AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोनालिसाच्या खासगी आयुष्यात मोठं वादळ, लग्न होताच नवऱ्याने…लव्ह जिहादच्या आरोपामुळे दोघांनीही…

प्रयागराज कुंभमेळ्यात व्हायरल झालेल्या मोनालिसाने लग्न केले आहे. पण तिचे लग्न म्हणजे लव्ह जिहाद आहे, असा आरोप केला जातोय. यावरच आता मोनालिसा आणि तिचा पती फरमान खान यांनी खदखद व्यक्त केली आहे.

मोनालिसाच्या खासगी आयुष्यात मोठं वादळ, लग्न होताच नवऱ्याने...लव्ह जिहादच्या आरोपामुळे दोघांनीही...
monalisa and farman khan marriageImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 25, 2026 | 5:08 PM
Share

 Monalisa Marriage : प्रयागराजच्या कुंभमेळ्यात व्हायरल झालेल्या मोनालिसाने नुकतेच लग्न केले आहे. कुटुंबीयांचा विरोध झुगारून तिने फरमान खान नावाच्या तिच्या बॉयफ्रेंडसोबत लग्नगाठ बांधली आहे. या दोघांनीही लग्न केल्यानंतर मात्र त्यांच्या आयुष्यात नवं वादळ आलं आहे. त्यांचा विवाह म्हणजे लव्ह जिहाद असल्याचा दावा केला जातोय. फरमान खानने तिला भ्रमित करून तिच्याशी लग्न केलं आहे, असं म्हटलं जातंय. या होत असलेल्या आरोपांमुळे आता फरमान खान आणि मोनालिसा हे दोघेही त्रस्त झाले आहेत. त्यांनी आपला त्रागा व्यक्त केला आहे. एवढंच नव्हे तर तुम्ही आमच्या लग्नाला लव्ह जिहाद म्हणून नका. लोकांची माथी भडकवू नका, असे कळकळीचे आवाहन फरमान खानने लोकांना केले आहे.

प्रेम करमे चुकीचे आहे का?

लव्ह जिहादच्या आरोपांवर मोनालिसा आणि फरमान खान या कपलने अखेर मौन सोडले आहे. या दोघांनीही मंगळवारी (24 मार्च) पत्रकार परिषद घेऊन त्यांना होत असलेल्या त्रासाबद्दल सांगितलं. ‘मी मुस्लीम कुटुंबात जन्मलो आणि मी मुस्लीम धर्मातून येतो, हीच माझी चूक आहे. याच कारणामुळे मला लोक चुकीचा समजत आहेत. मला मारून टाकण्याची धमकी दिलीजात आहे,’ अशी खळबळजनक माहिती फरमान खान याने दिली. तसेच प्रेम करणे चुकीचे आहे का? असा सवालही त्याने केलाय. लोक आमचा पिच्छा सोडत नसतील, आम्हाला काम करू देत नसतील तर आम्ही आत्महत्या करू. आमच्याकडे पैसे पण नाहीत. पैसे नसताना आम्ही जीवन कसं जगावं. काम न केल्यास आम्ही काय खावं. लोक आमच्या पाठीमागे लागले आहेत, अशी खंतही त्याने बोलून दाखवली आहे.

…तर आम्ही आत्महत्या करू

पुढे बोलताना, आम्ही मंदिरात लग्न केलं. मी श्री नारायण गुरुजी यांना मानतो. कोणीही त्यांच्या मंदिरात जाऊन लग्न, पूजा करू शकतो, असेही फरमान खानने सांगितले. मोनालिसानेही दिल्ली, मध्य प्रदेश किंवा केरळ सरकारने आमची मदत न केल्यास आम्ही आत्महत्या करू, असा इसाराही दिला आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमकं काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Follow Us
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....
सरकार गुंडागर्दी करून घर पाडू शकते, पुन्हा घर बांधण्याची ताकद.....
सरकार गुंडागर्दी करून घर पाडू शकते, पुन्हा घर बांधण्याची ताकद......
अवघ्या 38 व्या वर्षी अखिलेश यादव यांच्या लहान भावाचं दुःखद निधन...
अवघ्या 38 व्या वर्षी अखिलेश यादव यांच्या लहान भावाचं दुःखद निधन....
मोठी बातमी! सोनिया गांधी यांची प्रकृती पुन्हा बिघडली, मेदांता हॉस्पिटल
मोठी बातमी! सोनिया गांधी यांची प्रकृती पुन्हा बिघडली, मेदांता हॉस्पिटल.