Ajit Pawar Death: अजित पवार यांच्या अपघातावरुन नाना पाटेकर म्हणाले, ‘शिक्षा तर मिळणारच आणि…

Ajit Pawar Death: राज्याचे माजी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अजित पवार यांच्या निधनावर अनेक प्रश्न उपस्थित होत असताना अभिनेते नाना पाटेकर यांनी देखील मोठं वक्तव्य केलं आहे.

Ajit Pawar Death: अजित पवार यांच्या अपघातावरुन नाना पाटेकर म्हणाले, शिक्षा तर मिळणारच आणि...
अभिनेते नाना पाटेकर
| Updated on: Feb 13, 2026 | 10:42 AM

Ajit Pawar Death: राज्याचे माजी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर अनेक प्रश्न देखील उपस्थित केले जात आहे. आता अजित पवार यांच्या निधनावर दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. अजित पवार यांच्या निधनावर रोहित पवार यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. यावर नाना पाटेकर म्हणाले, ‘घरातल्या सदस्याला गमावलं आहे. त्यांनी त्यांच्या काकांना गमावलं आहे. त्यामुळे त्यांना जे वाटलं, ते प्रश्न त्यांनी उपस्थित केले… ते (रोहित पवार) काय म्हणाले याबद्दल मला काहीही माहिती नाही. त्यामुळे मी कोणतीच टिपण्णी करु शकत नाही…’. अजित पवार यांचा घातपात झाल्याचा संशय रोहित पवार यांनी व्यक्त केला, यावर नाना पाटेकर म्हणाले, ‘कोणी काही केलं असेल तर, ते चौकशीत समोर येईल. सत्य समोर येईलच आणि त्यांना शिक्षा होईलच…’ असं देखील नाना पाटेकर म्हणाले.

नाना पाटेकर आणि अजित पवार यांची मैत्री…

अजित पवार यांच्या निधनावर शोक व्यक्त करत नाना पाटेकर म्हणाले, ‘अजित पवार मला लहान भावासारखे होते… 19 – 20 वर्षांचे होते, तेव्हापासून माझी आणि त्यांची मैत्री होती… एका कार्यकर्ता म्हणून काम करत होते, तेव्हापासून मी अजित पवार यांना पाहात आहे. जिथून त्यांनी सुरुवात केली आणि ज्या पदापर्यंत झेप घेतली तो प्रवास कमालीचा होता. राजकारण सोडून द्या… पण मी त्यांना कायम मीस करेल.. अजित पवार माझ्या चांगल्या मित्रासारखे होते…’ असं देखील नाना पाटेकर म्हणाले.

 

 

पुढे नाना पाटेकर यानी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या यावर देखील भाष्य केलं… ‘सुनेत्रा पवार यांचं दुःख इतरांपेक्षा फार वेगळं आहे… त्यांनी जो पदभार स्वीकारला आहे, त्याची जबाबदारी त्यांना घ्यावी लागेल… त्या सांभाळतील देखील, पण वेळ तर लागेलच…’, असं देखील नाना पाटेकर म्हणाले सध्या नाना पाटेकर यांचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.

अजित पवार यांचं निधन

28 जानेवारी 2026 रोजी मुंबईहून बारामतीच्या दिशेने सभेसाठी निघालेल्या अजित पवार यांच्या विमानाचा धावपट्टीजवळ असलेल्या शेतात अपघात झाला. या अपघतात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. अपघातानंतर राजकारणातील हलचालींना वेग आलं…