Nana Patekar : बॉलिवूडमध्ये येण्याची इच्छा नव्हती, तरी नाना पाटेकर झाले स्टार; पहिला चित्रपट कसा मिळाला?

हिंदी चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी नाना पाटेकर हे मराठी थिएटर, नाटकांचा महत्वाचा भाग होते. अनेक नाटकांत त्यांनी सहभाग घेतला. फिल्म्स करण्याची त्यांची इच्छा नव्हती, पण एका गोष्टीमुळे त्यांचा निर्णय बदलला.

Nana Patekar : बॉलिवूडमध्ये येण्याची इच्छा नव्हती, तरी नाना पाटेकर झाले स्टार; पहिला चित्रपट कसा मिळाला?
| Updated on: Oct 08, 2026 | 4:22 PM

Nana Patekar First Movie Bollywood Entry : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी, नाटक यातील गाजलेलं नाव म्हणजे अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar). आज पहाटे ( गुरूवार, 8 ऑक्टोबर) गोव्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला, ते 75 वर्षांचे होते. गोव्यातील घरी असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागलं, तातडीने त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं. त्यांच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला असून अनेकांचा या बातमीवर विश्वासच बस नाहीये. चित्रपटसृष्टीवरही शोककळआ पसरली असून, मराठी, हिंदी कलाकारांनी त्यांच्या जाण्याबद्दल दु:ख व्यक्त करत, श्रद्धांजली वाहिली. नाना पाटेकर हे अभिनेत उत्तम होतेच, पण ते त्यांची निर्भीड वृत्ती, स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जायचे. त्यांनी एक थिएटर आर्टिस्ट म्हणून करिअरची सुरूवात केली.

नाना पाटेकर यांना अभिनया, वारसा म्हणून मिळालं नव्हतं. त्यांचा चेहरा किंवा अंगकाठी देखील हिरोची, अभिनेत्याची नव्हती. मात्र त्यानंतरही त्यांनी मराठी, हिंदी दोन्ही चित्रपटसृष्टीवर अधिराज्य केलं, आपल्या अभिनयाने लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केलं. त्यांना पाहून लोकांना हा विश्वास मिळाला की फिल्म इंडस्ट्रीत येण्यासाठी फक्त राजेश खन्ना किंवा धर्मेंद्रसारखं दिसणं गरजेच नाही. पण आधी मराठी थिएटर गाजवणारे विश्वनाथ उर्फ नाना पाटेकर यांना, त्यांचा पहिला हिंदी चित्रपट कसा मिळाला ?

Loading...

नाना पाटेकरांना कशी मिळाली पहिली हिंदी फिल्म ?

नाना पाटेकर यांचा अभिनयाचा प्रवास रंगभूमीपासून सुरू झाला. मुंबईतील थिएटरशी ते जोडलेले होते आणि त्यातून मिळणाऱ्या कामावर त्यांचा उदरनिर्वाह चालत होता. मात्र, त्यांच्या अभिनयातील प्रतिभा तेव्हापासूनच अनेकांच्या लक्षात आली होती. त्यांच्या अभिनयाचं कौतुकही होत होतं. एका मुलाखतीत नाना पाटेकरांनी सांगितलं होतं की, दिग्दर्शिका सई परांजपे त्यांच्याकडे एका चित्रपटाचा प्रस्ताव घेऊन आल्या होत्या. त्या चित्रपटाचं नाव होतं ‘गमन’. मुजफ्फर अली या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण करत होते. चित्रपटातील वासूच्या भूमिकेसाठी सई परांजपे यांनी आधीच मुजफ्फर अली यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर त्यांनी नानांसमोर चित्रपटाची कथा मांडली. यामध्ये फारुख शेख आणि स्मिता पाटील यांचा लीड रोल होता

मात्र, ‘गमन’नंतरही नानांचं लक्ष चित्रपटांपेक्षा रंगभूमीकडेच अधिक होतं. खरं तर, बॉलिवूड अभिनेता होण्याचं स्वप्न त्यांनी कधीच पाहिलं नव्हतं. पुण्यात थिएटर करत असताना त्यांची स्मिता पाटील यांच्याशी चांगली मैत्री झाली होती. त्यावेळी स्मिता पाटील चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करत होत्या. नानांच्या अभिनयाची आणि प्रतिभेची त्यांना चांगलीच जाणीव होती. त्यामुळे त्यांनी नानांना चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी सतत प्रोत्साहित केलं.

स्मिता पाटील यांनी नानांना चित्रपटांकडे वळवलं

‘गमन’ नंतर नाना पाटेकर यांनी ‘भालू’ हा हिंदी चित्रपट केला. त्याचबरोबर ‘सिंहासन’, ‘रघु मैना’ आणि ‘सावित्री’ यांसारख्या मराठी चित्रपटांमध्येही त्यांनी काम केलं. मात्र, बॉलिवूडकडे ते विशेष आकर्षित झाले नव्हते. स्मिता पाटील मात्र नानांना चित्रपटसृष्टीत अधिक काम करण्यासाठी प्रोत्साहित करत राहिल्या. पैसा आणि प्रसिद्धीच्या संधींबद्दल सांगत त्यांनी नानांना हिंदी चित्रपटांकडे गांभीर्याने पाहण्यास प्रवृत्त केलं. याच काळात १९८४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आज की आवाज’ या चित्रपटासाठी स्मिता पाटील यांनी नाना पाटेकर यांच्या नावाची शिफारस दिग्दर्शक रवी चोप्रा यांच्याकडे केली. या चित्रपटात राज बब्बर आणि स्मिता पाटील मुख्य भूमिकेत होते. नानांना यामध्ये तुलनेने महत्त्वाची भूमिका मिळाली आणि त्यांनी आपल्या अभिनयाची दमदार छाप पाडली. त्यानंतर इंडस्ट्रीमध्ये त्यांच्या नावाची चर्चा होऊ लागली. यानंतर स्मिता पाटील यांच्या ‘गिद्ध’ या चित्रपटातही नाना पाटेकर यांनी महत्त्वाची भूमिका साकारली. या चित्रपटात ओम पुरी यांचीदेखील भूमिका होती आणि चित्रपटाचं कौतुक झालं.

‘अंकुश’ ठरला करिअरचा टर्निंग पॉइंट

नाना पाटेकर यांच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने वेग मिळाला तो 1986 मध्ये प्रदर्शित झालेल्या एन. चंद्रा यांच्या ‘अंकुश’ या चित्रपटामुळे. या चित्रपटात त्यांनी साकारलेली ‘रवी’ची भूमिका प्रेक्षकांच्या मनावर खोलवर परिणाम करून गेली. ‘अंकुश’मधील अभिनयामुळे नाना पाटेकर यांनी इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. त्यानंतर ‘तृषाग्नि’, ‘आवाम’, ‘प्रतिघात’ आणि ‘अंधा युद्ध’ यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची ताकद पुन्हा पुन्हा सिद्ध केली. पुढे ‘सलाम बॉम्बे !’, ‘परिंदा’, ‘तिरंगा’ आणि ‘क्रांतिवीर’ यांसारख्या चित्रपटांनी त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us