AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patekar: नाना पाटेकर जिवंत असून तो… अभिनेत्री तनुश्री दत्ताचा खळबळजनक आरोप

Nana Patekar News: नाना पाटेकर यांचे निधन झाले आहे पण तरीही अभिनेत्री तुनश्री दत्ताला यावर विश्वास नाही. तिने आता एक विचित्र मागणी केली आहे.

Nana Patekar: नाना पाटेकर जिवंत असून तो... अभिनेत्री तनुश्री दत्ताचा खळबळजनक आरोप
| Updated on: Oct 14, 2026 | 10:53 AM
Share

Tanushree Dutta On Nana Patekar: अभिनेत्री तनुश्री दत्ताने ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर यांच्या मृत्यूबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. नाना पाटेकर जिवंत असल्याचा दावा तिने केला असून, त्यांचे पार्थिव कोणीही का पाहिले नाही, असा प्रश्नही तिने उपस्थित केला आहे. अभिनेत्याच्या अंत्यविधीची वेळ आणि प्रार्थना सभेचा अभाव यावरही तिने आश्चर्य व्यक्त केले. तिने या प्रकरणात डीएनए चाचणीची मागणीही केली आहे.

सोमवारी रात्री इंस्टाग्राम लाईव्ह दरम्यान, तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्या मृत्यूबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. इतक्या प्रसिद्ध अभिनेत्याला अखेरचा निरोप देण्याची संधी लोकांना का दिली नाही आणि रात्री इतक्या घाईघाईने त्यांचा अंत्यसंस्कार का करण्यात आला, असा प्रश्न तिने विचारला. चित्रपटसृष्टीतील किंवा माध्यमांतील कोणीही नाना पाटेकर यांचे पार्थिव पाहिले नाही, असा दावा अभिनेत्रीने केला आहे.

ती म्हणाली, “बॉलिवूड इंडस्ट्रीतील किंवा माध्यमांतील कोणीही नाना पाटेकर यांचे पार्थिव पाहिले नाही. मध्यरात्री अंत्यसंस्कार करण्याची एवढी घाई का होती?” हिंदू परंपरेनुसार, सहसा सूर्यास्तानंतर अंत्यसंस्कार केले जात नाहीत, पण त्यांचे अंत्यसंस्कार रात्री ११:२८ वाजता करण्यात आले. इतक्या अंधारात अंत्यसंस्कार करण्याची एवढी घाई का होती? त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा चेहरा नीट पाहिला तरी होता का?

तनुश्री दत्ता एवढ्यावरच थांबली नाही. नाना पाटेकर यांच्यासारख्या एका प्रख्यात अभिनेत्याच्या निधनानंतर प्रार्थना सभा का आयोजित केली गेली नाही, असा प्रश्न तिने उपस्थित केला. तनुश्री म्हणाली, “अशा महान आणि दिग्गज व्यक्तीसाठी प्रार्थना सभा आयोजित करायला हवी होती, जेणेकरून बॉलिवूड आणि मीडियामधील लोक येऊन श्रद्धांजली वाहू शकले असते आणि त्यांना शेवटचे पाहू शकले असते. हिंदू परंपरेनुसार, लोक अखेरचा निरोप देतात, पार्थिवाला स्पर्श करतात आणि आदर व्यक्त करतात.”

ती पुढे म्हणाली, “लोकांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली, पण त्यांनी प्रत्यक्षात पार्थिव पाहिले का? त्यांचा चेहरा झाकलेला होता. गावकरी कदाचित असे प्रश्न विचारणार नाहीत, पण इतर नक्कीच विचारतात. कोणाचे अंत्यसंस्कार झाले?” नाना पाटेकर यांचे पार्थिव रुग्णालयात नेत असल्याचा व्हिडिओ का दिसला नाही?”

ती म्हणाली, “जेव्हा माझा अपघात झाला, तेव्हा माझे फोटो आणि व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आले होते. पण इथे, नाना पाटेकर यांचा एकही व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मृत घोषित करण्यात आले आणि शवविच्छेदनही करण्यात आले. ज्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले तो नाना पाटेकर यांचा नव्हता.  मला वाटते की ते सिंगापूर किंवा मलेशियामध्ये जिवंत असू शकतात. कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी त्यांनी आपल्या मृत्यूचे नाटक रचले असावे आणि बनावट मृत्यू प्रमाणपत्र मिळवले असावे. जर त्यांनी आपला चेहरामोहरा बदलला असेल, तर त्यांची ओळख निश्चित करण्यासाठी डीएनए चाचणी केली पाहिजे.”

Follow Us
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिस...
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर अभिजीत दीपकेंचा संताप
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलना
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत अमित शहांचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर हालचालींना वेग, नंदनवनवरील बैठकीत...
एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर हालचालींना वेग, नंदनवनवरील बैठकीत महत्त्वाची चर्चा? उदय सामंत म्हणाले...
अभिजीत दीपकेंनी नागपूर पोलिसांकडून सुरक्षा नाकारली, अचानक...
अभिजीत दीपकेंनी नागपूर पोलिसांकडून सुरक्षा नाकारली, अचानक... मोठं कारण समोर
दुर्गा पूजेसाठी जात असताना भयंकर घडलं; ममता बॅनर्जींना थेट...
दुर्गा पूजेसाठी जात असताना भयंकर घडलं; ममता बॅनर्जींना थेट... मद्यधुंद महिलेचा धक्कादायक कारनामा
मोठी दुर्घटना टळली! डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवासी लिफ्ट मधेच अडकली,
मोठी दुर्घटना टळली! डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवासी लिफ्ट मधेच अडकली, 15 मिनिटांसाठी....
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?