AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘बिग बॉस 17’ च्या घरात या दोन सदस्यांमध्ये जोरदार वाद, थेट एकमेकांच्या अंगावरच…

बिग बॉस 17 च्या घरात मोठा हंगामा बघायला मिळतोय. बिग बॉस 17 ची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ नक्कीच आहे. मात्र, नुकताच बिग बॉस 17 च्या घरात मोठी भांडणे ही बघायला मिळाली. हेच नाही तर थेट दोन स्पर्धेक हे एकमेकांच्या अंगावर देखील गेले. आता याचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

'बिग बॉस 17' च्या घरात या दोन सदस्यांमध्ये जोरदार वाद, थेट एकमेकांच्या अंगावरच...
| Updated on: Jan 17, 2024 | 7:51 PM
Share

मुंबई : बिग बॉस 17 च्या घरात जोरदार हंगामे बघायला मिळत आहेत. बिग बॉस 17 ची चाहत्यांमध्ये क्रेझ देखील आहे. आता बिग बॉस 17 चा फिनाले जवळ आलाय. बिग बॉस 17 च्या घरात नुकताच जोरदार हंगामा बघायला मिळाला. हेच नाही तर जोरदार भांडणे बिग बॉस 17 च्या घरात झाली. बिग बाॅसच्या घरात टॉर्चर टास्क हा पार पडलाय. यावेळी थेट मोठी भांडणे झाली. फक्त भांडणेच नाही तर चक्क एकमेकांच्या अंगावर मारण्यासाठी विकी जैन आणि मुनव्वर फारुकी हे गेले. यानंतर घरात मोठा हंगामा झाल्याचे बघायला मिळतंय.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून लोक हे चांगलेच हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. मुनव्वर फारुकी आणि विकी जैन हे एकमेकांच्या अंगावर मारण्यासाठी गेल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होतोय. टॉर्चर टास्कदरम्यान या दोघांमध्ये वाद झाल्याचे सांगितले जातंय.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, विकी जैन आणि आयशा हे बादली छतावर फेकतात. ही बादली काढण्याचा प्रयत्न मुनव्वर करतो. त्यावेळी मुनव्वर याला खाली उतरवण्याचा प्रयत्न विकी करतो आणि यामध्ये मुनव्वरचा तोल जातो आणि तो खाली जमिनीवर पडतो. यावेळी मुनव्वरवरला काही दुखापत झाली नाही.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

त्यानंतर मुनव्वरचा पारा हा चांगलाच चढतो आणि तो थेट चिडतो आणि विकी जैन याच्या अंगावर जातो. यानंतर या दोघांमध्ये जोरदार भांडणे होताना दिसत आहेत. दोघेही मारण्यासाठी एकमेकांच्या अंगावर जाताना दिसत आहेत. घरातील इतर सदस्य हे यांची भांडणे मिटवताना दिसत आहेत. अंकिता लोखंडे ही विकी जैन याला शांत करताना दिसत आहे.

बिग बाॅस 17 च्या घरात पहिल्यांदाच मुनव्वर फारुकी आणि विकी जैन यांच्यामध्ये अशाप्रकारची भांडणे होताना दिसली आहेत. मुनव्वर फारुकी आणि अंकिता लोखंडे हे खूप चांगलेच मित्र आहेत. यावेळी अंकिता विकी जैन याच्यासोबतच मुनव्वर फारुकी याला देखील समजून सांगण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र, हा प्रोमोचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?