AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patekar : ‘नाना तसेही तोडफोड करणारे…’, सेट तोडून संतापात का निघून गेलेले नाना पाटेकर? जाणून व्हाल थक्क

Nana Patekar : दिग्गज अभिनेता नाना पाटेकर यांच्या निधनानंतर त्यांच्याबद्दल अनेक किस्से समोर येत आहेत. एकदा तर दिग्दर्शकावर संताप व्यक्त करत नाना शुटिंग पूर्ण होण्यापूर्वीच सेट तोडून निघून गेलेले... तेव्हा नेमकं काय झालेलं जाणून घ्या...

Nana Patekar : 'नाना तसेही तोडफोड करणारे...', सेट तोडून संतापात का निघून गेलेले नाना पाटेकर? जाणून व्हाल थक्क
Nana Patekar
| Updated on: Oct 12, 2026 | 12:23 PM
Share

Nana Patekar : मराठी आणि हिंदी सिनेविश्व गाजवणारे अभिनेते नाना पाटेकर यांनी अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण 8 ऑक्टोबर 2026 रोजी नाना यांनी अखेरचा श्वास घेतला आणि चाहत्यांना रडवून गेले. नाना पाटेकर यांच्या निधनानंतर अनेक जण त्यांच्यासोबत असणाऱ्या आठवणी शेअर करत आहे. आता ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळी यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून दिवंगत अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. सोबतच त्यांनी त्यांचे सेटवरचे किस्सेही शेअर केले आहेत.

मिलिंद गवळी यांनी काही फोटो पोस्ट करत भावना व्यक्त केल्या आहेत. गवळी म्हणाले, ‘परवा नाना पाटेकर आपल्यातून कायमचे निघून गेले. खरंतर मी नाना पाटेकरांबरोबर कधीच काम केलं नव्हतं. पण नाना पाटेकर हे माझ्या कलाक्षेत्रातल्या प्रवासामध्ये टप्प्याटप्प्यावर येत राहिले, माझ्या अनेक सह कलाकारांकडून आणि इतरांकडून नाना पाटेकर यांचे किस्से ऐकायला मिळायचे, अजित दांडेकर हे यशवंत सिनेमाचे कलादिग्दर्शक होते, सिनेमांमध्ये सीना असा होता नाना पाटेकर यांना एका करप्ट पोलीस वाल्यांच्या घराची तोडफोड करायची होती, निर्मात्याने अजित दांडेकरला सांगितलं ‘नाना वैसेभी सब तोडफोड करने वाला है तो सस्ता माल लेकर घर का सेट डेकोरेट करो….’, नाना शूटिंगसाठी सेटवर आले, सेट पाहिला, त्यांनी अजित दांडेकरला नेहमीच्या शिव्या घातल्या आणि मग त्याला विचारलं पैसे खाणाऱ्या पोलीस वाल्याच्या घरी हे असं फालतू सामान असेल का?’

नानाने शूटिंग सुरू व्हायच्या आधीच सेट तोडून टाकला, गाडीत बसले आणि घरी निघून गेले. अजित दांडेकर निर्मात्याला म्हणाला मैने आपको बोला था. मग कधीतरी नाना पाटेकर यांनी कोणाच्यातरी मुस्काटात मारल्याची बातमी कानावर यायची. नानाचा स्वभाव सनकी आहे याची मला खात्री पटली होती. पण नाना पाटेकरांचा अभिमान नेहमी वाटायचं कारण हा एकमेव असा मराठी कलाकार होता जो हिंदीतल्या रती महारती कलाकारांना दिग्दर्शकांना निर्मात्यांना पुरून उरला होतं…’

अभिनेते पुढे म्हणाले, ‘एकमेव असा कलाकार जो स्वतःच्या terms and conditions वर काम करायचा. एकमेव असा कलाकार होता जो सडेतोड बोलायचा, निडर होता. मला नाना पाटेकर कलाकार म्हणून आवडायचे पण मकरंद अनासपुरे आणि त्यांनी “नाम” फाउंडेशन मध्ये जे काम केलं त्यानंतर तर माणूस म्हणून फारच Great झाले नाना. प्रकाश आमटे यांच्या आश्रमात डोळ्यांचे मोफत ऑपरेशन डॉक्टर लहाने करायचे त्यावेळेला नाना पाटेकर तिथे रात्र रात्र त्यांच्याबरोबर जागायचे. हे मला डॉक्टर लहान्यांनीच सांगितलं…’

एवढंच नाही तर, अनाथ मुलांना देखील नाना पाटेकर यांनी प्रचंड मदत केली आहे. यावर मिलिंद म्हणाले, ‘पुण्याचे फळणीकर यांच्या आश्रमात आम्ही “आई कुठे काय करते” चे कलाकार गेलो असताना‌ त्याच वेळेला नाना पाटेकर यांचा फळणीकरांना फोन आला होता, नाना पाटेकर विचारत होते तिकडच्या आनाथ मुलांना पुरेसं धान्य आहे ना का पाठवून देऊ? ते ऐकल्यानंतर त्यांच्याबद्दलचा आदर कैकपटीने वाढला. त्या दिवशीच माझ्यासाठी नाना पाटेकर हा महान झाले होते. त्यांना भेटायचं, त्यांच्याबरोबर काम करायचं राहून गेलं. स्मिता पाटील नंतर नाना पाटेकर यांच्याबरोबर आपण काम केलं नाही याची मनात कायम खंत राहील…’, सध्या मिलिंद गवळी यांची पोस्ट व्हायरल होत आहे.

Follow Us
वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित...
CM Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित; निमंत्रण नव्हतं की....
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
Rahul Gandhi | इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, म्हणाले
Devendra Fadnavis : शेतकऱ्यांनो, गोधन विकू नका; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, पुढे म्हणाले...
इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
Delhi Protest : ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
Thackeray Bandhu : ज्ञानेश कुमार हटाव आंदोलनानंतर ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष
MPSC Protest Update : विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार चौकशी पूर्ण होईपर्यंत....
सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? Video बघाच
MPSC Protest : सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? पूर्ण Video बघाच
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले,
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले, हा युवा पिढीच्या...
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...