मुंबईवरील 26 /11 दहशतवादी हल्ल्याची 12 वर्षे, पाकिस्तानची पोलखोल करणारे ‘सात मुद्दे’

मुंबईवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला 12 वर्ष पूर्ण होत आहेत. Mumbai Terrorist Attack

मुंबईवरील 26 /11 दहशतवादी हल्ल्याची 12 वर्षे, पाकिस्तानची पोलखोल करणारे 'सात मुद्दे'
Follow us
| Updated on: Nov 25, 2020 | 11:41 AM

मुंबई: महाराष्ट्राची राजधानी मुंबईवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला 12 वर्ष पूर्ण होत आहेत. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी हल्ला केला होता. मुंबईतील ताज हॉटेलसह इतर महत्वाच्या ठिकाणांवर हल्ला झाला, यामध्ये 166 लोकांनी जीव गमावला होता.मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे स्पष्ट झाले होते. (Mumbai Terrorist Attack planned by Pakistan)

भारताची आर्थिक राजधानी मुंबईवर दहशतवादी हल्ल्यासाठी अतिरेक्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते. दहशतवाद्यांनी मुबईवर हल्ला करण्यासाठी आधुनिक शस्त्रांचा वापर केला होता. मुंबई पोलीस आणि भारतीय सैन्यदलाला तीन दिवसानंतर दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले होते. ताज हॉटेल, छत्रपती शिवाजी महारज रेल्वे टर्मिनस, लिओपोल्ड कॅफे, यासह दोन रुग्णालय आणि एका थिएटरवर दहशवादी हल्ला केला होता.

पाकिस्तानी न्यूज वेबसाईट डॉनमधील एका लेखानुसार पाकिस्तानी यंत्रणांना मुंबई दहशतवादी हल्ल्यासंदर्भातील माहिती समोर आली होती. त्यामाहितीनुसार 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा हात असल्याचे स्पष्ट होते. (Mumbai Terrorist Attack planned by Pakistan)

डॉनमधील लेखानुसार

1 . भारतीय सेना आणि मुंबई पोलिसांनी 9 आतकंवाद्यांचा खात्मा केला होता. अजमल कसाबला पकडण्यात आले होते. कसाब पाकिस्तानचा नागरिक असल्याचे स्पष्ट झाले होते. दहशतवादी संघटनांमध्ये कसाब सामील झाल्याचे पुरावे देखील मिळाले होते.

2. लष्कर-ए-तोयबा ने दहशतवाद्यांना थाटा, सिंधजवळ प्रशिक्षण दिले, त्यानंतर त्यांना भारतात सागरी मार्गानं भारतात पाठवण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

3.दहशतवाद्यांनी मुंबईत दाखल होण्यासाठी वापरलेल्या बोटीला रंगवून लपवण्यात आले होते. चौकशीत ती बोट हस्तगत करण्यात आली होती.

4. मुंबईजवळ दहशतवाद्यांनी डिंगी इजिनचा वापर केला होता,त्यावर एक पेटंट क्रमांक होता. चौकशीमध्ये ते डिंगी इंजिन जपानमधून लाहोरला मागवण्यात आले होते. त्यानंतर ते कराचीला पाठवण्यात आले. कराचीमधील स्पोर्टस साहित्य विक्री करणाऱ्या दुकानातून लष्कर-ए-तोयबाच्या अतिरेक्यांनी डिंगी इंजिन खरेदी केले होते.

5. कराचीतील ऑपरेशन रुममधून मुंबईवरील दहशतवादी हल्ला नियंत्रित करण्यासाठी वॉईस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉलचा वापर करण्यात आला होता.

6. मुंबई दहशतवादी हल्ल्याचा पाकिस्तानातील कमांडर आणि त्याच्या साथीदारांचा शोध घेत त्यांना अटक करण्यात आली होती.

7. मुंबई दहशतवादी हल्ल्यासाठी आर्थिक मदत पुरवणाऱ्यांना अटक करुन त्यांची न्यायालयीन चौकशी करण्यात आली होती.

26/11 हल्ल्याला 12 वर्षे पूर्ण पाकिस्तानातील अतिरेकी मोकाट

पाकिस्तानातील फेडरल इन्वेस्टिगेशन एजन्सीनं मोस्ट वाँटेड अतिरेक्यांची एक यादी जाहीर केली आहे. त्या यादीमध्ये 26/11 हल्ल्याप्रकरणात सहभागी असणाऱ्या 19 जणांच्या नावांचा समावेश आहे. 26/11 च्या हल्ल्याला 12 वर्ष झाली आहेत. मात्र, पाकिस्तान चौकशीचं कारण सांगतेय दहशतवाद्यांना अटक करण्यात आलेली नाही.

19 जणांची यादी

फेडरल इन्वेस्टिगेशननं जाहीर केलेल्या दहशतवाद्यांच्या यादीत अमजद खान, इफ्तिखार अली, शाहिद गफूर, अब्दुल रहमान, उस्मान, अतीक उर रहमान, रियाज अहमद, मुश्ताक, नइम, अब्दुल शकूर, साबिर सालकी, उस्मान, शकील अहमद, उस्मान जिया, अब्बास नसीर, जावेद इकबाल, मुख्तार अहमद, अहमद सईद, मोहम्मद खान यांचा समावेश होता.

डोजियरच्या रिपोर्टनुसार अमजद खान लष्कर-ए-तोयबाशी संबंधित होता. मुंबई दहशतवादी हल्ल्यासाठी वापरलेली फौज नावाची बोट खरेदी केली होती. कराचीमधील ARZ वॉटर स्पोर्ट्स मधून यामाहा मोटार बोट इंजिन, लाईफ जॅकेट आणि इतर वस्तू अमजद खानने खरेदी केल्या होत्या.

संबंधित बातम्या :

दहशतवाद्यांचा पुन्हा 26/11 हल्ला घडवण्याचा कट? पंतप्रधान मोदींची अमित शाह आणि अजित डोवाल यांच्यासोबत बैठक

मुंबईवर मोठ्या दहशतवादी हल्ल्याचं सावट; ड्रोन उड्डाणांवर बंदी

(Mumbai Terrorist Attack planned by Pakistan)

Non Stop LIVE Update
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?.
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?.
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?.
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार.
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर.
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट.