Mumbai Diaries 26/11 | ठरलं! ‘मुंबई डायरीज 26/11’ वेब सीरीज मार्चमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार!

| Updated on: Dec 07, 2020 | 6:42 PM

मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला होता. पाकिस्तानातून आलेल्या 10 दहशतवाद्यांनी मुंबईतील ताज हॉटेलसह सहा ठिकाणी हल्ला केला होता. हल्ल्यानंतर मुंबईसह संपूर्ण देश हादरला होता.

Mumbai Diaries 26/11 | ठरलं! मुंबई डायरीज 26/11 वेब सीरीज मार्चमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार!
Follow us on

मुंबई : मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला होता. पाकिस्तानातून आलेल्या 10 दहशतवाद्यांनी मुंबईतील ताज हॉटेलसह सहा ठिकाणी हल्ला केला होता. हल्ल्यानंतर मुंबईसह संपूर्ण देश हादरला होता. या दहशतवादी हल्ल्यांत 160हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. आता अमेजॉन प्राइम याच हल्लावर आधारित मुंबई डायरीज 26/11 ही वेब सीरीज आणत आहे, मार्च 2021 मध्ये ही वेब सीरीज प्रदर्शित होईल. याचे पहिले लुकही प्रदर्शित झाले आहे. (Mumbai Diaries 26/11 ‘web series to the audience in March)

मुंबई डायरीज 26/11 यामध्ये डॉक्टरांच्या नजरेतील 26/11 चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला दाखवण्याच येणार आहे. 26/11 चा मुंबईवरील दहशतवादी हल्लाच्या वेळी कशाप्रकारे रूग्णांना दहशतवाद्यांच्या तावडीतून डॉक्टरांनी वाचवले होते. यावर आधारित ही वेब सीरीज आहे. निखिल अडवाणी यांनी ही वेब सीरीज तयार केली आहे तर यामध्ये मुख्य भूमिकेत मोहित रैना आहे.

या वेब सीरिजमध्ये तुम्ही कधीही न ऐकलेल्या डॉक्टर, परिचारिका, पॅरा मेडिकल आणि रूग्णालयातील कर्मचार्‍यांच्या खऱ्या कथा बघायला मिळणार आहेत.
या विषयावर बोलताना अडवाणी म्हणाले की,”या विनाशकारी घटनेने संपूर्ण मुंबई शहर हादरले होते. आम्ही मुंबईकर अनेकदा त्या भयंकर रात्री कुठे होतो याबद्दल चर्चा करतो. 26/11 चा मुंबईवरील हल्लावर आधारित चित्रपट आले मात्र, त्या कोणत्याही चित्रपटात रूग्णालयात जेंव्हा दहशतवादी घुसले होते आणि कशाप्रकारे तेथील डॉक्टरांनी, कर्मचाऱ्यांनी रूग्णांचे प्राण वाचवले यावर जास्त काही दाखवण्यात आले नाही. मात्र ही सर्व वेब सीरिज आधारित आहे. या वेब सीरिजमध्ये कोंकणा सेन शर्मा, टीना देसाई आणि श्रेया धनवंतरी देखील दिसणार आहेत.

देशातील सर्वोत्कृष्ट वेब सीरिज दिल्ली क्राइमने नुकताच आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार जिंकला आहे. ही वेब सीरिज २०१२ मध्ये दिल्लीतील सामूहिक बलात्कारावर आधारित आहे. ज्यामध्ये या प्रकरणाशी संबंधित संपूर्ण पोलिसांचा तपास दाखवण्यात आला आहे. या वेब सिरीजमध्ये शेफाली शाह, राजेश तैलंग, रसिका दुगल आणि आदिल हुसेन मुख्य भूमिकेत होते. आता या वेब सीरिजचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती राजेश तैलंग यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या :

सिनेनिर्माते नरेंद्र फिरोदिया आणि राहुल नार्वेकर यांची ओटीटी इंडस्ट्रीमध्ये एण्ट्री!

Delhi Crime 2 | चाहत्यांसाठी खुशखबर… दिल्ली क्राइम वेब सीरिजचा दुसरा भाग लवकरच येणार!

(Mumbai Diaries 26/11 web series to the audience in March)