Anant- Radhika Wedding | मुकेश अंबांनीच्या लेकाच्या प्री-वेडिंग फंक्शनला सुरूवात, ब्लॅक शेरवानीत दिसला वधूच्या वडिलांचा स्वॅग

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या घरात सध्या आनंदाचे वातावरण आहे. लवकरच त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह पार पडणार आहे. या वर्षी ते दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर काही काळापूर्वी त्यांचा साखरपुडा झाला.

Anant- Radhika Wedding | मुकेश अंबांनीच्या लेकाच्या प्री-वेडिंग फंक्शनला सुरूवात, ब्लॅक शेरवानीत दिसला वधूच्या वडिलांचा स्वॅग
| Updated on: Feb 15, 2024 | 1:58 PM

Anant Ambani- Radhika Merchant Pre Wedding Functions : मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या घरात सध्या आनंदाचे वातावरण आहे. लवकरच त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह पार पडणार आहे. या वर्षी ते दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर काही काळापूर्वी त्यांचा साखरपुडा झाला. त्याचा मोठा सोहळा अंबानींच्या घरी ‘अँटालिया’ येथे पार पडला होता. आता यवर्षी अनंत -राधिकाचं लग्न होत असून त्यांच्या प्री-वेडिंग फंक्शन्सना सुरूवात झाली आहे. गुजरातमधील जामनगरमध्ये अनंत आणि राधिकाचे प्री-वेडिंग फंक्शन्स सुरू झाले असून त्याचे काही फोटोही समोर आले आहेत.

अलीकडेच, एका अंबानी फॅन पेजने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग फंक्शन्सचे इनसाइड फोटो शेअर केले. त्यातून या सोहळ्याची झलक समोर आली. त्यातील एका फोटोमध्ये अंबानी कुटुंबाच्या जामनगर येथील घरासमोर झालेली फटाक्यांची आतिषबाजी दिसली. तर दुसऱ्या फोटोमध्ये होणाऱ्या वधूचे राधिका मर्चंट हिचे वडील, अर्थात वीरेन मर्चंट याचा फोटो दिसला. ते राधिकाच्या काही मैत्रिणींसोबत पोझ देत होते. ब्लॅक कलरच्या शेरवानीमध्ये त्यांच्या स्वॅग दिसत होता.

राधिका-अनंतच्या लग्नातील गिफ्ट्सही असतील खास

अंबानी कुटुंबातील हे शेवटचं लग्न आहे. त्यामुळे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न अतिशय भव्यदिव्य होणार आहे. त्यासाठी संपूर्ण अंबानी कुटुंब लग्नाच्या तयारीत व्यस्त आहे. याचदरम्यान त्यांच्या लग्नातील गिफ्ट्सही रोचक माहिती समोर आली आहे. Bollywood Shaadi.com च्या रिपोर्टनुसार, अनंत-राधिकाच्या लग्नाच्या गिफ्ट्समध्ये महाबळेश्वरच्या दृष्टिहीन कारागिरांनी खास बनवलेल्या काही सुंदर मेणबत्त्यांचा समावेश असणार आहे.

मार्च 2024 पासून सुरू होतील प्री-वेडिंग फंक्शन्स

अंबानी कुटुंबाने काही दिवसांपूर्वीच, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाआधीच्या फंक्शन्सबद्दलची घोषणा केली होती. 1 ते 3 मार्च या कालावधीत ही फंक्शन्स जामनगरमध्ये होणार असून त्याचे इन्व्हिडेशन कार्डही व्हायरल झाले होते. त्या कार्डमध्ये मुकेश आणि नीता यांच्या हस्ते लिहीलेल्या एका नोटचाही समावेश होता. अनंतच्या आयुष्याचा नवीन टप्पा सुरू करण्यासाठी जामनगरची निवड करण्यात आली कारण ते अंबानी कुटुंबासाठी खास आहे.

जुलैमध्ये होणार विवाह ?

एका फॅनपेजवरील माहितीनुसार, अंनत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं लग्न यावर्षी जुलै महिन्यात पार पडणार आहे. रिपोर्ट्सनुसार, 10, 11 आणि 12 रोजी लग्नाचे विधी होणार असल्याची माहिती आहे. तर लग्नाची तयारी एप्रिलपासूनच होईल. मात्र, अंबानी कुटुंबाने अद्याप अनंत आणि राधिकाच्या लग्नाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.