AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Naal 2 | ‘मी जातोय माझ्या खऱ्या आई जवळ…’, ‘नाळ 2’ सिनेमाचा टीझर प्रदर्शित

Naal 2 | ‘फँड्री’, ‘सैराट’, ‘झुंड’, ‘नाळ’ सिनेमांनी प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं. आता नागराज मंजुळे दिग्दर्शित 'नाळ २' सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. खुद्द नागराज मंजुळे यांनी सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित केला आहे.

Naal 2 | 'मी जातोय माझ्या खऱ्या आई जवळ...', ‘नाळ 2’ सिनेमाचा टीझर प्रदर्शित
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Oct 07, 2023 | 3:42 PM
Share

मुंबई | 07 सप्टेंबर 2023 | दिग्दर्शक नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘फँड्री’, ‘सैराट’, ‘झुंड’, ‘नाळ’ सिनेमांनी प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं. आता लवकरच ‘नाळ’ सिनेमाचा दुसरा भाग चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. ‘नाळ २’ सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. खु्द्द नागराज मंजुळे यांनी सिनेमाचा टीझर प्रदर्शित केला आहे. चाहत्यांना देखील सिनेमाचा टीझर प्रचंड आवडला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘नाळ २’ सिनेमाच्या टीझरची चर्चा रंगली आहे. टीझर पाहिल्यानंतर चाहते ट्रेलर आणि सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत. सोशल मीडियावर देखील सर्वत्र ‘नाळ २’ सिनेमाच्या टीझरची चर्चा रंगली आहे.

इन्स्टाग्रामवर ‘नाळ २’ सिनेमाचा टीझर प्रदर्शित करत कॅप्शनमध्ये, ‘दिवाळीनिमित्त झी स्टुडिओज् आणि नागराज मंजुळे यांच्याकडून प्रेक्षकांना खास भेट, सादर करत आहेत‘नाळ – भाग दोन’ १० नोव्हेंबरपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित…’ असं लिहिलं आहे. सध्या सर्वत्र ‘नाळ २’ सिनेमाच्या टीझरची चर्चा रंगील आहे.

टीझरच्या सुरुवातील चैत्या कुठेतरी चालत जाताना दिसत आहे. तेव्हा मध्येच चैत्याला त्याची क मैत्रीण भेटते आणि त्याला विचारते, ‘कुठे चालला..’ तेव्हा चैत्या म्हणतो, ‘मी माझ्या खऱ्या आईला भेटायला चाललो…’ पुढे मैत्रीण चैत्याला विचारते, ‘पुन्हा कधी येशील….’ यावर चैत्या म्हणतो ‘आता मी येतच नाही परत. मी चाललो…’ त्यानंतर चैत्या बसमधून निघून जातो.

असं टीझरमध्ये दिसत आहे, अशात चैत्या बसमधून कुठे गेला आणि सिनेमाची कथा पुढे काय असणार आहे… याबाबतची उत्सुकता चाहत्यांच्या मनात शिगेला पोहोचली आहे. टीझर पाहिल्यानंतर चाहते १० नोव्हेंबरच्या प्रतीक्षेत आहेत. कारण १० नोव्हेंबर रोजी सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना