AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘चोली के पीछे क्या है’ गाण्यापेक्षा विचित्र गाणं, ज्याचे शब्द ऐकून तुम्हाला येईल राग

71 वर्षांपूर्वीचं प्रचंड सुपरहिट गाणं, ज्याचे शब्द होते प्रचंड विचित्र, ऐकून तुम्हाला देखील येईल राग. गाण्यात दडल्या आहेत तीन भन्नाट कोडी.

'चोली के पीछे क्या है' गाण्यापेक्षा विचित्र गाणं, ज्याचे शब्द ऐकून तुम्हाला येईल राग
| Updated on: Jul 07, 2026 | 4:54 PM
Share

सुमारे 71 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपटसृष्टीतील सदाबहार ‘श्री 420’ या चित्रपटातील ‘इचक दाना बीचक दाना’ हे गाणे आजही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या ओठांवर आहे. मनोरंजनासोबतच विचार करायला लावणारी तीन मजेदार कोडी या गाण्यात गुंफण्यात आली आहेत. अनार, मिरची आणि भुट्टा यांच्याशी संबंधित ही कोडी या गाण्याला हिंदी चित्रपटसृष्टीतील अजरामर क्लासिक बनवतात.

जुन्या हिंदी चित्रपटांतील गाण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ती केवळ ऐकण्यासाठी नसून कायम स्मरणात राहावीत अशा पद्धतीने तयार केली जात असत. काही गाणी प्रेमाची अनुभूती देतात, काही जीवनाचा अर्थ सांगतात तर काही मनोरंजनासोबतच बुद्धीला चालना देतात. ‘इचक दाना बीचक दाना’ हे असेच एक गाणे आहे, ज्यामध्ये अभिनेत्री आपल्या साथीदाराला एकामागून एक तीन कोडी विचारते आणि त्यांची उत्तरे शोधण्याचा खेळ रंगतो.

1955 मध्ये प्रदर्शित झाला होता ‘श्री 420’

1955 साली प्रदर्शित झालेल्या ‘श्री 420’ या चित्रपटात हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार राज कपूर आणि नरगिस प्रमुख भूमिकेत होते. या चित्रपटातील ‘इचक दाना बीचक दाना’ हे गाणे प्रचंड गाजले. या गाण्याला स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर आणि गायक मुकेश यांनी आवाज दिला होता. संगीतकार जोडी शंकर-जयकिशन यांनी संगीतबद्ध केले तर गीतकार हसरत जयपुरी यांनी या गाण्याचे बोल लिहिले.

या गाण्याची पहिली ओळ आहे, इचक दाना बीचक दाना, दाने ऊपर दाना, छज्जे ऊपर लड़की नाचे, लड़का है दीवाना…’ या कोड्याचे उत्तर आहे अनार (डाळिंब).

दुसरे कोडे असे आहे, ‘छोटी सी छोकरी लालबाई नाम है, पहने वो घाघरा एक पैसा दाम है, मुंह में सबके आग लगाए, आता है रुलाना…’ याचे उत्तर आहे मिरची.

तिसरे कोडे आहे, ‘हरी थी मन भरी थी, लाख मोती जड़ी थी, राजा जी के बाग में दुशाला ओढ़े खड़ी थी, कच्चे पक्के बाल हैं उसके, मुखड़ा है सुहाना…’ या कोड्याचे उत्तर आहे- मक्याचे कणीस.

आजही कायम आहे लोकप्रियता

‘इचक दाना बीचक दाना’ हे केवळ एक चित्रपटगीत नाही, तर मनोरंजन आणि शिक्षणाचा सुंदर संगम मानले जाते. मुलांना कोड्यांद्वारे विचार करण्याची सवय लावणारी ही कल्पना त्या काळात अत्यंत नावीन्यपूर्ण होती. त्यामुळे हे गाणे अनेक वर्षांपासून शाळांमधील सांस्कृतिक कार्यक्रम, कौटुंबिक समारंभ आणि विविध मंचांवर आजही आवर्जून सादर केले जाते.

Follow Us
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला बदलला असता? सिब्बल यांचा युक्तिवाद काय
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला बदलला असता? कपिल सिब्बल यांचा कोर्टात मोठा युक्तिवाद!
पुणे शिवाजीनगर कोर्टाबाहेर नेमकं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीने सांगितला..
पुणे शिवाजीनगर कोर्टाबाहेर नेमकं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीने सांगितला धक्कादायक अनुभव
इम्तियाज जलील यांचा संजय शिरसाटांवर 5 कोटींच्या मागणीचा आरोप, थेट CM..
इम्तियाज जलील यांचा संजय शिरसाटांवर 5 कोटींच्या मागणीचा आरोप, थेट CM फडणवीसांवरही निशाणा
कांद्याला 50 रुपये भाव, पण पाण्याअभावी परळीच्या शेतकऱ्यांचं पीक...
Parli : कांद्याला 50 रुपये भाव, पण पाण्याअभावी परळीच्या शेतकऱ्यांचं पीक उद्ध्वस्त!
जळगावच्या 6 मजुरांना गुजरातमध्ये कालव्यात फेकले; एकाच कुटुंबातील...
जळगावच्या 6 मजुरांना गुजरातमध्ये कालव्यात फेकले; एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत!
कोयनेचे पाणी मुंबईकडे वळवण्याच्या निर्णयावरून राजकारण, शिवेंद्रराजे...
कोयनेचे पाणी मुंबईकडे वळवण्याच्या निर्णयावरून राजकारण तापलं; शिवेंद्रराजेंनी विरोधकांना सुनावलं!
मुंबईत भरदिवसा रक्ताचा सडा! सुप्रिया सुळे संतापल्या; राज्यातील कायदा..
Pune Case : मुंबईत भरदिवसा रक्ताचा सडा! सुप्रिया सुळे संतापल्या; राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न
पुण्याच्या औधमध्ये जिल्हा रुग्णालय परिसरात शेकडो रुग्णवाहिका उद्धघाटना
Pune : पुण्याच्या औधमध्ये जिल्हा रुग्णालय परिसरात शेकडो रुग्णवाहिका उद्धघाटनाच्या प्रतिक्षेत, अरोग्यमंतत्री...
भारतामध्ये भाषा, धर्म, परंपरा वेगळ्या तरीही एकजूट, मोहन भागवतांनी...
भारतामध्ये भाषा, धर्म, परंपरा वेगळ्या तरीही एकजूट कशी? मोहन भागवतांनी सांगितलं भारतीय एकतेचं रहस्य!
पुणे कोर्टाबाहेर थरार! आधी गोळीबार, मग कोयत्याने जीवघेणा हल्ला; शहरात
पुणे कोर्टाबाहेर थरार! आधी गोळीबार, मग कोयत्याने जीवघेणा हल्ला; शहरात खळबळ