नाशिकची गायिका गीता माळीचा अपघातात मृत्यू

नाशिकची प्रसिद्ध गायिका गीता माळीचा आज (14 नोव्हेंबर) अपघात (singer geeta mali accident) झाला. या भीषण अपघातात गीता माळीचा मृत्यू झाला आहे.

  • कपिल देशपांडे, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 17:55 PM, 14 Nov 2019
नाशिकची गायिका गीता माळीचा अपघातात मृत्यू

नाशिक : नाशिकची प्रसिद्ध गायिका गीता माळीचा आज (14 नोव्हेंबर) अपघात (singer geeta mali accident) झाला. या भीषण अपघातात गीता माळीचा मृत्यू झाला आहे. ही घटना मुंबई-नाशिक महामार्गावरील एकता हॉटेलसमोर घडली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. माळी यांच्या निधनाने (singer geeta mali accident) नाशिकमध्ये कलाक्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

या भीषण अपघातात गीता माळीचे पती विजय माळीही जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुंबईहून नाशिक महामार्गावरुन जात असताना अचानक रस्त्यात गाडीच्या आडवे कुत्रा आल्याने त्याला वाचविण्याच्या नादात कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एचपी गॅसच्या टँकरला धडकली. या घटनेत गीता माळीचे निधन झाले, तर विजय माळी गंभीर जखमी झाले.

गीता माळी गेल्या तीन महिन्यापासून अमेरिकेत गेल्या होत्या. अमेरिकेहून त्या मुंबई विमानतळावर आल्यानंतर त्यांचे पती विजय माळी यांच्यासोबत त्या कारने नाशिकला येत असताना ही दुर्दैवी घटना घडली.

गीता माळी यांनी संगीत क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. आतापर्यंत त्यांनी अनेक गाणी गायली असून नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात त्यांचा चाहता वर्ग आहे. त्यांच्या या कामगिरीच्या जोरावर त्यांनी नावलौकिक मिळवले आहे. त्यांच्या निधनाने कला क्षेत्रात शोककळा पसरली आहे.