Laal Singh Chaddha Review: मूळ चित्रपटापेक्षाही आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ चांगला; जाणून घ्या का पहावा हा चित्रपट?

अतुल कुलकर्णी (Atul Kulkarni) लिखित आणि अद्वैत चंदन दिग्दर्शित हा चित्रपट ऑस्कर पुरस्कार विजेत्या 'फॉरेस्ट गंप' या हॉलिवूड चित्रपटाचा अधिकृत हिंदी रिमेक आहे.

Laal Singh Chaddha Review: मूळ चित्रपटापेक्षाही आमिर खानचा 'लाल सिंह चड्ढा' चांगला; जाणून घ्या का पहावा हा चित्रपट?
Laal Singh Chaddha Review: मूळ चित्रपटापेक्षाही आमिर खानचा 'लाल सिंह चड्ढा' चांगलाImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Aug 11, 2022 | 2:28 PM

Laal Singh Chaddha Movie Review: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच अभिनेता आमिर खान (Aamir Khan) हा आज प्रदर्शित झालेल्या ‘लाल सिंह चड्ढा’ (Laal Singh Chaddha) या चित्रपटाद्वारे तब्बल 4 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर परतला आहे. अतुल कुलकर्णी (Atul Kulkarni) लिखित आणि अद्वैत चंदन दिग्दर्शित हा चित्रपट ऑस्कर पुरस्कार विजेत्या ‘फॉरेस्ट गंप’ या हॉलिवूड चित्रपटाचा अधिकृत हिंदी रिमेक आहे. हा चित्रपट हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक असला तरी लाल सिंग चड्ढा यांच्या टीमने या चित्रपटाला आपल्या देशाच्या रंगांत रंगवलं आहे. याच कारणामुळे लाल आणि त्याची आई (मोना सिंग), त्याची बालपणीची लाडकी मैत्रीण आणि प्रेयसी रूपा (करीना कपूर) आणि शत्रूवरून मित्र बनलेला मोहम्मद पाजी हे प्रेक्षकांवर प्रभाव पाडण्यात यशस्वी ठरतात.

चित्रपटाची कथा

चित्रपटातील एका दृश्यात ट्रेनमध्ये बसलेल्या लाल सिंगच्या हातात फॉरेस्ट गंपमध्ये दाखवल्याप्रमाणे चॉकलेटचा बॉक्स नाही तर पाणीपुरीचा बॉक्स आहे. मात्र यामागची त्याची विचारसरणी पूर्णपणे वेगळी आहे. ‘आयुष्य पाणीपुरीसारखं असावं, एकदा खाल्लं की अजून खायची इच्छा व्हावी’ असं त्याची आई त्याला सांगायची. त्यामुळेच लाल सिंग त्याच्यासोबत नेहमीच पाणीपुरीचं पाकिट सोबत ठेवतो, कारण पोट भरलं असलं तरी तुम्हाला अजून एक खायची इच्छा व्हावी. लाल सिंगच्या विचारात आलेल्या तत्वज्ञानाचा हा ट्विस्ट त्याला आयुष्याच्या प्रवासात होणारे नुकसान भरून काढण्यास मदत करतो.

आपली कहाणी सांगताना लाल त्याच्या कुटुंबापासून सुरुवात करतो. तो एका संपन्न शीख कुटुंबात जन्मलेला मुलगा असतो. या कुटुंबातील पुरुषांनी अनेक मोठ्या लढाया जिंकलेल्या आहेत. लाल सिंगचे किस्से आणि कथा त्याच्या भूतकाळात आणि वर्तमानात फिरत असतात. लालची आई त्याला कळू देत नाही की तो बाकीच्यांपेक्षा वेगळा आहे. मात्र या कारणामुळे त्याचं बालपणीचे प्रेम रुपा (करीना कपूर) वारंवार त्याच्याशी लग्न करण्यास नकार देते.

हे सुद्धा वाचा

फॉरेस्टप्रमाणेच लाल सिंगदेखील सैन्यात दाखल होतो, जिथे तो त्याचा जिवलग मित्र बालाला (नाग चैतन्य अक्किनेनी) भेटतो. आपल्या लेफ्टनंटची तो कठीण काळात मदत करतो, मात्र त्यानंतर त्याच्या अडचणी आणखी वाढतात. माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हत्येनंतर शिखांच्या विरोधात आलेलं वादळ लाल सिंगच्या या कथेत दाखवण्यात आलं असून या चित्रपटाचं नाव ‘लाल सिंग चड्ढा’ का ठेवलं याचीही माहिती त्यात मिळते.

अभिनय, दिग्दर्शन आणि संगीत

आमिर खानने पुन्हा एकदा आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यश मिळवलं आहे. वयाच्या 50 व्या वर्षी त्याने 20 वर्षांच्या लाल सिंगची व्यक्तिरेखा अत्यंत सहजतेने साकारली आहे. करीना कपूरने साकारलेली रूपा पूर्णपणे वेगळी आणि संस्मरणीय आहे. मोना सिंग आणि मानव विज यांनीही नेहमीप्रमाणे आपलं दमदार अभिनय कौशल्य दाखवलं आहे. तर दाक्षिणात्य अभिनेता नाग चैतन्यनेही आपल्या पात्राला योग्य न्याय दिला आहे. आजचं युग लक्षात घेऊन पटकथेवर केलेलं काम, कथेला जवळ घेऊन जाणारी गाणी यामुळे सुपरहिट चित्रपटाचा फॉर्म्युला लाल सिंग चड्ढाला मिळाला आहे. या चित्रपटात दिसणारी शाहरुखची झलक सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देईल.

हा चित्रपट का पहावा?

पंजाबचा एक निष्पाप मुलगा आयुष्यभर कशाप्रकारे अडचणींचा सामना करतो, त्याच्या प्रेमासाठी तो कसा तळमळतो आणि जीवनातील त्याचा खरा उद्देश शोधण्यासाठी एका मिशनवर निघतो, हे यात सुंदरपणे दाखवलं आहे. लाल सिंग चड्ढा हे प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडण्यास यशस्वी ठरतो. कधी कधी मेंदूपेक्षा आपलं मन आपली साथ योग्यप्रकारे देतो, हे या कथेत सुंदरपणे सांगितलं आहे.

चित्रपट: लाल सिंह चड्ढा कलाकार: आमिर खान, करीना कपूर, मोना सिंह, नाग चैतन्य दिग्दर्शक: अद्वैत चंदन पटकथालेखक: अतुल कुलकर्णी स्टार्स: चार

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.