Nana Patekar: नाना पाटेकरांच्या निधनाने मुलगा मल्हार पूर्णपणे खचला; रुग्णालयात पोहोचताच अश्रू अनावर, व्हिडीओ समोर
Nana Patekar: नाना पाटेकर यांच्या निधनाच्या वृत्ताने त्यांचा मुलगा मल्हार पूर्णपणे खचला आहे. त्याचा हा व्हिडीओ समोर आला असून त्यात तो अत्यंत भावूक झाल्याचं पहायला मिळत आहे.

Nana Patekar: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. वयाच्या 75व्या वर्षी नाना पाटेकर यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. नाना पाटेकर यांचा मुलगा मल्हार पाटेकर याचाही अश्रूंचा बांध फुटला. मल्हारचा रुग्णालयातील एक व्हिडीओ सध्या समोर आला असून, वडिलांच्या निधनाचं दु:ख त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी समजली तेव्हा मल्हार आणि कुटुंबीय पुण्यात होते. वडिलांच्या निधनाची माहिती मिळताच ते वेळ न दवडता गोव्याच्या दिशेने रवाना झाले. तातडीने गोव्यात पोहोचल्यानंतर मल्हार रुग्णालयात दाखल झाला.
रुग्णालयात पोहोचताच मल्हारला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणं कठीण झालं. वडिलांच्या निधनाचा धक्का त्याला सहन झाला नाही आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. यावेळी त्याच्यासोबत असलेल्या काही लोकांनी त्याला आधार देण्याचा प्रयत्न केला. काही जण त्याचं सांत्वन करताना दिसले, तर काहींनी त्याला धीर देत परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये मल्हार अत्यंत भावूक अवस्थेत दिसत आहे. आपल्या वडिलांना गमावल्याचं दु:ख त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत आहे.
पहा व्हिडीओ-
Nana Patekar: नाना पाटेकर यांच्या निधनाने पूर्णपणे खचला मुलगा मल्हार
#NanaPatekar #MalharPatekar https://t.co/JeJcK1KuWa— TV9 Marathi (@TV9Marathi) October 8, 2026
नाना पाटेकर आणि त्यांचा मुलगा मल्हार यांचं नातंही अनेकदा चर्चेत आलं आहे. मल्हारने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत मनोरंजन क्षेत्रात काम केलं आहे. त्याने दिग्दर्शनाच्या क्षेत्रातही आपली ओळख निर्माण केली. नाना पाटेकर यांच्या निधनानंतर त्यांच्या शेवटच्या क्षणांबाबतही अनेक माहिती समोर येत आहे. गोव्यातील घरी असताना त्यांना अस्वस्थ वाटत असल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर मित्र आणि केअरटेकर यांनी त्यांना रुग्णालयात नेलं. रुग्णालयात नेत असतानाच CPR सुरू करण्यात आला. डॉक्टरांच्या टीमने जवळपास 45 मिनिटे त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले. मात्र पहाटे 5.20 वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आलं.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी गोव्यातील एका कार्यक्रमात नाना पाटेकर यांनी आयुष्य आणि मृत्यूबाबत केलेलं वक्तव्यही चर्चेत आलं होतं. “उद्या आहे, नाही… माहीत नाही,” असं म्हणत त्यांनी आयुष्याबद्दल आपले विचार व्यक्त केले होते. आता त्यांच्या निधनानंतर त्यांचे हे शब्द आणि शेवटचे व्हिडीओ अधिकच भावूक करणारे ठरत आहेत.