Naseeruddin Shah | साऊथ चित्रपटांबद्दल नसीरुद्दीन शाह यांचं मोठं वक्तव्य; बॉलिवूडवर साधला निशाणा

याच सीरिजच्या प्रमोशननिमित्त दिलेली त्यांची मुलाखत चर्चेत आली आहे. या मुलाखतीत त्यांनी थेट बॉलिवूड चित्रपटांवर निशाणा साधला आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचं कौतुक केलं आहे.

Naseeruddin Shah | साऊथ चित्रपटांबद्दल नसीरुद्दीन शाह यांचं मोठं वक्तव्य; बॉलिवूडवर साधला निशाणा
Naseeruddin ShahImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Feb 27, 2023 | 8:01 AM

मुंबई : अभिनेते नसीरुद्दीन शाह हे त्यांच्या दमदार अभिनयकौशल्यासाठी ओळखले तर जातातच, मात्र त्याचसोबत ते बेधडकपणे आपली मतं मांडण्यासाठी चर्चेत असतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते बॉलिवूड फिल्म इंडस्ट्री, मुघलांचा इतिहास आणि साऊथ फिल्म इंडस्ट्री यांविषयी मोकळेपणे व्यक्त झाले. नसीरुद्दीन शाह यांची ‘ताज : डिव्हायडेड बाय ब्लड’ ही वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये ते अकबरची भूमिका साकारत आहेत. याच सीरिजच्या प्रमोशननिमित्त दिलेली त्यांची मुलाखत चर्चेत आली आहे. या मुलाखतीत त्यांनी थेट बॉलिवूड चित्रपटांवर निशाणा साधला आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचं कौतुक केलं आहे.

“किमान त्यांचा कंटेट तरी ओरिजिनल असतो”

“तमिळ, कन्नड, मल्याळम आणि तेलुगू चित्रपट हे त्यांच्या कल्पकतेवर काम करतात. त्यात लॉजिकचा अभाव असला तरी किमान त्यांची कथा आणि त्यातील कल्पना ओरिजिनल असतात. त्या कल्पना मोठ्या पडद्यावर मांडण्याची त्यांची शैली उत्तम असते. मी बऱ्याच काळापासून हे निरीक्षण केलं आहे. त्यांच्या गाण्यांच्या पिक्चराइझेशनबद्दल जरी बोलायचं झालं तरी, तुम्ही जितेंद्र आणि श्रीदेवी यांचे चित्रपट पहा. एका ओळीत 100 हून अधिक महिला मटके घेऊन उभे असतात. पण किमान ही कल्पना त्यांची मूळ कल्पना असते”, असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे बॉलिवूड रिमेक्सवर निशाणा साधला.

“..म्हणून दाक्षिणात्य चित्रपटांना यश”

“एका रांगेत नाचणाऱ्या काही मुली असो किंवा मध्यात डान्स करणारी अभिनेत्री.. माझ्या मते साऊथ इंडियन चित्रपट खूप जास्त मेहनत घेतात. त्यामुळे हिंदी चित्रपटांपेक्षा त्यांना चांगलं यश मिळतंय, यात काही वाद नाही,” असंही ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

गेल्या काही काळात केजीएफ, पुष्पा: द राईज, कांतारा, RRR यांसारख्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली. तर दुसरीकडे बॉलिवूडमध्ये अक्षय कुमार आणि आमिर खान यांसारख्या सुपरस्टार्सचेही चित्रपट फ्लॉप ठरले. अक्षयचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘सेल्फी’ हा चित्रपटसुद्धा बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटला.

“मुघलांना खलनायक बनवण्याची गरज नाही”

या मुलाखतीत ते मुघलांविषयीही व्यक्त झाले. “जर त्यांनी केलेली प्रत्येक गोष्ट भयानक असेल, तर ताज महाल, लाल किल्ला, कुतूब मिनार पाडून टाका. लाल किल्ल्याला आपण पवित्र का मानतो, ते मुघलांनी बांधलं होतं. आपल्याला त्यांचा गौरव करण्याची गरज नाही, पण किमान त्यांनी बदनामी करण्याचीही गरज नाही”, असं मत त्यांनी मांडलं.

Non Stop LIVE Update
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?.
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट.
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार.
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग.
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,.
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज.
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?.
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव.