AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patekar: काय समजतेस काय स्वत:ला? सोनाली कुलकर्णीवर या कारणामुळे खूप चिडले होते नाना पाटेकर

Nana Patekar: नाना पाटेकर यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि अनुभवी अभिनेत्यासमोरही सोनालीने आपलं मत स्पष्टपणे मांडलं. दोघांमध्ये सुरुवातीला वाद होत असले, तरी त्यातून निर्माण झालेलं सौहार्दाचं नातं तिच्यासाठी महत्त्वाचं होतं.

Nana Patekar: काय समजतेस काय स्वत:ला? सोनाली कुलकर्णीवर या कारणामुळे खूप चिडले होते नाना पाटेकर
Sonali Kulkarni and Nana PatekarImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 13, 2026 | 8:56 AM
Share

Nana Patekar: अभिनेते नाना पाटेकर यांचा स्पष्टवक्तेपणा, रांगडा स्वभाव आणि रोखठोक बोलण्याची शैली यांची नेहमीच चर्चा होते. आपल्या मनात जे आहे ते थेट बोलणारे नाना अनेकदा त्यांच्या स्वभावामुळे चर्चेत येतात. मात्र, त्यांच्या या स्वभावामागे कामाप्रती असलेली निष्ठा आणि अपेक्षाही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने नाना पाटेकर यांच्यासोबत काम करतानाचे काही अनुभव सांगितले आहेत. सुरुवातीला दोघांमध्ये अनेकदा वादाचे प्रसंग घडले, पण याच प्रसंगांमधून त्यांच्यात एक वेगळं नातं निर्माण झालं. एका चित्रपटाच्या ऑफरला नकार दिल्यामुळे नाना पाटेकर सोनाली कुलकर्णीवर चांगलेच चिडले होते. त्यावेळी त्यांनी सोनालीला नेमकं काय म्हटलं होतं, याचा किस्सा अभिनेत्रीने सांगितला आहे.

नाना पाटेकरांसोबत सुरुवातीला व्हायचे वाद

सोनाली कुलकर्णी हिने ‘लोकसत्ता’ वृत्तपत्रात लिहिताना नाना पाटेकर यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. नानांसोबत प्रत्यक्ष काम करण्याची वेळ आली, तेव्हा अनेकदा त्यांच्या संवादाची सुरुवात वादविवादानेच व्हायची, असं सोनालीने सांगितलं. नानांचा रांगडा स्वभाव आणि दोघांमध्ये रंगणारे वाद यांचा उल्लेख करताना तिने या प्रसंगांमधूनच त्यांच्यात कधीही न संपणारं सौहार्दाचं नातं फुलल्याचं सांगितलं. अनेकदा समोरच्या व्यक्तीचा स्वभाव समजून घेण्यासाठी वेळ लागतो. नाना पाटेकर यांची एनसीपीएमध्ये ‘ऑथेल्लो’ साकारतानाची प्रतिमा सोनालीच्या मनात ठसली होती. त्यानंतर काही वर्षांनी एका चित्रपटाची ऑफर तिच्याकडे आली. मात्र, त्या चित्रपटाच्या निर्मात्याचं वर्तन सोनालीला आवडलं नाही. त्यामुळे तिने त्या निर्मात्यासोबत काम न करण्याचा निर्णय घेतला. निर्मात्याचं वर्तन पसंत न पडल्याने तिने दिग्दर्शकाचाही विचार केला नाही आणि चित्रपटाला स्पष्ट नकार दिला.

चित्रपटाला नकार दिल्याचं ऐकताच नाना संतापले

त्यावेळी सोनाली भाड्याच्या घरात राहत होती. तिचा संपर्क क्रमांक मिळवून नाना पाटेकर यांनी तिला फोन केला आणि चित्रपटातील सीन्स वाचण्यासाठी रिहर्सलला त्यांच्या घरी येण्यास सांगितलं. मात्र, सोनालीने आपण तो चित्रपट करत नसल्याचं स्पष्ट केलं. हे ऐकताच नाना पाटेकर चांगलेच संतापले. ‘काय समजतेस काय स्वत:ला? माझ्या समोर सिनेमे निवडण्याइतकी मोठी झालीस का तू?’ अशा शब्दांत त्यांनी सोनालीला सुनावलं. नानांचा हा राग पाहूनही सोनालीने आपला निर्णय बदलला नाही. चित्रपट नाकारण्यामागचं कारण तिने त्यांना स्पष्टपणे सांगितलं आणि आपल्या भूमिकेवर ठाम राहिली.

Follow Us
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान