सनी देओलचा डान्स, ‘इजिप्शियन’ चाल अन् मॉडर्न लव्ह स्टोरीचा गोंधळ; ‘या’ गाजलेल्या गाण्याची भन्नाट कहाणी ऐकलीत का?

या चित्रपटाची कहाणी एका जुन्या हिंदी चित्रपटावर आधारित होती. तर या गाण्याची चाल एका हॉलीवूड गीताची चक्क कॉपी होती, सनी देओलचा हा चित्रपट आधी धरमपाजी करणार होते....

सनी देओलचा डान्स, इजिप्शियन चाल अन् मॉडर्न लव्ह स्टोरीचा गोंधळ; या गाजलेल्या गाण्याची भन्नाट कहाणी ऐकलीत का?
Movie 'Tu Ya Main' song story
| Updated on: Oct 05, 2026 | 11:12 PM

आदर्श गौरव बॉलीवूडमधील तरुण अभिनेता असून त्याने ‘द व्हाईट टायगर’, ‘खो गए हम कहां’ आणि ‘सुपरबॉयज ऑफ मालेगांव’ सारख्या चित्रपटातून अभिनय केला आहे. आदर्श आता एका रंजक कहाणीद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अलिकडेच त्याचा नवा चित्रपट ‘तू या मैं’ चा अनाऊन्समेंट व्हिडीओ रिलीज झाला आहे. यात त्यांच्या सोबत अभिनेता संजय कपूरची कन्या शनाया कपूर हीने काम केले आहे. या व्हिडीओत शनाया आणि आदर्श दोघेही क्रिकेटर्सच्या रोलमध्ये दिसत आहेत. जे अचानक एकमेकांना धडक देतात. दोघेही एका तलावात उभे असताना अचानक तेथे मगर येते. व्हिडीओच्या शेवटी आदर्श गौरव गायब झाला आहे तर शनाया किंचाळत आहे. या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला एक गाणे वाजत आहे. या गाण्याचे बोल ‘चोरी चोरी जब यूं हों आंखें चार क्या होता है…असे आहेत. या गाण्याचा इतिहास मोठा रंजक आहे.

‘पाप की दुनिया’ अन् सनी पाजींचा डान्स

तू या मैं या चित्रपटाच्या या अनाऊन्समेंट व्हिडीओत ऐकू येत असलेले हे गाणे ‘चोरी चोरी जब यूं हों आंखें चार क्या होता है वास्तविक १९८९ मध्ये आलेल्या ‘पाप की दुनिया’ चित्रपटातील गाणे आहे. हे गाण्याचे संगित बाप्पी लाहीरी यांचे होते तर ते किशोर कुमार यांनी गायले होते आणि त्या काळात ते खूपच गाजले होते. हे गाणे सनी देओल आणि नीलम यांच्यावर चित्रित झाले होते. डान्सवरुन सनी देओलची जाम खेचली जात असली तरी या गाण्यात सनी पाजींनी खूपच सिरियस मेहनत घेतल्याचे दिसते.

Loading...

चित्रपट ‘पाप की दुनिया’ दिग्दर्शक पहलाज निहलानी यांनी अभिनेता धर्मेंद्रना ऑफर केली होती. मात्र. धमेंद्र यांनी त्यांना यात सनीला घ्यावे मग मी त्याच्या पुढील चित्रपटात अर्धी फी घेईल असे आश्वासन दिल्याने सनीची यात एण्ट्री झाली होती. त्यानंतर त्यांच्या सोबत चंकी पांडे याचीही एण्ट्री झाली. सनी आणि चंकी यांनी यात प्रथमच एकत्र काम केलेले त्यानंतर त्यांनी एकत्र ‘विश्वात्मा’, ‘लुटेरे, ‘इंसानियत’ आणि ‘कसम’ चित्रपटात ही जोडी रिपीट झाली होती.

‘पाप की दुनिया’ची कहाणी अमिताभ बच्चन आणि विनोद खन्ना यांचा चित्रपट ‘परवरिश’सारखी होती. यात सनीचे कॅरेक्टर विनोद खन्ना सारखे तर चंकीचे कॅरेक्टर अमिताभ बच्चन सारखे होते. या चित्रपटाची कहाणीच अन्य चित्रपटापासून प्रेरित नव्हती तर त्याचे गाणेही हॉलीवूडच्या गाण्यावरुन प्रेरित होते.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us