AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तारक मेहतामधील बबिताजीने टप्पू सोबत केला साखरपुडा, लवकरच होणार विवाह?

babita ji engaged raj anadkat : बबिताजी म्हणजेच मुनमुन दत्ता हिने तिच्यापेक्षा ९ वर्षांनी लहान टप्पू म्हणजेच राज अनाडकट सोबत विवाह केला आहे. दोघांच्या लग्नाची देखील आता चर्चा सुरु झाली आहे. साखरपुडा झाल्यानंतर आता लवकरच दोघेही विवाह करणार असल्याची चर्चा आहे.

तारक मेहतामधील बबिताजीने टप्पू सोबत केला साखरपुडा, लवकरच होणार विवाह?
| Updated on: Mar 13, 2024 | 6:35 PM
Share

Munmun Dutta Gets Engaged To Raj Anadkat : तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील बबिताजी म्हणजेच मुनमुन दत्ता आणि टप्पू म्हणजेच राज अनाडकट यांच्याविषयी एक मोठी बातमी समोर आली आहे. ज्यामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. आत्तापर्यंत जेठालालला या शोमध्ये बबिताजी यांना फ्लर्ट करताना पाहिलं असेल, पण खऱ्या आयुष्यात मात्र त्यांच्या मुलाची भूमिका साकारणारे राज अनाडकट हा मुनमुन दत्ता सोबत आता विवाह करणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून दोघांच्या अफेअरची चर्चा होती. अखेर ती खरी ठरली असून दोघांनीही एंगेजमेंट केल्याच्या बातम्या येत आहेत.

मुनमुन आणि राज यांची एंगेजमेंट

न्यूज 18 च्या रिपोर्टनुसार, मुनमुन दत्ता आणि राज अनाडकट यांचा या महिन्यातच साखरपुडा झाला आहे. यावेळी दोघांचेही कुटुंब उपस्थित होते. रिपोर्ट्सनुसार, दोघांनी मुंबईबाहेर म्हणजेच गुजरातमध्ये साखरपुडा केला आहे. राज आणि मुनमुनचे कुटुंब आधी या नात्यावर नाखुश होते. पण अखेर त्यांनी देखील हे नातं स्वीकारले असून आता दोघांच्या कुटुंबांनी लग्नाला होकार दिल्याची बातमी पुढे आली आहे.

एकमेकांना करत होते डेट

राज आणि मुनमुन हे बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत असल्याचंही बोललं जात होतं. सेटवर देखील सगळ्यांनाच त्यांच्या अफेअरची माहिती होती. पण दोघांचे लग्न होईल असा विचार कोणी केला नव्हता. पण ही बातमी किती खरी आणि किती खोटी याची अजून दोघांकडून ही पुष्टी झालेली नाही. त्यामुळे जोपर्यंत दोघांकडून अधिकृत माहिती येत नाही तोपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

2021 मध्ये पहिल्यांदा मुनमुन दत्ता आणि राज यांच्या डेटिंगची बातमी आली होती. मात्र हे चुकीचे असल्याने मुनमुन दत्ता यांनी सांगितले होते. पण आता पुन्हा एकदा दोघांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.