Nana Patekar : मुंबईचा डेंजर डॉन होता नाना पाटेकरांचा भाऊ, आईने घेतला होता मोठा निर्णय, कुटुंबासाठी गावाकडे …

ओरडणारे हे अजिबात गुंड नसतात. जो गुंड असतो तो शांत असतो. हिंसक व्यक्ती ही मी तुला मारतो कधीच म्हणत नाही. अशिक्षित माणूस गुंड झालेला परवडतो. सुशिक्षित झालेला गुंड मात्र परवडत नाही, असं नाना पाटेकर यांनी सांगितले.

Nana Patekar : मुंबईचा डेंजर डॉन होता नाना पाटेकरांचा भाऊ, आईने घेतला होता मोठा निर्णय, कुटुंबासाठी गावाकडे ...
nana patekar and manya surve
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 08, 2026 | 8:30 PM

Nana Patekar Death : ज्येष्ट अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले. हृदयविकाराच्या झटका आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नाना पाटेकर यांचा बॉलिवूडपासून ते मराठी सिनेसृष्टीपर्यंत वावर होता. त्यांच्याकडे सिनेजगतात आदराने पाहिले जायचे. त्यांच्या जाण्याने सिनेजगतापासून ते राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनी हळहळ व्यक्त केली आहे. दरम्यान, आता नाना पाटेकर यांच्या निधनानंतर त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जातोय. त्यांनी एका कार्यक्रमात हिंसा, गुंड यावर भाष्य केलं होतं. विशेष म्हणजे मन्या सूर्वे हा माझा भाऊ होता, असंही त्यांनी सांगितलं होतं.

मन्यू सूर्वे माझा भाऊ…

नाना पाटेकर एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मुलाखतकाराने नाना पाटेकरांनी तुम्ही एखाद्या गुंडाच्या कधी संपर्कात आले होते का? असा प्रश्न विचारला. त्यानंतर नाना पाटेकर यांनी गुंड मन्या सुर्वे आणि त्याच्याशी असलेलं नातं सांगितलं होतं. “मन्या सूर्वे हा माझा भाऊ. तो माझ्या मामाचा मुलगा. आम्ही गुन्हेगारी विश्वात जाऊ नये म्हणून आई आम्हाला गावाला मुरूडला घेऊन गेली. नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की हिंसा कधीही आरडाओरडा करत नसते,” असं सांगितलं होतं.

Loading...

अशिक्षित माणूस गुंड झालेला परवडतो

यासह ओरडणारे हे अजिबात गुंड नसतात. जो गुंड असतो तो शांत असतो. हिंसक व्यक्ती ही मी तुला मारतो कधीच म्हणत नाही. अशिक्षित माणूस गुंड झालेला परवडतो. सुशिक्षित झालेला गुंड मात्र परवडत नाही. कारण तो प्रत्येक मार्गाने विचार करू शकतो, असं सांगून हिंसा कशी असते, गुंड नेमके कसे वागतात यावरही प्रकाश टाकाल होता. दरम्यान, जडणघडणीच्या काळात चुकीच्या सवयी लागू नयेत तसेच मुलांवर चांगले संस्कार व्हावेत यासाठी नाना पाटेकर यांच्या आईने आपले कुटुंब मुरूड या गावी हलवले होते, असेही यावेळी नाना पाटेकर यांनी आवर्जुन सांगितले. दरम्यान, आज नाना पाटेकर आपल्यात नाहीत. परंतु त्यांच्या आठवणी, त्यांनी केलेलं काम कायम आपल्यात असेल, अशी भावना व्यक्त केली जातेय.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us