हार्दिक पांड्याशी घटस्फोटाच्या चर्चा असतानाच नताशा थेट ‘या’ व्यक्तीसोबत स्पॉट, हाच ‘तो’ म्हणत..
Hardik Pandya and Natasa Stankovic Divorce : क्रिकेटर हार्दिक पांड्या हा कायमच चर्चेत असतो. विशेष म्हणजे हार्दिक पांड्या सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय दिसतो. हार्दिक पांड्या याने काही महिने नताशा हिला डेट करून लग्न केले. हेच नाही तर नताशासोबत दोन वेळा हार्दिक पांड्याने लग्न केले. आता यांच्याबद्दल हैराण करणारी चर्चा सुरू आहे.

भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा हे सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. हार्दिक पांड्या आणि नताशा हे विभक्त झाल्याची जोरदार चर्चा आहे. आयपीएल सामन्यामध्येही हार्दिक पांड्याला सपोर्ट करण्यासाठी नताशा ही स्टेडियममध्ये पोहचली नाही. दरवेळी कोणताही सामना असो नताशा स्टेडियममध्ये हजेरी लावते. नताशा स्टेनकोविक हिने सोशल मीडियावर पांड्या हे नाव देखील काढून टाकलंय. रिपोर्टनुसार गेल्या काही दिवसांपूर्वीच हे विभक्त झाले आहेत. मात्र, यावर अजून नताशा किंवा हार्दिक पांड्या यांच्यापैकी कोणीही काहीही भाष्य केले नाहीये.
सतत हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्या घटस्फोटाची चर्चा जोरदार पद्धतीने रंगताना दिसतंय. घटस्फोटाची चर्चा सुरू असतानाच आता नताशा ही मुंबईतील बांद्रा परिसरात स्पॉट झालीये. आता हेच फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे यावेळी अत्यंत खास लूकमध्ये नताशा स्पॉट झाली. यावेळी पापाराझी यांना फोटोसाठी खास पोझ देतानाही नताशा दिसली.
हार्दिक पांड्या याच्यासोबत घटस्फोटाची चर्चा सुरू असतानाच एका मित्रासोबत नताशा स्पॉट झाली. मित्रासोबत नताशा कॅफेत गेली. हा व्यक्ती नेमका कोण याचीच जोरदार चर्चा रंगताना दिसतंय. अनेकांनी कमेंट करत याच व्यक्तीमुळे तर नताशा आणि हार्दिक पांड्या यांचा घटस्फोट झाला नाही ना? असा प्रश्न उपस्थित केलाय.
हार्दिक पांड्या आणि नताशा यांना एक मुलगा देखील आहे. हार्दिक पांड्या याला डेट करण्याच्या अगोदर नताशा ही अभिनेता अली गोनी याला डेट करत होती. हेच नाही तर एका शोमध्येही दोघे सहभागी झाले होते. मात्र, अचानक नताशा आणि अली गोनी यांचे ब्रेकअप झाले. त्यानंतर नताशा हिने हार्दिक पांड्या याला डेट करण्यास सुरूवात केली.
नेहमीच हार्दिक पांड्या आणि नताशा हे दोघेही एकमेकांसोबतचे खास फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दोघांनीही एकमेकांचे फोटो शेअर केले नाहीत. हेच काय तर नताशा हिने चक्क हार्दिक पांड्या याच्यासोबतचे फोटोही सोशल मीडियावरून डिलीट केले. आता यांच्या घटस्फोटाच्या चर्चांबद्दल खुलासा केला जाऊ शकतो.
