AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patekar: संजय दत्त दोषी असेल तर मी.. मुंबई बॉम्बस्फोटात भाऊ गमावल्यानंतर नाना पाटेकर स्पष्टच बोललेले…

Nana Patekar On Sanjay Dutt: नाना पाटेकर यांचे नुकतेच निधन झाले. आता त्यांच्या निधनानंतर अनेक माहित नसलेली माहिती समोर येत आहे. यातच आता नाना यांनी संजय दत्त याच्यासोबत चित्रपट न करण्याचा निर्णय घेतला होता ही बाब आता समोर आली आहे आणि त्यामागचे कारणही.

Nana Patekar: संजय दत्त दोषी असेल तर मी.. मुंबई बॉम्बस्फोटात भाऊ गमावल्यानंतर नाना पाटेकर स्पष्टच बोललेले...
| Updated on: Oct 12, 2026 | 12:58 PM
Share

Nana Patekar Death: ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन झाले आहे. त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने सर्वांना धक्का बसला आहे. ८ ऑक्टोबर रोजी गुरुवारी सकाळी गोव्यातील त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. पुण्यात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले गेले. अनेकांनी नाना यांच्या जाण्याचा शोक व्यक्त केला. पण भुवय्या तेव्हा उंचावल्या जेव्हा संजय दत्तने नाना यांच्यासाठी एक पोस्ट शेअर केली. नाना यांनी संजूसोबत कधीच काम करणान नाही असं ठरवले होते पण का यामागचे कारण जाणून घ्या…

१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटात नाना पाटेकर यांनी आपला भाऊ गमावला होता आणि त्यासाठी त्यांनी संजय दत्तला जबाबदार धरले होते. peepingmoon.com च्या वृत्तानुसार, नानांचा भाऊ ज्या बसमधून प्रवास करत होता, त्या बसमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला होता. त्याच बॉम्बस्फोटात नाना यांच्या भावाचा मृत्यू झाला. नानांनी आपल्या भावाच्या मनगटावरील ब्रेसलेटवरून त्याच्या मृतदेहाची ओळख पटवली होती. नाना आपल्या भावाच्या मृत्यूच्या दुःखातून कधीच सावरले नाहीत. अनेक मुलाखतींमध्ये ते आपल्या भावाच्या मृत्यूविषयी बोलताना दिसले.

१२ मार्च १९९३ रोजी झालेला बॉम्बस्फोट हा त्या १२ साखळी बॉम्बस्फोटांपैकी एक होता, या बॉम्बस्फोटात अनेक जीवित हानी झालेली. या जीवित हानीत नानांच्या भावाचा मृत्यू झाला. यासाठी नाना यांनी अप्रत्यक्षरित्या संजय दत्त याला जबाबदार धरले होते. नाना यांनी एका मुलाखतीत सांगितले, “मी भविष्यात संजय दत्तसोबत काम करणार नाही. १९९३ मध्ये जे घडले त्यामुळे मला खूप दुःख झाले आहे. मी असे म्हणत नाही की दत्त यासाठी जबाबदार आहे… पण जरी त्या घटनेत त्याची भूमिका छोटी असली तरीही, मला त्याच्यासोबत काम करायचे नाही. ही काही वैयक्तिक बाब नाही, माझा भाऊ गेला म्हणून मी हे म्हणत नाही, किंवा याचा हिंदू-मुस्लिमांशी काही संबंध नाही; मी हे त्या दिवशी मरण पावलेल्या सर्वांसाठी हा निर्णय घेत आहे. माझ्या वतीने संजूला मिळणारी ही एकमेव शिक्षा आहे.”

‘फर्स्ट पोस्ट’च्या वृत्तानुसार, नाना पाटेकर एका वृत्तवाहिनीला म्हणाले, “मी माझ्या २२ वर्षांच्या कारकिर्दीत त्याच्यासोबत काम केलेले नाही आणि भविष्यातही करणार नाही. सरकारला जे हवे ते ते करतील. हे कायदेशीर असून यावर काय मी जास्त भाष्य करत नाही. पण जे मला जे जमेल ते मी करेन.”

Follow Us
संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा..
Devendra Fadnavis : संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा विरोधकांना सवाल
सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
CJP Protest : सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार....
Raj Thackeray : MNS : राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसेचा पुढाकार
वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित...
CM Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित; निमंत्रण नव्हतं की....
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
Rahul Gandhi | इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, म्हणाले
Devendra Fadnavis : शेतकऱ्यांनो, गोधन विकू नका; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, पुढे म्हणाले...
इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
Delhi Protest : ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
Thackeray Bandhu : ज्ञानेश कुमार हटाव आंदोलनानंतर ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष
MPSC Protest Update : विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार चौकशी पूर्ण होईपर्यंत....