
बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहे जे त्यांच्या चित्रपटांपेक्षाही त्यांचे वैयक्तिक आयुष्य,कौटुंबिक पार्श्वभूमी म्हणजे त्या अभिनेता किंवा अभिनेत्रीच्या कुटुंबाचा इतिहास, सामाजिक-आर्थिक परिस्थिती, शिक्षण, व्यवसाय , धर्म, परंपरा याबद्दल जास्त चर्चेत असतात. त्यात जर अभिनेता किंवा अभिनेत्री मुस्लिम असेल तर जास्तच चर्चा होते. अशीच एक अभिनेत्री आहे जीने वयाच्या 16 व्या वर्षी तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या अभिनेत्रीने अमेरिकेत मॉडेल म्हणूनही काम केले आहे. नंतर ती बॉलिवूड आली. बॉलिवूडमध्ये देखील तिने बऱ्यापैकी स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. पण ती चर्चेत राहिली तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे.
ही अभिनेत्री स्वतःला ‘ग्लोबल सिटिझन’ म्हणते
ही अभिनेत्री आहे नर्गिस फाखरी. या अभिनेत्रीने रणबीर कपूरच्या ‘रॉकस्टार’ चित्रपटातून पदार्पण केले. तिने तिच्या अभिनयाने नक्कीच बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख बनवली. नर्गिस स्वतःला ‘ग्लोबल सिटिझन’ म्हणते. याचे कारण तिचे पालक आहेत जे वेगवेगळ्या देशांचे आहेत. नर्गिसची आई Czech(झेक) येथली आहे. झेक हा मध्य युरोपमधील एक भूपरिवेष्ठित देश आहे, ज्याला ‘चेकिया’ असेही म्हणतात. तर तिचे वडील पाकिस्तानी होते. पण ती 6 वर्षांची असताना तिच्या पालकांचा घटस्फोट झाला. काही वर्षांनी तिच्या वडिलांचेही निधन झाले.
गायत्री मंत्र अन् हनुमान चालीसा ऐकायला आवडतं
नर्गिसने आतापर्यंत तिच्या कारकिर्दीत 16 हून अधिक चित्रपट केले आहेत. तिचा शेवटचा चित्रपट ‘हाऊसफुल 5’ होता. दुसरीकडे, ती अनेक म्यूजिकल व्हिडिओंमध्येही दिसली आहे. या अभिनेत्रीला तिच्या अभिनयासाठी अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. नर्गिस फाखरीने स्वतः एका मुलाखतीत सांगितले होते की तिला गायत्री मंत्र ऐकायला फार आवडते. तिच्या मते, त्यामुळे तिला बरे वाटते. तिने असेही म्हटले की ती धार्मिक नाही तर आध्यात्मिक आहे. तथापि, जेव्हा जेव्हा तिला ताण येतो तेव्हा ती हनुमान चालीसा देखील ऐकते. अभिनेत्रीला सर्व धर्मांबद्दल जाणून घेण्याची इच्छा आहे.
अभिनेत्रीने उदय चोप्राला केले होते डेट
नर्गिस फाखरीचे नाव धूम अभिनेता उदय चोप्राशी जोडले गेले होते. रिपोर्ट्सनुसार, तिने 2013 ते 2017 पर्यंत उदय चोप्राला डेट केले. तसेच, तिने सांगितले की तो खूप चांगला माणूस आहे. परंतु व्यस्त वेळापत्रक आणि कामाच्या दबावामुळे ते नाते तुटले. तथापि, फेब्रुवारी 2025 मध्ये अभिनेत्रीने लॉस एंजेलिसमध्ये टोनी बेगशी गुपचूप लग्न केले. तिच्या लग्नावेळी फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.