AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patekar: नशीब बलवत्तर म्हणून बॉम्बस्फोटातून वाचल्या नीलकांती पाटेकर; नानांनी शपथच घेतलेली, ‘संजय दत्तसोबत कधीच..’

Nana Patekar Wife: नाना पाटेकर यांनी संजय दत्तसोबत कधीच काम करणार नाही असा निर्णय घेतला होता. पण असं का यामागचे नेमके कारण काय आहे ते जाणून घ्या...

Nana Patekar: नशीब बलवत्तर म्हणून बॉम्बस्फोटातून वाचल्या नीलकांती पाटेकर; नानांनी शपथच घेतलेली, 'संजय दत्तसोबत कधीच..'
| Updated on: Oct 13, 2026 | 8:07 AM
Share

Nana Patekar On Sanjay Dutt: ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन झाले आहे. त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने सर्वांना धक्का बसला आहे. ८ ऑक्टोबर रोजी गुरुवारी सकाळी गोव्यातील त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. पुण्यात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नाना यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीला धक्का बसलाय. अशातच नाना यांच्या बद्दलच्या अनेक माहित नसलेल्या गोष्टी समोर आल्या आहेत.

नाना पाटेकर हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि ठाम मतांसाठी ओळखले जातात. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटात नानांनी आपला भाऊ गमावला होता. peepingmoon.com च्या वृत्तानुसार, नानांचा भाऊ ज्या बसमधून प्रवास करत होता, त्या बसमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला होता. त्याच बॉम्बस्फोटात नानां यांच्या भावाचा मृत्यू झाला. नानांनी आपल्या भावाच्या मनगटावरील ब्रेसलेटवरून त्याच्या मृतदेहाची ओळख पटवली होती. नाना आपल्या भावाच्या मृत्यूच्या दुःखातून कधीच सावरले नाहीत. अनेक मुलाखतींमध्ये ते आपल्या भावाच्या मृत्यूविषयी बोलताना दिसले. यात एक गोष्ट चांगली झाली ती म्हणजे त्यांची पत्नी थोडक्यात वाचली.

१२ मार्च १९९३ रोजी झालेला बॉम्बस्फोट हा त्या १२ साखळी बॉम्बस्फोटांपैकी एक होता, या बॉम्बस्फोटात नानांच्या भावाचा मृत्यू झाला, पण त्यांची पत्नी वाचली. पाटेकर यांची पत्नी वाचली कारण ती त्यांच्या आधीच्या बसमध्ये चढली होती. या घटनेचा इतका धक्का नाना यांना बसला की त्यांनी ठरवलं की मी आता संजय दत्तसोबत कधीच काम करणाकर नाही. नाना यांनी एका मुलाखतीत सांगितले, “मी भविष्यात संजय दत्तसोबत काम करणार नाही. १९९३ मध्ये जे घडले त्यामुळे मला खूप दुःख झाले आहे. मी असे म्हणत नाही की संजू यासाठी जबाबदार आहे… पण या घटनेत त्याची भूमिका छोटी असो किंवा मोठी, मला त्याच्यासोबत काम करायचे नाही. ही वैयक्तिक राग नाही, माझा भाऊ बळी ठरला म्हणूनही मी हे म्हणत नाही, किंवा याचा हिंदू-मुस्लिमांशी काही संबंध नाही; त्यादिवशी ज्या लोकांनी जीव गमावला त्यासाठी मी हा निर्णय घेत आहे. माझ्या वतीने त्याला मिळणारी ही एकमेव शिक्षा आहे.”

‘फर्स्ट पोस्ट’च्या वृत्तानुसार, नाना पाटेकर एका वृत्तवाहिनीला म्हणाले, “मी माझ्या २२ वर्षांच्या कारकिर्दीत त्याच्यासोबत काम केलेले नाही आणि भविष्यातही करणार नाही. सरकारला जे हवे ते ते करतील. पण जे मला वाटते ते तर मी करु शकतो ना.”

Follow Us
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान