AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patekar: निळाशार सुमद्र, उंच झाडं.. जिम ट्रेनरने दाखवली नाना पाटेकरांच्या गोव्यातील घराची झलक

Nana Patekar Goa house: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नाना पाटेकर यांच्या गोव्यातील घराची झलक दिसत आहे. हे घर बाहेरुन जेवढे सुंदर दिसत आहे तेवढेच आतुन देखील असल्याचे दिसत आहे.

Nana Patekar: निळाशार सुमद्र, उंच झाडं.. जिम ट्रेनरने दाखवली नाना पाटेकरांच्या गोव्यातील घराची झलक
Nana patekar Goa HomeImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Oct 13, 2026 | 9:12 AM
Share

दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांनी 8 ऑक्टोबर रोजी गोव्यातील घरी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 75 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. नाना पाटेकर हे वयाच्या 75व्या वर्षी देखील अतिशय फिट होते. सतत व्यायाम करायचे. त्यांनी घरात देखील एका कोपऱ्यात जीम तयार केली होती. जेथे ते नेहमी व्यायाम करत असत. आता नाना यांच्या निधनानंतर त्यांच्या जिम ट्रेनरने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांचे गोव्यातील घर देखील दिसत आहे.

shalvi_fitness_goa या अकाउंटवरून नाना पाटेकर यांच्या घराची झलक दाखवणारा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर त्यांच्याशी संबंधित प्रत्येक गोष्ट चाहते जाणून घेत आहेत. या व्हिडिओमध्ये घरातील काही भाग, व्यायामासाठी तयार केलेली जागा, साधी सजावट आणि घरातून दिसणारा निळाशार समुद्र स्पष्ट दिसतो. घरातील साधेपणा आणि आजूबाजूचा शांत परिसर विशेष लक्ष वेधून घेतो.

व्यायामासाठी खास जागा

व्हिडिओत नाना पाटेकर यांनी व्यायामासाठी स्वतंत्र जागा तयार केलेली दिसते. घरातच व्यायाम करता यावा यासाठी अशी व्यवस्था ठेवणे ही उपयुक्त कल्पना आहे. त्यामुळे रोजच्या व्यायामासाठी बाहेर जाण्याची गरज कमी होते आणि वेळही वाचतो. या घराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आजूबाजूचा निसर्ग. व्यायाम करताना समोर निळाशार समुद्र दिसत असेल, तर वातावरण अधिक प्रसन्न वाटू शकते.

मोकळी हवा, शांत परिसर आणि समुद्राचे सुंदर दृश्य यामुळे व्यायाम करण्याचा अनुभवही खास होतो. तुमच्या घरातही व्यायामासाठी जागा तयार करायची असेल, तर मोठी खोली असणे आवश्यक नाही. घरातील एखादा मोकळा कोपरा निवडून तिथे योगा मॅट, काही हलकी व्यायामाची साधने आणि आरसा ठेवता येईल. खिडकीजवळ अशी जागा तयार केल्यास नैसर्गिक प्रकाशही मिळेल.

साधी सजावट, खास परिणाम

नाना पाटेकर यांच्या घराच्या व्हिडिओमध्ये सरस्वती मातेची फ्रेमही दिसते. घरात देवदेवतांच्या किंवा आवडत्या चित्रांच्या फ्रेम लावल्यामुळे घराला वेगळे रूप मिळते. विशेष म्हणजे अशा सजावटीसाठी खूप खर्च करण्याची गरज नसते. घरातील भिंतीचा रंग आणि फ्रेमचा रंग यांची योग्य निवड केली, तर साधी फ्रेमही सुंदर दिसते. देवघरासाठी स्वतंत्र जागा नसेल, तर स्वच्छ आणि शांत कोपऱ्यात छोटी फ्रेम लावता येते. तिच्या आजूबाजूला जास्त वस्तू न ठेवता साधी सजावट केल्यास ती अधिक उठून दिसते. घर सजवताना प्रत्येक भिंतीवर वेगवेगळी चित्रे लावण्यापेक्षा काही निवडक चित्रे लावणे चांगले. त्यामुळे घरात गर्दी वाटत नाही आणि प्रत्येक वस्तूचे सौंदर्यही टिकून राहते.

Follow Us
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान