
Bollywood Actor : अभिनेता संजय दत्त स्टारर ‘मुन्नाभाई MBBS’ सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारणारा अभिनेता विशाल ठक्कर गेल्या 10 वर्षांपासून बेपत्ता आहे. सिनेमात अभिनेत्याने करण ही भुमिका साकारली. सिनेमात विशाल स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा मुन्नाभाईंकडून त्याला जगण्याची आशा मिळते. पण आता विशाल बेपत्ता आहे की, त्याच्यासोबत काही वाईट घडलं आहे. याबद्दल कोणालच काहीच माहिती नाही. 31 डिसेंबर 2015 रोजी रात्री 10 वाजता तो 500 रुपये घेऊन सिनेमा पाहण्यासाठी घरातून निघाला पण परतलाच नाही. त्याच्यावर बलात्काराचाही आरोप होता.
रिपोर्टनुसार, विशाल ठक्कर मित्रांसोबत हॉलिवूड ‘स्टार वॉर्स’ सिनेमा पाहण्यासाठी गेला होता. यासंबंधी त्याने सोशल मीडियावर पोस्ट देखील केली होती. पण त्यानंतर विशाल कधी घरी परतलाच नाही. नव्या वर्षाच्या पार्टीसाठी जात आहे असं सांगत, विशाल याने वडिलांना मेसेज केला. पण तो पुन्हा कधी परतलाच नाही..
मुलगा घरी परतला नाही म्हणून विशाल याच्या आईने 6 जानेवारी 2016 मध्ये पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी शोधकार्य सुरु केलं. विशाल याचे मित्र, नातेवाईक सर्वांकडे विशाल याची चौकशी केली. पण काही माहिती मिळाली नाही. परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज देखील पाहिले. पण काहीही पत्ता लागली नाही.
अखेर विशाल ठक्कर याचा फोन नंबर ट्रेस करण्यात आला आणि असं आढळून आलं की तो 1 जानेवारी 2016 रोजी सकाळी 11:45 वाजता ठाणे रोडवरील घोडबंदर येथे 45 मिनिटं थांबला होता. कॉल रेकॉर्डवरून असंही दिसून आलं की, त्याची गर्लफ्रेंड रजनी राठोड देखील त्याच्यासोबत होती. तेव्हा पोलिसांनी रजनी हिची देखील चौकशी केली.
रजनी हिच्याकडून देखील हवी तशी माहिती मिळाली नाही.. अशात पोलिसांनी रुग्णालयात देखील चौकशी केली. कोणी विशाल याचं अपहरण केलंय का? विशाल याच्या खात्यात पैसे देखील होते. पण त्याने पैसे देखील काढले नाहीत… अचानक तो गायब झाला, त्यानंतर पुन्हा कधी दिसलाच नाही.
रिपोर्टनुसार, विशाल बेपत्ता होण्याच्या तीन मैमहिने आधी, गर्लफ्रेंड रजनीने त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला होता आणि ऑक्टोबर 2015 मध्ये चारकोप पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. अभिनेत्याने तिला लग्न करण्याचं आश्वासन दिलं आणि दोघे बराच काळ लिव्ह-इन रिलेशनशिपमध्येही राहिले, पण नंतर तो लग्नासाठी टाळाटाळ करू लागला.
अनेकदा विशाल याने गर्लफ्रेंडला मारहाण देखील केली. अखेर रजनी हिने विशाल याच्यासोबत ब्रेकअप केलं. पण नंतर विशाल याने माफी मागितली. तेव्हा रजनी हिने अभिनेत्याला माफ देखील केलं. पण रजनीने आरोप केले होते की, अभिनेत्याने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले आणि तिचं शोषण केलं. आता विशाल गेल्या 10 वर्षांपासून बेपत्ता आहे. तर, विशालची गर्लफ्रेंड रजनी हिचं आता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे.