलला अन्...
संग्राम थोपटेंची काँग्रेसला सोडचिठ्ठी? FB प्रोफाईलचा फोटो बदलला अन्....